Boni Kapoor On Sridevi Pregnancy : ज्येष्ठ अभिनेत्री श्रीदेवी (Sridevi) आज हयात नसल्या तरी आजही त्यांच्याशी संबंधित आठवणी चाहत्यांच्या मनात ताज्या आहेत. बोनी कपूर (Boni Kapoor) यांच्यासोबत लग्न करण्याआधीच श्रीदेवी प्रेग्नंट असल्याचा दावा अनेकदा करण्यात आला आहे. पण खरंतर बोनी कपूर यांच्यासोबत लग्न केल्यानंतर श्रीदेवी प्रेग्नंट राहिल्या आहेत. बोनी कपूर यांनी नुकत्याच एका मुलाखतीत याबद्दल भाष्य केलं आहे.
बोनी कपूर यांनी युट्यूबर रोहन दुआला दिलेल्या मुलाखतीत वैयक्तिक आयुष्यासह श्रीदेवी, त्यांच्या प्रेग्नंसीच्या चर्चा आणि जान्हवीचा जन्म अशा अनेक गोष्टींबाबात भाष्य केलं आहे. श्रीदेवी लग्नाआधीच प्रेग्नंट असल्याचं म्हटलं जातं. आता 26 वर्षांनंतर बोनी कपूर यांनी गोष्टीचा खुलासा केला आहे.
"श्री लग्नाआधी प्रेग्नंट नव्हती"; बोनी कपूर यांचा खुलासा
युट्यूबरला दिलेल्या मुलाखतीत श्रीदेवींच्या प्रेग्नंसीबद्दल बोलताना बोनी कपूर म्हणाले,"श्रीदेवीसोबत मी 1996 मध्ये शिर्डी येथे दुसरं लग्न केलं आहे. 2 जून 1996 रोजी आम्ही गुपचूप लग्नबंधनात अडकलो. त्यानंतर जानेवारीमध्ये तिचे बेबी बंप दिसू लागले आणि श्रीदेवी प्रेग्नंट असल्याच्या चर्चांना सुरुवात झाली. त्यानंतर आम्ही आमचं लग्न झालं असल्याचं जाहीर केलं.
बोनी कपूर पुढे म्हणाले,"जानेवारी 1997 मध्ये सर्वांच्या साक्षीने थोर मोठ्यांचे आशीर्वाद घेऊन आम्ही पुन्हा एकदा लग्न केलं. याच कारणाने श्रीदेवी लग्नाआधीच प्रेग्नंट असल्याच्या चर्चांना सुरुवात झाली. पण या फक्त अफवा आहेत. आमचं लग्न झाल्यानंतर श्रीदेवी प्रेग्नंट होती".
जान्हवी कपूरबद्दल जाणून घ्या... (Janhvi Kapoor Movies)
श्रीदेवी यांनी 6 मार्च 1997 मध्ये आपल्या पहिल्या बाळाला अर्थात जान्हवी कपूरला (Janhvi Kapoor) जन्म दिला. आता जान्हवी 26 वर्षांची आहे. बॉलिवूडच्या आघाडीच्या यशस्वी अभिनेत्रींमध्ये जान्हवीची गणना होते. 'धडक' या सिनेमाच्या माध्यमातून जान्हवीने अभिनयक्षेत्रात पाऊल ठेवलं. गुंजन सक्सेना, रुही अफजा, घोस्ट स्टोरीज, आणि दोस्ताना या सिनेमांत जान्हवीचा अभिनय पाहायला मिळाला आहे.
श्रीदेवी या लोकप्रिय सिने-अभिनेत्री आहेत. श्रीदेवी यांनी 'सोलहवा सावना','हिम्मतवाला','मवाली','तोहवा','नगीना', 'घर संसार','आखिरी रास्ता','कर्मा','मि.इंडिया' यासह अनेक सिनेमांत त्यांनी काम केलं आहे. हिंदीसह तामिळ, तेलगू, मल्याळम आणि कन्नड सिनेमांतही अभिनेत्रीने काम केलं. भारतसरकारतर्फे त्यांना पद्मश्री पुरस्काराने गौरवण्यात आले. 'जूली' या सिनेमाच्या 1975 मध्ये श्रीदेवी यांनी बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. 'हिम्मतवाले' या सिनेमाने श्रीदेवी यांना सुपरस्टार अभिनेत्री बनवलं.
संबंधित बातम्या