एक्स्प्लोर
सोनू निगमकडून अजानचा व्हिडीओ ट्वीट
मुंबई : अजानसंदर्भातील वादग्रस्त ट्वीटमुळे चर्चेत आलेल्या सोनू निगमने आज पुन्हा एक नवीन ट्वीट केलं आहे. सोनूच्या या नव्या ट्वीटमुळे हा वाद चिघळण्याची चिन्हं आहेत.
सोनूने या नव्या ट्वीटमध्ये अजानचा व्हिडीओ पोस्ट केला असून, त्यासोबत गुड मॉर्निंगचा संदेश दिला आहे. सोनूनं ट्वीट केलेला हा व्हिडीओ दोन मिनीट 20 सेकंदाचा आहे.
काही दिवसांपूर्वी सोनू निगमने अजान संदर्भात केलेल्या ट्वीटमुळे वाद निर्माण झाला होता. सोनूने या ट्वीटमध्ये ''मी मुस्लीम नाही, तरी अजानमुळे माझी झोपमोड का?'' असा सवाल करत, मुस्लिम धर्माच्या अजानवर आक्षेप घेतला होता. सोनू निगमच्या ट्वीटवर अनेकांनी संमिश्र प्रतिक्रिया दिल्या होत्या. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांचे राजकीय सल्लागार अहमद पटेल यांनी ‘नमाजसाठी अजान महत्वाची आहे. पण आजच्या आधुनिक युगात लाऊडस्पीकर गरजेचं नाही.’ अशी प्रतिक्रिया ट्विटरवर दिली होती.Goodmorning India pic.twitter.com/gG8lqPZTSQ
— Sonu Nigam (@sonunigam) April 23, 2017
Azaan is an essential ingredient for Namaz. In today's day of modern technology, loudspeakers aren't — Ahmed Patel (@ahmedpatel) April 18, 2017तर काही मुस्लीम धर्मगुरुंनी सोनूच्या ट्वीटचा चांगलाच समाचार घेतला होता. एका मौलानाने टक्कल करुन फिरवण्याची धमकी दिली होती. यानंतर सोनूनं पत्रकार परिषद घेऊन माफीनामा सादर केला होता पण पुण्यातील कोर्टात सोनू निगमविरोधात गुन्हा दाखल करण्यासाठी अर्ज करण्यात आला आहे. मुस्लीम समाजाने आक्रमक भूमिका घेतल्याने सोनू निगमची सुरक्षा वाढवण्यात आली आहे. दरम्यान त्याच्या नव्या ट्वीटमुळे हा वाद चिघळण्याची चिन्हे आहेत. संबंधित बातम्या
पुण्यात सोनू निगमविरोधात गुन्हा दाखल करण्यासाठी अर्ज
मशिदींवरील भोंग्यांमुळे माझी झोपमोड का? : सोनू निगम
‘अजान जरुरी, लाऊडस्पीकर नाही’, सोनू निगमच्या ट्वीटवर अहमद पटेलांचं वक्तव्य
मशिदींवरील भोंग्यांमुळे माझी झोपमोड का? : सोनू निगम
‘अजान जरुरी, लाऊडस्पीकर नाही’, सोनू निगमच्या ट्वीटवर अहमद पटेलांचं वक्तव्य
अजानबद्दलच्या ट्वीटनंतर सोनू निगमचा माफीनामा
सोनू निगमच्या हेअर स्टायलिस्टला मौलवी 10 लाख रुपये देणार?
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
छत्रपती संभाजी नगर
महाराष्ट्र
बातम्या
नाशिक
Advertisement