Padma Awards 2025 : केंद्र सरकारने प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला पद्म पुरस्कांची घोषणा केली. यावेळी कला, शिक्षण, विज्ञान, साहित्य आदी वेगवेगळ्या क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या दिग्गजांना पद्म पुरस्कार घोषित करण्यात आला. याच पद्म पुरस्कारांच्या घोषणेवर आता प्रसिद्ध गायक सोनू निगमने आपली नाराजी व्यक्त केली आहे. गायन क्षेत्रातील काही गायकांची नाव घेऊन त्यांना पद्म पुरस्काराने सन्मानित करायला हवे होते, अशा भावना सोनू निगमने व्यक्त केल्या आहेत.
सोनू निगम याने केली नाराजी व्यक्त
सोनू निगमने इन्स्टाग्राम खात्यावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये त्याने नुकतेच जाहीर करण्यात आलेल्या पद्म पुरस्कारांबद्दल मत व्यक्त केलं आहे. "भारतात असे काही गायक आहेत, ज्यांनी संपूर्ण जगातील गायकांना प्रेरणा दिलेली आहे. मोहम्मद रफी साहेबांना फक्त पद्मश्री पुरस्कार देण्यात आला. किशोर कुमार यांच्या नशिबात तर पद्मश्री पुरस्कारही नाही. हयात असलेल्या गायकांमध्ये अल्गा याज्ञिक आहेत. त्यांची कारकीर्द फार मोठी आणि दीर्घ आहे. त्यांना अद्याप कोणताही पुरस्कार मिळालेला नाही. श्रेया घोषाल आहे. त्यांनादेखील बऱ्याच काळापासून गाणे गात आहेत. त्यांनाही पद्म पुरस्कार मिळायला हवा. सुनिधी चौहान यादेखील त्यांनी कित्येक पिढ्यांना आपल्या आगळ्या-वेगळ्या आवाजाने प्रोत्साहित केलेले आहे. त्यांनाही आतापर्यंत काहीही मिळालेले नाही," असे मत सोनू निगमने व्यक्त केलं आहे.
समाजमाध्यमावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया
यासह गायन, अभिनय, विज्ञान, साहित्य असे किंवा अन्य कोणत्याही क्षेत्रात कार्यरत असणाऱ्यांना पुरस्कार मिळावा असे वाटत असेल तर कमेंट्समध्ये कळवा, असे आवाहनही त्याने आपल्या चाहत्यांना केले आहे. सोनू निगमने या भावना व्यक्त केल्याने समाजमाध्यमावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत.
एकूण 139 पद्म पुरस्कारांची घोषणा
दरम्यान, प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला एकूण 139 पद्म पुरस्कारांची घोषणा करण्यात आली. यातील सात पुरस्कार हे पद्म विभूषण आहेत. 19 जणांना पद्म भूषम पुरस्कार जाहीर झालेला आहे. तर 113 जणांना पद्मश्री पुरस्कार जाहीर झालेला आहे. यात कला क्षेत्रातील अनेकांचा सहभाग आहे. मराठी सिनेसृष्टीतील अभिनेते अशोक सराफ, गायक अरिजित सिंह, पंकज उधास (मरणोत्तर) आदी दिग्गजांनाही वेगवेगळे पद्म पुरस्कार जाहीर झाले आहेत.
हेही वाचा :