Shruti Haasan: 'या शब्दाची मला भिती वाटते'; लग्नाबाबत विचारण्यात आलेल्या प्रश्नाला कमल हासनच्या लेकीनं दिलेल्या उत्तरानं वेधलं लक्ष!
Shruti Haasan:
Shruti Haasan On Marriage Plans: अभिनेत्री श्रुती हासन (Shruti Haasan) तिच्या लूक आणि स्टायलिश अंदाजामुळे अनेकदा चर्चेत असते. याशिवाय श्रुती ही तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे देखील चर्चेत असते. श्रुती ही गेल्या काही दिवसांपासून शंतनू हजारिकासोबत (Santanu Hazarika) रिलेशनशिपमध्ये आहे. अनेक मुलाखतींमध्ये श्रुतीला लग्नाबद्दल प्रश्नचिन्ह विचारण्यात आले आहेत. अशातच पुन्हा एकदा एका मुलाखतीत श्रुतीला तिच्या लग्नाबद्दल प्रश्न विचारण्यात आला. या प्रश्नाला श्रुतीनं दिलेल्या उत्तरानं अनेकांचे लक्ष वेधले आहे.
मला लग्न या शब्दाची खूप भीती वाटते: श्रुती हासन
श्रुती हासनने नुकत्याच एका मुलाखतीमध्ये स्पष्टपणे सांगितले आहे की, सध्या तिचा लग्नाचा कोणताही विचार नाही. जेव्हा मुलाखतीमध्ये श्रुतीला लग्नाबद्दल प्रश्न विचारण्यात आला तेव्हा ती म्हणाली, 'मला लग्न या शब्दाची खूप भीती वाटते. यामध्ये बरेच काही आहे, ज्याचा मला खरोखर विचार करायचा नाही. ", श्रुतीनं दिलेल्या या उत्तरानं अनेकांचे लक्ष वेधले.
बॉयफ्रेंडबद्दल काय म्हणाली श्रुती?
श्रुतीनं तिचा बॉयफ्रेंड शंतनूसोबत असलेल्या बॉन्डबद्दल देखील सांगितले. ती म्हणाली, 'त्याच्यासोबत राहून, त्याच्यासोबत चांगले काम करताना आणि एकत्र वेळ घालवताना मला आनंद वाटतो. आम्ही कठीण काळात एकमेकांना साथ देतो. संघर्षाच्या वेळी तुमच्या सोबत कोणीतरी असेल तर बरे वाटते. सर्वकाही एकट्याने हाताळण्यापेक्षा हे चांगले आहे. मला वाटत नाही की आम्ही जे बॉन्ड शेअर करतो त्यापेक्षा चांगले काही आहे."
View this post on Instagram
श्रुती हासनचे आगामी चित्रपट
श्रुती हासन नुकतीच 'वॉल्टेअर वीराया' चित्रपटात दिसली होती. केएस रवींद्र यांनी दिग्दर्शित केलेला हा अॅक्शन ड्रामा चित्रपट होता. या चित्रपटात श्रुतीशिवाय चिरंजीवी आणि रवी तेजा यांनी देखील महत्वाची भूमिका साकारली होती. श्रुती ही सालार: भाग 1 या चित्रपटात प्रभाससोबत दिसणार आहे. तिचा हॉलिवूड चित्रपट 'द आय' देखील लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. रमैय्या वस्तावैय्या या हिंदी चित्रपटामध्ये देखील श्रुतीनं काम केलं आहे. श्रुतीच्या आगामी चित्रपटांची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत.
इतर महत्वाच्या बातम्या:
Shruti Haasan: अभिनेत्री श्रुती हसन करतेय या आजाराचा सामना; पोस्ट शेअर करत दिली माहिती