एक्स्प्लोर

Sonu Sood Institute: आयएएस अधिकारी व्हायचंय? अभिनेता सोनू सूद करणार विद्यार्थ्यांची मदत!

Sonu Sood : कोरोनाच्या काळात सोनू सूद लाखो लोकांना मदतीचा हात देण्यासाठी पुढे आला होता. सोनू सूदने हाती घेतलेला हा वसा आजही अविरत सुरु ठेवला आहे.

Sonu Sood : बॉलिवूड अभिनेता सोनू सूदला (Sonu Sood) केवळ पडद्यावरचा नाही तर खऱ्या आयुष्यातील हिरो देखील मानले जात नाही. कोरोनाच्या काळात सोनू सूद लाखो लोकांना मदतीचा हात देण्यासाठी पुढे आला होता. सोनू सूदने हाती घेतलेला हा वसा आजही अविरत सुरु ठेवला आहे. केवळ कोरोनाच्या काळातच नाही, तर आजही तो लाखो गरीबांना मदत करतो. आजही त्याच्या घराबाहेर मदतीच्या प्रतीक्षेत असणाऱ्या लोकांना रांग लागलेली असते. केवळ गरजू लोकच नाही तर, अभिनेत्याने विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी देखील मदत करण्याचा वसा हाती घेतला आहे. आता सोनू सूद ‘आयएएस’ होऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना मदतीचा हात देणार आहे.

अभिनेता सोनू सूद (Sonu Sood) आयएएस परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मोफत कोचिंग सुरू करणार आहे. अभिनेत्याने त्याच्या ट्विटर हँडलवर या संदर्भात एक पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये त्याने याबाबतची माहिती दिली आहे. सोनू सूदने लिहिले की, ‘चला मिळून नवा भारत घडवूया. ही 2022-23ची अशी नवी सुरुवात. IAS परीक्षेसाठी मोफत ऑनलाईन कोचिंग.’ त्याने आणखी एका ट्विटमध्ये लिहिले की, ‘आयएएसची तयारी करायचीय, आम्ही घेऊ तुमची जबाबदारी.’

पाहा पोस्ट :

कसा कराल अर्ज?

मोफत कोचिंगसाठी विद्यार्थी सोनू सूद फाउंडेशन ग्रुपच्या दिलेल्या लिंकवर जाऊन नोंदणी करू शकतात. याशिवाय नोंदणीसाठी फाउंडेशनने ठरवून दिलेली फी भरावी लागेल. या कोचिंगद्वारे निवड झालेल्या विद्यार्थ्यांना देशातील सर्वोच्च नागरी सेवा संस्थांमध्ये मोफत ऑनलाईन आयएएस कोचिंग दिले जाईल. याशिवाय फाऊंडेशनतर्फे विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीही दिली जाणार आहे.

सोनू सूदच्या  (Sonu Sood)  या उपक्रमाचे खूप कौतुक होत आहे. सोशल मीडियावर त्याचा हा उपक्रम चाहत्यांच्या पसंतीस उतरला आहे. नुकतेच सोनूच्या एका चाहत्याने त्याला रक्ताने बनवलेले पेंटिंग भेट म्हणून दिले होते. सोनूने चाहत्याला सल्ला देताना म्हटले होते की, ‘रक्तदान करून एखाद्याची मदत करा. माझे असे पेंटिंग बनवून ते वाया घालवू नका!’.

बॉलिवूड अभिनेता सोनू सूद सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असतो. जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचून त्यांची मदत करण्याचा प्रयत्न तो करतो. अनेक गरजू लोक सोशल मीडियाद्वारे अभिनेता सोनू सूदला टॅग करून मदतीचे आवाहन करताना दिसतात.

संबंधित बातम्या 

Sonu Sood Birthday: खिशात 5000 रूपये घेऊन आला होता मुंबईत, आज कोट्यवधींचा मालक; जाणून घ्या 'रिअल लाईफ हिरो' सोनू सूदबाबत

Sonu Sood : कोरोनाकाळात केलेल्या विशेष कार्याबद्दल सोनू सूदचा 'आयएए विशेष पुरस्कारा'ने सन्मान

