Dhanush: दाक्षिणात्य अभिनेता धनुष (Dhanush) सध्या प्रचंड चर्चेत आहे. विशेष म्हणजे तो सध्या त्याच्या कोणत्याही चित्रपटामुळे नाही तर, वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. मागील बऱ्याच काळापासून मदुराईचे एक जोडपे अभिनेत्याला त्यांचा जैविक मुलगा असल्याचा दावा करत आहेत. आता धनुष आणि त्याचे वडील कस्तुरी राजा यांनी या जोडप्याला कायदेशीर नोटीस पाठवली आहे. धनुष हा त्यांचा मुलगा असल्याचे सांगणे, या जोडप्याने थांबवावे, असे नोटीसमध्ये नमूद करण्यात आले आहे. तसेच, नोटीसमध्ये या जोडप्याला पत्रकार परिषदेत हे निवेदन देण्यास सांगण्यात आले आहे.


मदुराईचे एक जोडपे दावा करत आहे की, धनुष त्यांचा मुलगा आहे. त्यांच्यावर कारवाई करत अभिनेता आणि त्याचे वडील कस्तुरी राजा यांनी या तामिळनाडू जोडप्याला कायदेशीर नोटीसही पाठवली आहे.



मानहानीचा दावा दाखल करण्याची नोटीस


धनुष आणि कस्तुरी राजा यांनी त्यांचे वकील, अधिवक्ता एस हाजा मोहिद्दीन गिश्ती यांच्यामार्फत नोटीस पाठवली आहे आणि दाम्पत्याला त्यांचे असे दावे थांबवण्यास सांगितले आहे. एएनआयच्या वृत्तानुसार, नोटीसमध्ये असे लिहिले आहे की, ‘माझा क्लायंट तुम्हा दोघांना आतापासून त्याच्यावर खोटे, अक्षम्य आणि बदनामीकारक आरोप करण्यापासून दूर राहण्याचे आवाहन करतो. तसे करण्यात अयशस्वी झाल्यास माझा क्लायंट या संदर्भात योग्य ती कारवाई करण्याचे पाऊल उचलेल. तुमच्या दोघांवरही बदनामी आणि त्यांच्या प्रतिष्ठेला हानी पोहोचवल्याबद्दल खटला भरला जाईल.’


रिपोर्टनुसार, धनुष आणि त्याच्या वडिलांनी मदुराईतील या दाम्पत्याला एक प्रेस स्टेटमेंट जारी करण्यास सांगितले आहे. ज्यात त्यांनी केलेले सर्व आरोप खोटे असून, असे आरोप केल्याबद्दल माफी मागतो असे नमूद केलेले असेल. नोटीसनुसार, ते असे करण्यात अयशस्वी झाल्यास, त्यांना नुकसान भरपाई म्हणून 10 कोटी रुपयांच्या मानहानीच्या खटल्याला सामोरे जावे लागेल.


सोनम कपूरसोबत 'रांझना' या चित्रपटात मुख्य अभिनेता म्हणून दिसल्यानंतर साऊथ सुपरस्टार धनुष हिंदी प्रेक्षकांमध्ये चर्चेत आला होता. चित्रपटातील बनारसमधील एका स्थानिक मुलाच्या भूमिकेसाठी आणि त्याच्या अभिनयासाठी धनुषचे खूप कौतुक झाले. नुकताच तो सारा अली खान आणि अक्षय कुमारसोबत 'अतरंगी' चित्रपटात झळकला होता. 


हेही वाचा :