मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाने (Sonakshi Sinha) अभिनेता जहीर इक्बालसोबत (Zaheer Iqbal) लग्न केलं. या लग्नाला सोनाक्षीच्या घरच्यांकडून विरोध असल्याचं सांगण्यात येत होतं. मात्र, त्यानंतर सोनाक्षीचे वडील शत्रुघ्न सिन्हा यांनी सर्व मतभेद मिटल्याचं सांगितलं होतं. यानंतर सोनाक्षीचं लग्न आणि रिसेप्शन पार्टी थाटात पार पडली. सोनाक्षी सिन्हाच्या लग्नात तिचा भाऊ लव सिन्हा (Sonakshi Sinha Brother Luv Sinha) गैरहजर होता. लव सिन्हा सोनाक्षीच्या लग्नात उपस्थित नसल्याने त्याला हे लग्न मान्य नसल्याचं सांगण्यात येत होतं. मात्र, लव सिन्हाने याबाबत कोणतीही अधिकृत माहिती दिली नव्हती. आता सोनाक्षीच्या भावाने याबाबत मौन सोडलं आहे.
जहीरच्या वडिलांवर सोनाक्षीच्या भावाची नाराजी
सोनाक्षी सिन्हाच्या लग्नाच्या एका आठवड्यानंतर लव सिन्हाच्या ट्वीटने सर्वांचं लक्ष वेधलं आहे. 30 जून रोजी लव सिव्हाने ट्वीट केलं होतं, ज्यामध्ये त्याने लिहिलं होतं की, "त्यांच्या कौटुंबिक व्यवसायाची बातमी फक्त चर्चेसाठी पेरण्यात आली होती, जेणेकरून या मागील मूळ कारणाकडे कुणी लक्ष देऊ नये, जसे वराच्या वडिलांची राजकारण्यांसोबतची जवळीक ज्यांची ईडी चौकशी 'वॉशिंग मशीन'मध्ये गायब जाली. याबाबत दुबईत राहणाऱ्या वराच्या वडिलांबाबतही कोणतीही कल्पना नव्हती."
लव सिन्हाला बहिण सोनाक्षीसोबत नातं ठेवायचं नाहीय
वराच्या वडिलांबाबत केलेल्या ट्वीटनंतर दुसऱ्याच दिवशी लव सिन्हा यांनी आणखी एका ट्वीटमध्ये लिहिलं की, "मला त्या लोकांशी संबंध ठेवायचे नाहीत." त्याने आपल्या ट्विटमध्ये लिहिले की, "मी लग्नात का सामील झालो नाही, याची कारणे अगदी स्पष्ट आहेत आणि काहीही झालं तरी, मी काही लोकांशी संबंध ठेवणार नाही. मला आनंद आहे की, मीडियाच्या सदस्याने PR टीमद्वारे रचलेल्या कथांवर अवलंबून न राहता यामागचं खरं कारण शोधून काढलं." या ट्वीटवरुन लव सिन्हाला बहिण सोनाक्षीसोबत नातं ठेवायचं नाहीय असं म्हटलं जात आहे.
जहीरचे वडील इक्बाल रतनसी आहेत मूळ कारण
दरम्यान, लव सिन्हाने असं का म्हटलं, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. पण, त्याचे ट्वीट पाहता हे ट्वीट जहीर इक्बालचे वडील इक्बाल रतनसी यांच्याबद्दल असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, इक्बाल रतनसी मुंबईतील एक प्रसिद्ध व्यापारी आहेत. त्यांचा व्यवसाय केवळ भारतातच नाही तर परदेशातही पसरला आहे. इक्बाल रतनसी हे सलमान खानचे जवळचे मित्र असल्याचं सांगितलं जात असून भाईजान आणि त्यांच्या मोठा व्यवहार झाल्याचंही बोललं जातं.
महत्त्वाच्या इतर बातम्या :