TV Actresses Bollywood Exprience : बॉलीवूड इंडस्ट्रीतील सुंदरींची नेहमीच चाहत्यांमध्ये चर्चा असते. चाहत्यांना 90 च्या दशकापासून आजपर्यंतच्या अभिनेत्रींबद्दल अधिकाधिक गोष्टी जाणून घ्यायच्या असतात, परंतु आता टीव्ही अभिनेत्री देखील मागे नाहीत. अनेक टीव्ही अभिनेत्रींनी आपल्या दमदार अभिनयाने बॉलिवूडमध्ये स्थान निर्माण केले आहे, तर काही सौंदर्यवती आपल्या लोकप्रियतेच्या जोरावर बॉलिवूड अभिनेत्रींना टक्कर देत आहेत. हे सर्व केल्यानंतरही अनेक टीव्ही सौंदर्यवतींनी बॉलिवूडमधील टीव्ही कलाकारांसोबत होणाऱ्या भेदभावाबद्दल बेधडकपणे बोलल्या आहेत. 


अनेक टीव्ही अभिनेत्रींनी बॉलिवूड आणि या इंडस्ट्रीतील डिझायनर्सबद्दल बेधडकपणे बोलल्या आहेत. जाणून घेऊ त्यांना आलेल्या अनुभवाबद्दल...


देवोलीना भट्टाचार्जी (Devoleena Bhattacharjee)


देवोलिना भट्टाचार्जीने बॉलिवूडमधील टीव्ही स्टार्सना होत असलेल्या भेदभावाबद्दल संताप व्यक्त केला होता. देवोलिना म्हणाली होती की, आजही जेव्हा आम्ही चित्रपटाच्या ऑडिशनसाठी जातो तेव्हा बहुतेक वेळा 'तू टीव्ही अभिनेत्री आहेस' असा टॅग लावून नाकारलं जाते. आम्ही सर्वजण अतिशय आदराने काम करत आहोत. टीव्ही कलाकारांना कमी लेखण्याचा ट्रेंड अजूनही आहे.


एरिका फर्नांडिस (Erica Fernandes)


एरिका फर्नांडिसने टीव्ही आणि बॉलिवूड इंडस्ट्री सोडून दुबईला स्थलांतर केले आहे. या अभिनेत्रीने बॉलिवूडचाही पर्दाफाश केला. ती बॉलीवूडमधील गटबाजीबद्दल बोलली होती, ज्यामुळे टीव्ही स्टार्सना त्रास होतो. एरिकाने सांगितले होते की, बॉलीवूडचे लोक टीव्ही जगतातील स्टार्सना नेहमीच तुच्छतेने पाहतात. बॉलिवूड स्टार्स नेहमीच टीव्ही इंडस्ट्रीतील स्टार्ससोबत भेदभाव करतात.


करिश्मा तन्ना (Karishma Tanna)


करिश्मा तन्ना त्या रिअॅलिटी शोबद्दल बोलली जिथे टीव्ही स्टार्सना स्पर्धक बनवले जातात आणि बॉलीवूड स्टार्स त्या शोमध्ये जज म्हणून येतात. टीव्ही स्टार्स 9-10 तास काम करूनही अशी वागणूक सहन करतात, असे तिचं मत आहे.


महिमा मकवाना (Mahima Makwana)


महिमा मकवानाने सलमान खानच्या 'अंतिम' या चित्रपटातून टीव्हीनंतर थेट बॉलिवूडमध्ये प्रवेश केला, पण त्याचा तिला फायदा झाला नाही. महिमाने खुलासा केला की, चित्रपटांमध्ये काम केल्यानंतरही ती इंडस्ट्रीत टीव्ही स्टारसारखीच पाहिली जाते. अनेक बड्या डिझायनर्सनीही कपडे देण्यास साफ नकार दिला होता, असेही तिनं सांगितलं. 


निया शर्मा (Nia Sharma)


निया शर्माही मोकळेपणाने बोलली आहे. ज्यात तिने सांगितले की, तिनेही तिच्या करिअरमध्ये 'यार आप तो टीवी से हो' हे अनेकदा ऐकले आहे. 


रश्मी देसाई (Rashami Desai)


रश्मी देसाई टॉप टीव्ही अभिनेत्री आहे. टीव्ही स्टार्सना चित्रपटांमध्ये भूमिका मिळणे फारच दुर्मिळ असल्याचे ती म्हणते.  अभिनेत्रीने तिच्या मुलाखतीत खुलासा केला की तिला टीव्ही स्टार म्हणवून नाकारले जाते आणि कधीही कोणत्याही चित्रपटात भूमिका मिळत नाही.


रुपाली गांगुली (Rupali Ganguly)


रुपाली गांगुलीने बॉलिवूडमध्ये तिला भेडसावणाऱ्या अडचणींबद्दल सांगितले होते. अभिनेत्रीने सांगितले होते की, तिला बॉलिवूडमध्ये कास्टिंग काउचचा सामना करावा लागला होता, त्यामुळे तिने अभिनय करिअर सोडण्याचा निर्णय घेतला होता. कास्टिंग काउचमुळे त्रस्त झाल्यानंतरच रुपाली गांगुलीने टीव्ही इंडस्ट्रीत प्रवेश केला.


रिद्धी डोगरा (Ridhi dogra)


जवान या चित्रपटात शाहरुख खानसोबत रिद्धी डोगरा दिसली होती. बॉलिवूड इंडस्ट्रीत क्रिएटिव्ह गोष्टी घडत नाहीत, असं रिद्धी डोगरा मानते. बंदिस्त आणि व्यावसायिक मानसिकतेचा हा उद्योग असल्याचे अभिनेत्रीने सांगितले होते.


हिना खान (Hina Khan)


हिना खान सुद्धा टॉप टीव्ही अभिनेत्री आहे, जी अनेक शोचा भाग राहिली आहे. हिनाने बिग बॉसमध्येही खळबळ उडवून दिली होती. आजकाल हिना खान अनेक चित्रपट करत आहे. हिनाने तिच्या एका मुलाखतीत सांगितले होते की, भारतातील अनेक मोठे डिझायनर टीव्ही स्टार्सना कपडे पुरवतात त्यांना स्पष्टपणे नाकारतात.


इतर महत्वाच्या बातम्या