Rajkumar Kohli : हिंदी मनोरंजनसृष्टीतील लोकप्रिय सिने-दिग्दर्शक आणि निर्माते राजकुमार कोहली (Rajkumar Kohli) यांचे निधन झाले आहे. वयाच्या 95 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. राजकुमार यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाल्याचं समोर आलं आहे. आज संध्याकाळी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येतील. 


कुटुंबियांनी दिलेल्या माहितीनुसार, राजकुमार कोहली आज सकाळी (24 नोव्हेंबर 2023) आंघोळीसाठी बाथरुममध्ये गेले होते. पण उशिरापर्यंत ते बाहेर न झाल्याने तसेच त्यांचा काही आवाजही न आल्याने त्यांचा मुलगा अरमान कोहलीने (Armaan Kohli) दरवाजा तोडला आणि वडिलांना बाहेर काढलं. त्यानंतर लगेचच त्यांना रुग्णालयात नेण्यात आले. पण हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचा मृत्यू झाल्याचं समोर आलं आहे. मुंबईतील जुहू परिसरातील एका बंगल्यात ही घटना घडली आहे.


'या' सिनेमाचे दिग्दर्शक होते राजकुमार कोहली (Rajkumar Kohli Movies)


राजकुमार कोहली यांनी अनेक गाजलेल्या सिनेमांच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे. नागिन, जानी दुश्मन, बीवी नौकर का, बदले की आग, राज तिलक, जीने, नहीं दूंगा, इंतकाम, बीस साल बाद सारख्या अनेक सिनेमाचं दिग्दर्शन त्यांनी केलं आहे. 'नागिन' आणि 'जानी दुश्मन' हे  त्यांचे सिनेमे सुपरहिट ठरले होते. 


राजकुमार कोहली यांचा सिनेप्रवास...


'जानी दुश्मन' हा मल्टीस्टार सिनेमा आहे. या सिनेमात अक्षय कुमार, सनी देओल, सुनील शेट्टी, सोनू निगम, अरमान कोहली मुख्य भूमिकेत होते. 2002 मध्ये हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. राजकुमार कोहली यांनी आपल्या लेकाला म्हणजेच अरमानला 1992 रोजी 'विरोधी' या सिनेमाच्या मआध्यमातून बॉलिवूडमध्ये लॉन्च केलं होतं. 


राजकुमार कोहली यांचा जन्म 1930 रोजी झाला. 1960 रोजी त्यांनी आपल्या सिनेक्षेत्रातील करिअरची सुरुवात केली. 1963 मध्ये 'सपनी' या सिनेमाच्या माध्यमातून त्यांनी मनोरंजनसृष्टीत पदार्पण केलं. पण 'नागिन' या सिनेमाच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने त्यांना लोकप्रियता मिळाला. त्यानंतर त्यांचा 'जानी दुश्मन' हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला. हा भारतातील पहिला हॉरर सिनेमा होता. 


राज कुमार यांचा मुलगा अरमानने बालकलाकार म्हणून सिनेसृष्टीत पदार्पण केलं. राजकुमार यांच्या 'बदले की आग' आणि 'राज तिलक' या सिनेमात त्याने काम केलं आहे. त्यानंतर 'विरोधी' या सिनेमात अरमान मुख्य भूमिकेत झळकला. अरमान 'बिग बॉस 7' (Bigg Boss 7) या कार्यक्रमात सहभागी झाला होता. या वादग्रस्त कार्यक्रमाच्या माध्यमातून तो घराघरांत पोहोचला. आता राजकुमार कोहली यांच्या निधनाने अरमानसह इंडस्ट्रीला मोठा धक्का बसला आहे.


संबंधित बातम्या


Vicky Kaushal : 'सॅम बहादुर'च्या रिलीजआधी विकी कौशल पोहोचला अमृतसरला; सुवर्ण मंदिराचं घेतलं दर्शन