एक्स्प्लोर
कॅन्सरच्या उपचारादरम्यानचा सोनाली बेंद्रेचा ‘न्यू लूक’
सोनालीने नवे फोटो आणि व्हिडीओसोबत भावनिक मेसेजसुद्धा दिला आहे. तिच्या या लूकने सर्वांनाच आश्र्चर्याचा धक्का बसला आहे.
![कॅन्सरच्या उपचारादरम्यानचा सोनाली बेंद्रेचा ‘न्यू लूक’ sonali bendre share her new look new photo and video कॅन्सरच्या उपचारादरम्यानचा सोनाली बेंद्रेचा ‘न्यू लूक’](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2018/07/10170737/sonali.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
न्यूयॉर्क : कॅन्सरवर उपचार घेत असलेल्या अभिनेत्री सोनाली बेंद्रेने नुकताच आपला नवीन न्यू लूक शेअर केला. तिने आपल्या लांबसडक केसांना कात्री लावली आहे. सोनालीने त्याबाबतचे फोटो आणि व्हिडीओ ट्विटरवर शेअर केले आहेत.
कॅन्सरवरील उपचारावेळी किमोथेरपीदरम्यान केस गळतात. त्यामुळे खबरदारी म्हणून सोनालीने आधीच केस कमी केल्याचं सांगितलं जात आहे.
सोनालीने नवे फोटो आणि व्हिडीओसोबत भावनिक मेसेजसुद्धा दिला आहे. तिच्या या लूकने सर्वांनाच आश्र्चर्याचा धक्का बसला आहे.
अभिनेत्री सोनाली बेंद्रेला हाय ग्रेड कॅन्सर झाला आहे. सध्या ती अमेरिकेतील न्यूयॉर्कमध्ये उपचार घेत आहे.
सोनालीची पोस्ट
माझी आवडती लेखिका इसाबेल अलेंदेने म्हटल्याप्रमाणे, ‘जोपर्यंत आपल्यावर आपली ताकद दाखवण्याची वेळ येत नाही तोपर्यंत आपण किती शक्तिशाली आहोत हे आपल्याला समजत नाही. युद्धात, संकटात किंवा अडचणींच्या वेळी माणसे नेहमीच आश्चर्यकारक गोष्टी करतात. माणसाची जगण्याची इच्छाशक्ती ही नेहमीच प्रबळ असते.’
“गेल्या अनेक दिवसांपासून माझ्या चाहत्यांकडून मिळत असलेलं प्रेम पाहून मन भरुन आलं. कॅन्सरशी लढण्याचे अनुभव ज्यांनी ज्यांनी माझ्याशी शेअर केले त्या सर्वांचे मी आभार मानते. यातूनच मला जगण्याची प्रेरणा आणि बळ मिळत आहे. शिवाय या लढ्यात मी एकटी नसल्याची जाणीव मला होत आहे.”
‘प्रत्येक दिवस माझ्यासाठी एक नवीन आव्हान घेऊन येत आहे आणि मी खंबीरपणे त्याला सामोरं जात आहे. या प्रवासात मी नेहमीच सकारात्मक राहण्याचा प्रयत्न करत आहे. माझा प्रवास तुमच्यासोबत शेअर करणं हासुद्धा त्याचाच एक भाग आहे.’
सोनालीचा व्हिडीओ सोनाली बेंद्रे सध्या न्यूयॉर्कमध्ये उपचार घेत आहे. याच पार्श्र्वभूमीवर सोनालीने आपला नवीन लूकमधील व्हिडीओ शेअर केला आहे. न्यूयॉर्कमधील एका हेयर सलूनमध्ये जाऊन सोनालीने आपला हेयरकट करुन घेतला. त्याचाच व्हिडीओ तिने ट्विटरवरुन शेअर केला आहे. व्हिडीओत सोनली हेयर कट करताना दिसत आहे. हेयरकट वेळी सोनालीचा नवरा गोल्डी बहलसुद्धा तिच्यासोबत होता. काही वेळाने सोनाली भावूक झाली आणि तिला अश्रू अनावर झाले. तेव्हा तिच्या नवऱ्यानेच तिला सावरले. नंतर सोनाली आपल्या केसांसोबत मजा मस्ती करत असल्याचं व्हिडीओत पाहायला मिळतं.🤞🌞 #SwitchOnTheSunshine (1/2) pic.twitter.com/zz7SwJXlhz
— Sonali Bendre Behl (@iamsonalibendre) July 10, 2018
🤞🌞 #SwitchOnTheSunshine (2/2) pic.twitter.com/Lw6wum2xaf
— Sonali Bendre Behl (@iamsonalibendre) July 10, 2018
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
क्राईम
मुंबई
बॉलीवूड
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)