मुंबई : बॉलिवूडच्या (Bollywood) आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक म्हणजे श्रद्धा कपूर (Shraddha Kapoor). सर्वगुणसंपन्न अशी अभिनेत्री म्हणून श्रद्धा कपूरकडे पाहिलं जातं. अभिनय कौशल्य, सुंदर आवाज, सौंदर्य आणि तितकीच सुशील असा श्रद्धा कपूरचा स्वभाव नेहमीच चाहत्यांच्या कौतुकास पात्र ठरतो. श्रद्धा कपूरचा साधेपणा आणि गोड स्वभाव चाहत्यांच्या कायम पसंतीस उतरतो. आता पुन्हा एकदा श्रद्धा कपूरच्या गोड स्वभावाने चाहत्यांचं मन जिंकलं आहे.

Continues below advertisement

श्रद्धा कपूरच्या 'त्या' कृतीने पुन्हा जिंकलं चाहत्यांचं मन

श्रद्धा कपूरचा चाहत्यासोबतचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. या व्हिडीओमधील श्रद्धा कपूरचं चाहत्यांसोबतच वर्तन कौतुकाचा विषय ठरत आहे. अलिकडे श्रद्धा कपूर एका कार्यक्रमासाठी लखनौमध्ये गेली होती. यावेळी चाहत्यांनी तिची भेट घेतली. चाहत्यांसोबतच्या भेटीवेळी श्रद्धाच्या डाउन-टू-अर्थ स्वभावने पुन्हा एकदाा सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. तिच्या चाहत्यांवरील प्रेमाची झलकही यावेळी पाहायला मिळाली. श्रद्धावर चाहते जितकं प्रेम करतात, तितकेचा तिचे चाहतेही तिच्यासाठी किती खास आहेत, हे यातून दिसून येत आहे.

लखनौमधील व्हिडीओ व्हायरल

अभिनेत्री श्रद्धा कपूरने अलीकडेच एका कार्यक्रमासाठी लखनौला भेट दिली आणि यावेळी तिच्या चाहत्यांनी तिची भेट घेतली. तिचा चाहत्यांसोबतचा गोड संवाद आणि प्रेमळ स्वभाव कृतीतून दाखवणारे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. इन्स्टाग्रामवर एका चाहत्याच्या अकाऊंटवर शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये, श्रद्धा तिच्या चाहत्यांना मिठी मारताना दिसत आहे. 

Continues below advertisement

पाहा व्हिडीओ : 

'स्टार' म्हणत नेटकऱ्यांकडून कौतुकाचा वर्षाव

श्रद्धा कपूर सध्या तिच्या आगामी 'स्त्री 2' चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. श्रद्धा तिच्या मनमोहक सौंदर्य आणि तिच्या प्रेमळ स्वभावासाठी  ओळखली जाते. चाहत्यांसोबतच्या तिचा प्रेमळ संवादामुळे तिच्या आकर्षक व्यक्तिमत्वासाठीची पुन्हा एकदा झलक पाहायला मिळाली आहे. श्रद्धा कपूरचं चाहत्यांसोबतची प्रेमळ वागणूक नेटकऱ्यांच्या चांगलीच पसंतीस उतरली आहे. नेटीझन्सने श्रद्धा कपूरच्या डाउन-टू-अर्थ स्वभावाबद्दल तिचं कौतुक केलं आहे. श्रद्धा कपूरच्या या व्हिडीओने साऱ्यांचंच लक्ष वेधून घेतलं आहे.