Nikita Gandhi Concert: शनिवारी (25 नोव्हेंबर) रात्री केरळमधील कोची (Kochi) येथील कोचीन विद्यापीठामध्ये (Cochin University)  गायिका निकिता गांधीच्या (Nikita Gandhi) कॉन्सर्टचे आयोजन करण्यात आले होते. या कॉन्सर्टच्या आधी चेंगराचेंगरी झाली. ज्यामध्ये चार विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला आणि 60 हून अधिक विद्यार्थी जखमी झाले.


राज्याच्या आरोग्य मंत्री वीणा जॉर्ज यांनी सांगितलं की,  60 हून अधिक लोकांवर कलामासेरी मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटल आणि इतर काही हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. आणखी चार विद्यार्थ्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे देखील वीणा जॉर्ज यांनी सांगितले.


कॉन्सर्टपूर्वी घडली घटना


पावसामुळे कोचीन विद्यापीठात चेंगराचेंगरी झाली. पाऊस पडताच लोकांची धावपळ सुरू झाली आणि हा अपघात झाला. निकिता गांधींच्या कॉन्सर्टदरम्यान चेंगराचेंगरी झाल्याचे आधी सांगण्यात आले होते, पण नंतर अधिकाऱ्यांनी सांगितले की, निकिता गांधीच्या कॉन्सर्टपूर्वी ही घटना घडली होती. 


पीटीआय वृत्तसंस्थेनुसार, अतिरिक्त पोलीस महासंचालक (एडीजीपी) एमआर अजित कुमार यांनी सांगितले की, ज्या ठिकाणी कॉन्सर्टचं आयोजन करण्यात आलं होतं त्या ठिकाणी अचानक मुसळधार पाऊस सुरू झाला. प्रेक्षक पायऱ्यांचा वापर करून सभागृहात पोहोचले, ज्यामुळे चेंगराचेंगरी झाली.


निकिता गांधीनं व्यक्त केला शोक


निकिता गांधीनं कॉन्सर्टच्या सुरु होण्याआधी घडलेल्या घटनेनंतर सोशल मीडियावर भावनिक पोस्ट शेअर केली. या पोस्टमधून तिनं कॉन्सर्टच्या आधी झालेल्या घटनेत मृत्यूमुखी पडलेल्या विद्यार्थांना श्रद्धांजली वाहिली आहे. तिनं पोस्टमध्ये लिहिलं, "आज संध्याकाळी कोचीमध्ये घडलेल्या घटनेमुळे  दु:खी  झाले. मी कार्यक्रमाच्या ठिकाणी जाण्यापूर्वीच अशी दुर्दैवी घटना घडली. हे दु:ख व्यक्त करण्यासाठी शब्दच पुरेसे नाहीत."






जाणून घ्या निकिता गांधीबद्दल...


निकिता गांधी ही  32 वर्षीय पार्श्वगायिका आहे. 'राबता' चित्रपटाचं टायटल साँग निकिता गांधीनं गायलंय. या गाण्यामुळे तिला विशेष लोकप्रियता मिळाली.'आओ कभी हवेली पे', उल्लू का पट्ठा आणि  'पोस्टर लगवा दो'  ही गाणी देखील निकितानं गायली आहे.काही दिवसांपूर्वी रिलीज झालेल्या  'टायगर 3'  या चित्रपटातील लेके प्रभू का नाम हे गाणं देखील निकितानं गायलं आहे.


संबंधित बातम्या


Rajkumar Kohli Passed Away : 'नागिन', 'जानी दुश्मन'चे दिग्दर्शक राजकुमार कोहली यांचे निधन; वयाच्या 95 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास