एक्स्प्लोर

Salman-Aishwarya Relationship : सलमान-ऐश्वर्याची लव्ह स्टोरीची कशी झाली सुरुवात? भाईजानच्या एक्स-गर्लफ्रेंडने सांगितलं...

Somy Ali On Salman-Aishwarya Relationship :  सलमान खानची एक्स गर्लफ्रेंड अभिनेत्री सोमी अलीने अलीकडेच ऐश्वर्या आणि सलमानच्या नात्याबद्दल कधीच समोर न आलेले किस्से शेअर केले आहेत.

Somy Ali On Salman-Aishwarya Relationship : कधीकाळी ऐश्वर्या राय (Aishwarya Rai) आणि सलमान खानच्या (Salman Khan) प्रेम प्रकरणाची चांगलीच चर्चा होती. संजय लीला भन्साळी यांच्या 1999 मध्ये आलेल्या 'हम दिल दे चुके सनम' चित्रपटाच्या सेटवर सलमान-ऐश्वर्या यांचे प्रेम जुळले होते. मात्र, काही वर्षातच सलमानच्या रागीट स्वभावामुळे आणि ऐश्वर्याला देत असलेल्या वागणुकीमुळे हे नाते तुटले. सलमान खानची एक्स गर्लफ्रेंड अभिनेत्री सोमी अलीने अलीकडेच ऐश्वर्या आणि सलमानच्या नात्याबद्दल कधीच समोर न आलेले किस्से शेअर केले आहेत.

सलमान खानसोबत ब्रेकअप झाल्यानंतर ऐश्वर्या रायने अभिनेता अभिषेक बच्चनशी लग्न केले. या दोघांना आराध्या ही मुलगी आहे. तर, सलमान खान अजूनही बॅचलर आहे. मात्र, ऐश्वर्यासोबत प्रेम प्रकरण सुरू होण्याआधी सलमान खान हा सोमी अलीसोबत रिलेशनशिपमध्ये होता.

सलमान-ऐश्वर्याचे अफेअर कसे सुरू झाले?

सलमान खान 1991 ते 1999 या दरम्यानच्या काळात सोमी अलीसोबत रिलेशनशिपमध्ये होता आणि त्यानंतर दोघांचे ब्रेकअप झाले.  या ब्रेकअप नंतर सलमान आणि ऐश्वर्या यांचे अफेअर झाले. 
नुकतंच 'झूम'ला दिलेल्या मुलाखतीत सोमी अलीने ऐश्वर्या आणि सलमानचे नाते कसे फुलले यावर भाष्य केले. तिने सांगितले की 'हम दिल दे चुके सनम'चे शूटिंग सुरू होते आणि तिने सलमानला फोन केला होता पण त्याने तिचा कॉल उचलला नाही.

सोमीने पुढे सांगितले की, "मी सलमानला फोन केला तेव्हा शूटिंग चालू होते पण त्याने फोन उचलला नाही. मग मी संजय लीला भन्साळीला फोन केला आणि ते म्हणाले, 'तो सध्या तुमच्याशी बोलू शकत नाही कारण तो शॉटमध्ये आहे. जर तो एका शॉटमध्ये, तू दिग्दर्शित का करत नाहीस?' माझे हे तर्क ऐकून भन्साळींना काय बोलावे ते समजले नाही.

सलमानच्या जिममध्ये येऊ लागली ऐश्वर्या... 

या मुलाखतीत बोलताना अभिनेत्री सोमी अलीने सांगितले की, ऐश्वर्या राय गॅलेक्सी अपार्टमेंटमधील सलमान खानच्या जिममध्ये येऊ लागली. हे दोघेही तळमजल्यावर राहत होते. सलमान आणि ऐश्वर्याची प्रेमकहाणी जीममध्ये सुरू झाली का, असे विचारले असता? यावर सोमी म्हणाली, "नाही, 'हम दिल दे चुके सनम'च्या शूटिंगदरम्यान ऐश्वर्या आणि सलमान प्रेमात पडले होते. माझी बाजू घेणाऱ्या आतील नोकरांकडून मला माहिती मिळत होती. त्यांच्या नात्यात काहीतरी घडतंय हे जाणवू लागले. त्यानंतर आता आपल्याला या नात्यात फार वेळ राहता येणार नसल्याचे वाटले, असेही सोमीने सांगितले. 

ऐश्वर्याने सांगितले होते सलमानच्या ब्रेकअपचे कारण...

सलमानसोबतच्या ब्रेकअपनंतर ऐश्वर्या रायने याविषयी कधीही भाष्य केले नाही. मात्र, 2002 मध्ये एका मुलाखतीत ऐश्वर्याने सलमानसोबतच्या ब्रेकअपचे कारण सांगितले होते. सलमानच्या सर्वात वाईट काळात ती कशी उभी राहिली आणि त्या बदल्यात त्याच्याकडून कशी अपमानास्पद वागणूक मिळाली, हे तिने सांगितले. जेव्हा ऐश्वर्या कॉल उचलत नव्हती तेव्हा सलमानने तिला त्रास दिला आणि स्वतःला दुखापत करण्याचा प्रयत्न केला आणि या सर्व कारणांमुळे एका स्वाभिमानी महिलेप्रमाणे तिने हे नाते संपवले असल्याचे तिने म्हटले होते. 