महत्त्वाच्या बातम्या

Rashmika Mandanna: 'मी हजार वेळा विचारेन' रश्मिकाने सोडलं मौन, ट्रोलर्सना दिलं सडेतोड उत्तर; म्हणाली माझं हाड मोडलं तेव्हा...
'मी हजार वेळा विचारेन' रश्मिकाने सोडलं मौन, ट्रोलर्सना दिलं सडेतोड उत्तर; म्हणाली माझं हाड मोडलं तेव्हा...
Sankarshan Karhade Grandmother: 'माझ्या आजीने चोराला चहा पाजलाय...'; संकर्षण कऱ्हाडेनं सांगितला किस्सा, आजीच्या घरात घुसलेला चोर; पण त्याने चोरी केली नाही कारण...
'माझ्या आजीने चोराला चहा पाजलाय...'; संकर्षण कऱ्हाडेनं सांगितला किस्सा, आजीच्या घरात घुसलेला चोर; पण त्याने चोरी केली नाही कारण...
Ashok Saraf Nivedita Saraf: शूटच्या 4 दिवस आधी अशोक सराफ रुग्णालयात दाखल; निवेदिता सराफ यांनी कशी काळजी घेतली? संकर्षण कऱ्हाडेनं सांगितला किस्सा
शूटच्या 4 दिवस आधी अशोक सराफ रुग्णालयात दाखल; निवेदिता सराफ यांनी कशी काळजी घेतली? संकर्षण कऱ्हाडेनं सांगितला किस्सा
Sayaji Shinde on Karjat Tree Cutting: 'मुख्यमंत्र्यांना सह्याद्रीचं वाळवंट करायचंय का?'; कर्जत वृक्षतोडीवरुन सयाजी शिंदे संतापले, विनंती करत म्हणाले की...
'मुख्यमंत्र्यांना सह्याद्रीचं वाळवंट करायचंय का?'; कर्जत वृक्षतोडीवरुन सयाजी शिंदे संतापले, विनंती करत म्हणाले की...

व्हिडीओ

Nashik kumbh Mela 2026 : सिंहस्थ कुंभमेळ्याच्या ध्वजारोहणात ऐतिहासिक क्षण, नाशिकमध्ये 501 शंखांचा एकत्रित नाद
Nashik Kumb Mela 2026 : कुंभमेळ्याची परंपरा नेमकी कशी सुरू झाली? History of kumb Mela
Nashik Kumb mela : नाशिक कुंभमेळ्यात विश्वविक्रम, 501 गोदासेवकांचा एकाचवेळी शंखनाद, अमेरिकेचा विक्रम मोडीत
Raj Thackeray Speech | दुचाकी, चारचाकी, सिग्नल ते सरकार... नवी मुंबईतील मेळाव्यातलं राज यांचं भाषण!
Mumbai Local CR : ठाणे भांडूपदरम्यान सिग्नल यंत्रनेत बिघाड, मध्य रेल्वे 2 तासांपासून विस्कळीत

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai Pune Missing Link : मुंबई-पुणे 'मिसिंग लिंक'वर नवे नियम; पिकअप व्हॅन, मालवाहतूक ट्रकसह अनेक वाहनांना प्रवेशबंदी, 1 नोव्हेंबरपासून बस, कारची वेगमर्यादा निश्चित
मुंबई-पुणे 'मिसिंग लिंक'वर नवे नियम; पिकअप व्हॅन, मालवाहतूक ट्रकसह अनेक वाहनांना प्रवेशबंदी, 1 नोव्हेंबरपासून बस, कारची वेगमर्यादा निश्चित
कॉप्यूटर क्लास करुन घरी निघाला होता साहिल, मृत्यूला रेल्वेचा गलथान कारभारच जबाबदार; कुटुंबीयांचा आक्रोश
कॉप्यूटर क्लास करुन घरी निघाला होता साहिल, मृत्यूला रेल्वेचा गलथान कारभारच जबाबदार; कुटुंबीयांचा आक्रोश
Arunachal Border Tension : 'आशा आहे भारत कराराचे पालन करेल'; अरुणाचल सीमेवरील तणावावर चीनच्या उलट्या बोंबा 
'आशा आहे भारत कराराचे पालन करेल'; अरुणाचल सीमेवरील तणावावर चीनच्या उलट्या बोंबा 
Vande Bharat Sleeper Train : मुंबई-बंगळुरु वंदे भारत स्लीपर ट्रेनबाबत केंद्रीय रेल्वे राज्यमंत्र्यांकडून अपडेट, ट्रेन कोणत्या मार्गे धावणार?
मुंबई-बंगळुरु वंदे भारत स्लीपर ट्रेनबाबत केंद्रीय रेल्वे राज्यमंत्र्यांकडून अपडेट, ट्रेन कोणत्या मार्गावरुन धावणार?
खोळंब्यानंतर लोकल सुरळीत, पण तुडूंब गर्दीमुळे प्रवाशांची हाणामारी; ठाणे रेल्वे स्थानकावर चाकरमानी संतप्त
खोळंब्यानंतर लोकल सुरळीत, पण तुडूंब गर्दीमुळे प्रवाशांची हाणामारी; ठाणे रेल्वे स्थानकावर चाकरमानी संतप्त
इंग्रजांकडून होत नव्हता, तेवढा त्रास यांच्याकडून; वृक्षतोडीवरुन जरांगे पाटील संतप्त, साय डोंगर परिसरात भेट देणार
इंग्रजांकडून होत नव्हता, तेवढा त्रास यांच्याकडून; वृक्षतोडीवरुन जरांगे पाटील संतप्त, साय डोंगर परिसरात भेट देणार
वृक्षतोड तात्काळ थांबायला हवी, एक झाड मोठं व्हायला 150 वर्षे लागतात; ओमराजेंचा सरकारला घरचा अहेर
वृक्षतोड तात्काळ थांबायला हवी, एक झाड मोठं व्हायला 150 वर्षे लागतात; ओमराजेंचा सरकारला घरचा अहेर
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 ऑक्टोबर 2026 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 ऑक्टोबर 2026 | सोमवार
Embed widget