Sridevi Prasanna Teaser Out : मराठी मनोरंजनसृष्टीसाठी (Marathi Movies) 2024 हे वर्ष खूपच खास असणार आहे. या वर्षात रोमँटिक, अॅक्शन, थ्रिलर, विनोदी, ऐतिहासिक असे वेगवेगळ्या जॉनरचे सिनेमे प्रदर्शित होणार आहेत. 'श्रीदेवी प्रसन्न' (Sridevi Prasanna) हा मराठी सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकताच या सिनेमाचा लक्षवेधी टीझर आऊट झाला आहे.


श्रीदेवी-प्रसन्नची कहाणी उलगडणार


लग्न का करावं, कुणाशी करावं याची प्रत्येकाची आपली अशी कारणं आणि कल्पना असतात. 'श्रीदेवी प्रसन्न' सिनेमा म्हणजे   लग्नासाठी योग्य जोडीदार शोधणाऱ्या श्रीदेवी-प्रसन्न या दोघांची कहाणी 'श्रीदेवी प्रसन्न' या सिनेमात प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.


सई-सिद्धार्थच्या आगळ्या-वेगळ्या लव्हस्टोरीनं वाढवली सिनेमाची उत्सुकता


मराठीसोबतच बॉलीवूडमध्येही आपल्या अभिनयाचा ठसा उमटवलेली ब्युटिफूल सई ताम्हणकर (Sai Tamhankar) आणि सध्या मराठीतला आघाडीचा अभिनेता म्हणून ओळखला जाणारा हँडसम सिद्धार्थ चांदेकर (Siddharth Chandekar) पहिल्यांदाच 'श्रीदेवी प्रसन्न' या चित्रपटाच्या माध्यमातून एकत्र मोठ्या पडद्यावर दिसणार आहेत.  


'श्रीदेवी प्रसन्न' कधी रिलीज होणार? (Sridevi Prasanna Release Date)


'श्रीदेवी प्रसन्न' या सिनेमाचा टीझर नुकताच प्रदर्शित करण्यात आला आणि यातील सई-सिद्धार्थची दिसून आलेली केमिस्ट्री आणि संवादांची जुगलबंदी चित्रपटाविषयीची उत्सुकता  वाढवून गेली. विशाल मोढवेने या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे. 'श्रीदेवी प्रसन्न' हा सिनेमा 2 फेब्रुवारी 2024 रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.






तगडी स्टारकास्ट असलेला 'श्रीदेवी प्रसन्न'


'श्रीदेवी प्रसन्न' या सिनेमात सई आणि सिद्धार्थ या मुख्य व्यक्तिरेखांसोबतच सुलभा आर्या, सिद्धार्थ बोडके, रसिका सुनील, संजय मोने, वंदना सरदेसाई, समीर खांडेकर, आकांक्षा गाडे, रमाकांत डायमा, शुभांगी गोखले, पाहुल पेठे, पल्लवी परांजपे, पूजा वानखेडे, सिद्धार्थ महाशब्दे, जियांश पराडे हे कलाकार देखील महत्त्वाच्या व्यक्तिरेखा साकारताना दिसणार आहेत. या सिनेमाच्या लेखनाची जबाबदारी अदिती मोघे यांनी उचलली असून मराठीतील प्रसिद्ध संगीतकार अमित राज यांनी यातील गाणी संगीतबद्द केली आहेत. 


'श्रीदेवी प्रसन्न'मध्ये काय पाहायला मिळणार?


'श्रीदेवी प्रसन्न' या सिनेमात 'लव अॅट फर्स्ट साईट'चं स्वप्न मनात बाळगत प्रेमाच्या भन्नाट कल्पना विश्वात वावरणारा प्रसन्न,  मॅट्रिमोनी साइटवर 'श्रीदेवी' या नावाच्या उत्सुकतेपोटी  तिला रिक्वेस्ट पाठवतो आणि ती अॅक्सेप्ट देखील करते. या दोन टोकांच्या माणसांची मनं जुळतात की नाही,त्या दरम्यान नेमकं काय काय घडतं या कथानकाला 'श्रीदेवी प्रसन्न' सिनेमाच्या माध्यमातून दिलेला फिल्मी तडका रसिक प्रेक्षकांचे 100 टक्के  मनोरंजन करणार आहे.


संबंधित बातम्या


Sridevi Prasanna: "चहा घेणार की कॉफी?"; सई ताम्हणकर आणि सिद्धार्थ चांदेकर यांच्या "श्रीदेवी प्रसन्न"चं मोशन पोस्टर रिलीज, चित्रपट 'या' दिवशी येणार प्रेक्षकांच्या भेटीला