Salil Ankola : मराठमोळ्या सचिन तेंडुलकरला क्रिकेटपटूला क्रिकेटचा देव म्हटलं जातं. भारतासोबतच जगभरात त्याचे आजही लाखोंनी चाहते आहेत. आजही तो मैदानावर गेल्यावर त्याच्या नावाचा जयघोष होतो. सचिनने त्याचं सर्वस्व क्रिकेटला वाहून दिलं होतं. त्यामुळेच आज तो एवढ्या मोठ्या उंचीवर जाऊन पोहोचलेला आहे. मात्र सचिनसोबत खेळणारे इतरही काही अनोखे खेळाडू होते, ज्यांनी आपला काळ चांगलाच गाजवलेला आहे. सचिनचा बालपणीचा मित्र म्हणून विनोद कांबळीचे नाव प्रामुख्याने घेतले जाते. मात्र सचिनसोबत क्रिकेट खेळाणारा असाही एक जिगरबाज खेळाडू होता, ज्याने क्रिकेटचं मैदान तर गाजवलंच पण अनपेक्षित घटनेनंतर क्रिकेट सोडून त्याने अभिनय क्षेत्रातही मोठं नाव कमवलं. 

सलील अंकोला मुळचे सोलापूरचे

या खेळाडूचे नाव सलील अंकोला असे आहे. सचिन तेंडुलकरने 11 मे 2017 रोजी त्याचा सलील अंकोलासोबतचा एक फोटो फेसबुकवर शेअर केला होता. विशेष म्हणजे माझ्या क्रिकेटच्या कारकि‍र्दीत मला अनेक नामवंत खेळाडूंसोबत खेळण्याचा मान लाभलेला आहे. याच नामवंत खेळाडूंमध्ये सलील अंकोला हेदेखील होते, असे सचिनने म्हटले होते. त्यानंतर आता टीम इंडियाचे माजी क्रिकेटर सलील अंकोला हे मुळचे सोलापूरचे आहेत. त्यांनी भारतीय संघात असताना वेगवान गोलंदाजी केलेली आहे. त्यांनी रणजी ट्रॉफीमध्ये महाराष्ट्र आणि मुंबई संघाकडून क्रिकेट खेळलेलं आहे. त्यांनी आपल्या क्रिकेटच्या करिअरमध्ये एकूण 54 फस्ट क्लास क्रिकेटचे सामने खेळले.

करिअरमध्ये एकूण 251 विकेट्स घेतल्या

सलील अंकोला यांनी टीम इंडियाकडून एकूण 20 एकदीवसीय सामने खेळलेले आहेत. यासह ते कसोटी सामन्यांतही भारतीय संघातून खेळलेले आहेत. त्यांनी एकदीवसीय सामन्यांत 13 तर कसोटी सामन्यांत 2  बळी घेतलेले आहेत. त्यांनी त्यांच्या क्रिकेटच्या एकूण करिअरमध्ये एकूण 251 विकेट्स घेतलेल्या आहेत.

सचिन, द्रविड गांगुलीसोबत खेळलं क्रिकेट

अंकोला यांनी त्यांचा पहिला आंतरराष्ट्रीय सामना 15 नोव्हेंबर 1989 रोजी पाकिस्तानविरोधात खेळला होता. त्यांचा हा पहिलाच सामना शेवटचा टेस्ट सामना ठरला. त्यांनी त्याच वर्ष एकदिवसीय सामन्यांतही पदार्पण केलं होतं. अंकोला यांनी आपल्या करिअरमधील शेवटचा सामना 1997 साली खेळला. त्यांनी सचिन, राहुल द्रविड, सौरभ गांगुली यांच्यासोबत क्रिकेट खेळलेलं आहे.

नंतर अभिनय क्षेत्राकडे वळवला मोर्चा

दरम्यान, त्यांनी क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर अभिनय क्षेत्रात पाऊल ठेवलं. त्यांनी सर्वांत अगोदर चाहत और नफरत मालिकेत काम केलं. त्यानंतर त्यांनी कुरुक्षेत्र या चित्रपटात काम केले. पिता, चुरा लिया है तुमने, सायलेन्स प्लिज, द ड्रेसिंग रुम यासारख्या चित्रपटांत काम केलं. सलील हे बिग बॉसच्या पहिल्या सिझनमध्येही आले होते. 

हेही वाचा :

सुंदर डोळ्यांच्या मोनालिसाला थेट बॉलिवुडमधून ऑफर, माळा विकणारी तरुणी आता थेट हिरोईन होणार!

कधीकाळी 50 रुपयांसाठी मजुरी केली, आता मात्र कोटींचा मालक, शाहरुख खानचा संघर्ष वाचून तुम्हीही व्हाल थक्क!