50 Days Of Rocketry : आर. माधवन (R Madhavan) हा बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेता आहे. अनेक गाजलेल्या सिनेमांत त्याने काम केलं आहे. आर. माधवनचा नुकताच 'रॉकेट्री: नांबी इफेक्ट' (Rocketry: The Nambi Effect) हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला. या सिनेमाने आता 50 दिवसांचा टप्पा पार केला असून अभिनेत्याने सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांचे आभार मानले आहेत.
'रॉकेट्री: नांबी इफेक्ट' या सिनेमाने 50 दिवसांचा टप्पा पार केल्याची माहिती आर. माधवनने सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांना दिली आहे. त्याने एक खास पोस्टर शेअर करत चाहत्यांचे आभार मानले आहेत. पोस्टर शेअर करत त्याने लिहिलं आहे,'रॉकेट्री: नांबी इफेक्ट' या सिनेमाने सिनेमागृहात 50 दिवसांचा टप्पा पार केला आहे. प्रेक्षकांचे आभार".
'रॉकेट्री: नांबी इफेक्ट' ओटीटीवर रिलीज
'रॉकेट्री: नांबी इफेक्ट' हा सिनेमा 26 जुलैला अॅमेझॉन प्राइम व्हिडीओवर प्रदर्शित झाला आहे. अॅमेझॉन प्राइम व्हिडीओवर हा सिनेमा तामिळ, कन्नड, तेलुगू आणि मल्याळम भाषेत प्रदर्शित झाला आहे. सिनेमागृहात हा सिनेमा हिंदी, इंग्रजी, तामिळ, तेलुगू, कन्नड आणि मल्याळम अशा सहा भाषांमध्ये प्रदर्शित झाला होता.
'रॉकेट्री: नांबी इफेक्ट' सिनेमासाठी आर.माधवनने घेतली विशेष मेहनत
'रॉकेट्री: नांबी इफेक्ट' हा सिनेमा आर माधवनचा ड्रीम प्रोजेक्ट आहे. हा सिनेमा इस्रो शास्त्रज्ञ नंबी नारायण यांच्या जीवनावर भाष्य करणारा आहे. हा सिनेमा गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत आहे. त्यामुळे प्रेक्षक आता या सिनेमाची आतुरतेने वाट पाहत आहे. या सिनेमासाठी आर. माधवनने विशेष मेहनत घेतली आहे.
आर माधवनच्या 'रॉकेट्री: नांबी इफेक्ट' हा सिनेमा 20 कोटींच्या बजेटमध्ये बनवण्यात आला. बॉक्स ऑफिसवर या सिनेमाने 40 कोटींची कमाई केली. आता हा सिनेमा अॅमेझॉन प्राइम व्हिडीओवर प्रदर्शित झाला आहे. रिलीजच्या 24 दिवसांनंतर हा सिनेमा ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाला आहे. सिनेमा ओटीटीवर रिलीज झाला असला तरी बॉक्स ऑफिसवर हा सिनेमा चांगली कमाई करत आहे.
संबंधित बातम्या