मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाने (Sonakshi Sinha) झहीर इक्बालसोबत (Zaheer Iqbal) लग्न केलं आहे. रविवारी 23 जून रोजी दोघांनी रजिस्टर लग्न केलं. दोघांच्या लग्नाचे फोटो सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. सोनाक्षी आणि इक्बाल यांनी रजिस्टर लग्न केलं आणि त्यानंतर ग्रँड रिसेप्शन आयोजित केलं होतं, यामध्ये वडीस शत्रुघ्न सिन्हा आणि आईदेखील देखील उपस्थित होते. पण, सोनाक्षीचे भाऊ लव सिन्हा आणि कुश सिन्हा लग्नाच्या फोटो आणि व्हिडीओमध्ये दिसले नाहीत. लवने काही दिवसापर्वी काही पोस्ट देखील शेअर केल्या होत्या, ज्यावरुन काहीतरी बिनसलं असल्याचं वाटत होतं.


सोनाक्षी सिन्हाच्या लग्नात भाऊ लव-कुश गैरहजर


सोनाक्षी सिन्हाच्या लग्नात  लग्नात भावाकडून होणाऱ्या विधी हुमा कुरेशीचा भाऊ साकिब सलीम याच्या हस्ते पार पडल्या. सोनाक्षी सिन्हा आणि झहीर इक्बाल यांचं लग्न थाटामाटात पार पडलं, पण जेव्हा लव आणि कुश सिन्हा एकाही फोटो किंवा व्हिडीओमध्ये दिसले नाहीत, तेव्हा चर्चांना उधाण आलं की पसरली की, बहीण सोनाक्षीसोबत मतभेद झाल्यामुळे दोन्ही भावांनी लग्नाला हजेरी लावली नाही. दरम्यान, लव सिन्हाची एक मुलाखत चर्चेत आहे, ज्यामध्ये तो सोनाक्षीच्या स्वभावाबद्दल बोलत आहे.


झहीर इक्बालसोबत लग्नाआधी भावाने उपस्थित केला होता प्रश्न


लव सिन्हाने गेल्या वर्षी सिद्धार्थ कन्ननला मुलाखत दिली होती. त्यामध्ये सिद्धार्थने लवला विचारले की, त्याचे वडील शत्रुघ्न सिन्हा आणि त्यांची बहीण सोनाक्षी खोटे बोलणाऱ्यांना सहजपणे ओळखू शकतात का? तेव्हा लव म्हणाला होता की, 'मला आणि माझा भाऊ (कुश) आम्हाला याबाबती समज खूप जास्त आहे. सोनाक्षीला यामध्ये आमच्यापेक्षा थोडी कमी समज आहे. त्यामुळे तिचा इंडस्ट्रीतील प्रवास खूप वेगळा आहे आणि माझ्या वडिलांनी नेहमी इतरांची मदत केली आणि  कधीही स्वत:चा स्वार्थ पाहिला नाही.


सोनाक्षीच्या लग्नाच्या बातमीवरही भावाचं मौन


यापूर्वी एका वृत्तपत्राला मुलाखतीत लव सिन्हाने बहिणीच्या लग्नाच्या बातमीवर प्रतिक्रिया दिली होती. त्यावेळीही त्याने या प्रकरणी मौन बाळगलं होतं. तो म्हणाला होता की, 'मी सध्या मुंबईबाहेर आहे आणि जर हे सोनाक्षीच्या लग्नाच्या बातम्यांशी संबंधित असेल, तर मी यावर भाष्य करू इच्छित नाही.' यामुळे कुटुंबात मतभेद झाल्याच्या बातम्या आल्या, लोकांनी अधिक चौकशी केली तेव्हा समोर आलं की सोनाक्षी आणि लव सिन्हा सोशल मीडियावर एकमेकांना फॉलो करत नाहीत.


लग्नाला गैरहजर असण्याबाबत लवची प्रतिक्रिया


लव-कुशने बहिणीच्या लग्नाला हजेरी न लावण्याचं कारण काय? या प्रश्नावर आता लव सिन्हाने मौन सोडलं आहे. लवच्या या वक्तव्याने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे. भाऊ लवची प्रतिक्रियाही समोर आली आहे. त्याच्या अनुपस्थितीचं कारण विचारलं असता त्याने हिंदुस्तान टाईम्सला सांगितलं की, 'कृपया एक-दोन दिवस द्या. मला वाटल्यास मी तुमच्या प्रश्नाचे उत्तर देईन.'