South Indian Movie : बॉलिवूडसह दाक्षिणात्य सिनेमे (Movies) पाहायला प्रेक्षक पसंती दर्शवत आहेत. ओटीटीमुळे (OTT) विविध विषयांवर भाष्य करणारे, वेगवेगळ्या धाटणीचे सिनेमे प्रेक्षकांना पाहायला मिळत आहेत. साऊथ इंडियन टच असलेले सिनेमे पाहायला सिनेप्रेक्षक पसंती दर्शवत असल्याचं समोर आलं आहे.
तामिळ, तेलुगू, मल्याळम आणि कन्नड या भाषांतील सिनेमे पाहायला प्रेक्षकांना आवडत आहे. दाक्षिणात्य सिनेमांचा जगभरात मोठा चाहतावर्ग आहे. तुम्हालाही दाक्षिणात्य सिनेमे पाहायला आवडत असलील तर 'जेलर' ते 'LEO' हे सिनेमे तुम्ही पाहायलाच हवेत.
हाय नन्ना (Hi Nanna)
'हाय नन्ना' हा तेलुगू भाषेतील रोमँटिक नाट्य असणारा सिनेमा आहे. नेटफ्लिक्सवर हा सिनेमा हिंदीतही उपलब्ध आहे. या सिनेमात नानी आणि मृणाल ठाकुर मुख्य भूमिकेत आहेत. आयएमडीबीवर या सिनेमाला 8.3 रेटिंग मिळाले आहे. या सिनेमाचं कथानक खूपच भावनिक आहे. त्यामुळे हा सिनेमा पाहताना प्रेक्षकांना अश्रू अनावर होऊ शकतात.
वाथी (Vaathi)
धनुष हा दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता आहे. धनुषचे सिनेमे आणि कथानक प्रेक्षकांची मने जिंकतात. 'वाथी' हा सिनेमा 2023 मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. शैक्षणिकतेवर आधारित या सिनेमात एका मुलाचा संघर्ष दाखवण्यात आला आहे. 'वाथी' हा सिनेमा नेटफ्लिक्सवर रिलीज झाला होता. आयएमडीबी रेटिंगवर या सिनेमाला 7.3 रेटिंग मिळालं आहे.
लीओ (Leo)
विजय थलापतीच्या लीओ या सिनेमात प्रेक्षकांना अॅक्शनचा तडका पाहायला मिळणार आहे. या सिनेमात विजय आणि तृषा कृष्णन मुख्य भूमिकेत आहेत. तसेच संजय दत्तदेखील खलनायकाच्या भूमिकेत आहे. या सिनेमातील संवाद, कथानक खूपच धमाकेदार आहे. नेटफ्लिक्सवर प्रेक्षक हा सिनेमा पाहू शकतात.
वारिसु (Varisu)
वारिसु हा तामिळ सिनेमा आहे. या सिनेमात विजय थलापती आणि रश्मिका मंदाना मुख्य भूमिकेत आहेकत. वडिल-मुलाची गोष्ट या सिनेमात दाखवण्यात आली आहे. विजयच्या दर्जेदार अभिनयाची झलक प्रेक्षकांना या सिनेमात पाहायला मिळत आहे. हा सिनेमा प्रेक्षक प्राईम व्हिडीओवर पाहू शकतात.
जेलर (Jailer)
रजनीकांतचा जेलर हा सिनेमा 2023 या वर्षातला हिट सिनेमांपैकी एक आहे. बॉक्स ऑफिसवर या सिनेमा 328 कोटींपेक्षा अधिक कमाई केली आहे. कॉमेडी आणि अॅक्शनचा तडका असणारा हा सिनेमा प्राईम व्हिडीओ या ओटीटी प्लॅटफॉर्मवर पाहू शकतात.
संबंधित बातम्या