 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Ajit Pawar : इकडं पालकमंत्रिपदाचा पेच सुटता सुटेना, तिकडं अजितदादा घेणार नाशिकची डीपीडीसी बैठक, महायुतीत नेमकं काय घडतंय?
इकडं पालकमंत्रिपदाचा पेच सुटता सुटेना, तिकडं अजितदादा घेणार नाशिकची डीपीडीसी बैठक, महायुतीत नेमकं काय घडतंय?
Jasprit Bumrah: जसप्रीत बुमराह चॅम्पियन्स ट्रॉफी खेळणार की नाही? आज होणार मोठा निर्णय, रोहित शर्माचं टेन्शन मिटणार?
चॅम्पियन्स ट्रॉफीत जसप्रीत बुमराह टीम इंडियासोबत असणार की नाही? बीसीसीआय घेणार मोठा निर्णय
Tanaji Sawant Son: तानाजी सावंतांचा मुलगा घरच्यांना न सांगता बँकॉकला का गेला? पुणे पोलिसांनी ऋषिराजचा जबाब नोंदवला
तानाजी सावंतांचा मुलगा घरच्यांना न सांगता बँकॉकला का गेला? पुणे पोलिसांनी ऋषिराजचा जबाब नोंदवला
Santosh Deshmukh Murder Case: संतोष देशमुखांना मारल्यानंतर कराड गँग स्कॉर्पिओ गाडी सोडून पाठीला पाय लावून पळत सुटली; CCTV फुटेज आलं समोर
संतोष देशमुखांना मारल्यानंतर कराड गँग स्कॉर्पिओ गाडी सोडून पाठीला पाय लावून पळत सुटली; CCTV फुटेज आलं समोर
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Top 80 News : Superfast News : 8 AM : टॉप 70 बातम्यांचा वेगवान आढावा : ABP MajhaVaibhavi Santosh Deshmukh HSC Exam : वैभवी देशमुखची आजपासून बारावीची परीक्षाRushikesh Sawant :  Tanaji Sawant यांचा मुलगा ऋषिकेष सावंत पुण्यात परतला, नेमकं प्रकरण काय?Majha Gaon Majha Jilha : माझं गाव माझा जिल्हा : 7.30 AM : ABP Majha : Maharashtra News

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ajit Pawar : इकडं पालकमंत्रिपदाचा पेच सुटता सुटेना, तिकडं अजितदादा घेणार नाशिकची डीपीडीसी बैठक, महायुतीत नेमकं काय घडतंय?
इकडं पालकमंत्रिपदाचा पेच सुटता सुटेना, तिकडं अजितदादा घेणार नाशिकची डीपीडीसी बैठक, महायुतीत नेमकं काय घडतंय?
Jasprit Bumrah: जसप्रीत बुमराह चॅम्पियन्स ट्रॉफी खेळणार की नाही? आज होणार मोठा निर्णय, रोहित शर्माचं टेन्शन मिटणार?
चॅम्पियन्स ट्रॉफीत जसप्रीत बुमराह टीम इंडियासोबत असणार की नाही? बीसीसीआय घेणार मोठा निर्णय
Tanaji Sawant Son: तानाजी सावंतांचा मुलगा घरच्यांना न सांगता बँकॉकला का गेला? पुणे पोलिसांनी ऋषिराजचा जबाब नोंदवला
तानाजी सावंतांचा मुलगा घरच्यांना न सांगता बँकॉकला का गेला? पुणे पोलिसांनी ऋषिराजचा जबाब नोंदवला
Santosh Deshmukh Murder Case: संतोष देशमुखांना मारल्यानंतर कराड गँग स्कॉर्पिओ गाडी सोडून पाठीला पाय लावून पळत सुटली; CCTV फुटेज आलं समोर
संतोष देशमुखांना मारल्यानंतर कराड गँग स्कॉर्पिओ गाडी सोडून पाठीला पाय लावून पळत सुटली; CCTV फुटेज आलं समोर
Nashik News : खते-बियाण्यांमध्ये भेसळ, कृषी विभाग अ‍ॅक्शन मोडवर, नाशिकमध्ये 62  विक्रेत्यांविरोधात मोठी कारवाई
खते-बियाण्यांमध्ये भेसळ, कृषी विभाग अ‍ॅक्शन मोडवर, नाशिकमध्ये 62 विक्रेत्यांविरोधात मोठी कारवाई
ITR भरणाऱ्यांची संख्या वाढली, गेल्या पाच वर्षात प्राप्तिकर भरणाऱ्यांची संख्या 70 लाखांनी घटूनही सरकारच्या कमाईत जोरदार वाढ
ITR भरणाऱ्यांची संख्या 8 कोटींवर, करदात्यांची संख्या 70 लाखांनी घटली पण सरकारची कमाई वाढली
Guillain Barre Syndrome: पुण्यात ‘जीबीएस’चा आणखी एक बळी! एकूण रुग्णांच्या संख्येतही वाढ, 21 जण व्हेंटिलेटरवर
पुण्यात ‘जीबीएस’चा आणखी एक बळी! एकूण रुग्णांच्या संख्येतही वाढ, 21 जण व्हेंटिलेटरवर
Uday Samant : देवेंद्र फडणवीसांवर टीका करताना संयम ठेवा, उदय सामंतांचा जरांगेंना सल्ला
देवेंद्र फडणवीसांवर टीका करताना संयम ठेवा, उदय सामंतांचा जरांगेंना सल्ला
Embed widget