Shraddha Kapoor And Rahul Mody : बॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूर (Shraddha Kapoor) नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते. आतापर्यंत तिने अनेक सुपरहिट सिनेमांत काम केलं आहे. एका दशकापेक्षा अधिक काळ ती इंडस्ट्रीमध्ये काम करते आहे. आपल्या दमदार अभिनयाने तिने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. पण आता अभिनेत्री वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आली आहे. श्रद्धा कपूर आणि राहुल मोदी (Rahul Mody) रिलेशनमध्ये असल्याच्या चर्चा काही दिवसांपासून सुरू आहेत. अशातच आता दोघांच्या नात्यासंदर्भात नवी माहिती समोर आली आहे.


श्रद्धा कपूरने आपल्या अभिनयाच्या जोरावर अल्पावधीतच प्रेक्षकांच्या मनावर विशेष स्थान निर्माण केलं आहे. अभिनेत्रीचा मोठा चाहतावर्ग आहे. चाहते गेल्या अनेक दिवसांपासून श्रद्धाच्या लग्नाची आतुरतेने वाट पाहत आहेत. श्रद्धा सध्या तिच्या लव्ह-लाईफमुळे चर्चेत आहे. श्रद्धा कपूर आणि पटकथाकार, लेखक राहुल मोदी (Shraddha Kapoor Rahul Mody Relationship) रिलेशनमध्ये असल्याची चर्चा आहे. आता त्यांच्या नात्यासंदर्भात नवी अपडेट समोर आली आहे. 


हिंदुस्तान टाइम्सच्या रिपोर्टनुसार, श्रद्धा कपूर आणि राहुल मोदी यांना त्यांचं नातं गुलदस्त्यात ठेवायचं नाही. दोघांनीही एकमेकांचा जोडीदार म्हणून स्वीकार केला आहे. एकमेकांसोबत वेळ घालवायला दोघांनाही आवडतं. श्रद्धा आणि राहुल दोघांच्याही घरी त्यांचं नातं मान्य आहे. सध्या दोघेही आपलं नातं आणखी पुढे घेऊन जाण्याचा विचार करत आहेत. मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांचा मुलगा अनंत अंबानी आणि राधिका मर्चेंट (Radhika Merchant) यांच्या प्री-वेडिंगला श्रद्धा कपूर आणि राहुल मोदी एकत्र दिसून आले होते. दोघांचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. 


श्रद्धा कपूरचा 'हा' सिनेमा लिहिलाय राहुल मोदीने


'तू झूठी मैं मक्कार' (Tu Jhoothi Main Makkaar) या सिनेाच्या शूटिंगदरम्यान श्रद्धा कपूर आणि राहुल मोदी यांची जवळीक वाढली. श्रद्धा आणि राहुलने अद्याप त्यांच्या नात्याबद्दल चाहत्यांना अधिकृत माहिती दिलेली नाही. राहुलआधी श्रद्धा लोकप्रिय फोटोग्राफर रोहन श्रेष्ठसोबत रिलेशनमध्ये होती. चार वर्षांच्या रिलेशननंतर त्यांचा ब्रेकअप झाला. 'तू झूठी मैं मक्कार' या सिनेमाचं लेखन राहुल मोदीने केलं आहे. राहुल मोदी लोकप्रिय लेखन असून अनेक सिनेमांसाठी त्याने लेखन केलं आहे. 


श्रद्धा कपूरचा सिनेप्रवास (Shraddha Kapoor Movies)


श्रद्धा कपूरचा 'तू झूठी मैं मक्कार' हा सिनेमा 2023 मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. श्रद्धाचा आगामी 'स्त्री 2' हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तिने 2013 मध्ये 'आशिकी 2' या सिनेमाच्या माध्यमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. तिचा पहिलाच चित्रपट चांगलाच गाजला. या सिनेमासाठी तिला फिल्मफेअर सर्वोत्तकृष्ट अभिनेत्रीचं नामांकन मिळालं होतं. अभिनेत्रीच्या आगामी सिनेमांची चाहत्यांना प्रतीक्षा आहे.


संबंधित बातम्या


Aditya Roy Kapur Shraddha Kapoor : आदित्यने श्रद्धाला मारली मिठी पण अनन्या तर शेजारीच होती, सोशल मीडियावर नेटकरी म्हणतात....