Lata Mangeshkar : देशातील श्रीमंत उद्योगपती मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांच्या लाडका लेक अनंत अंबानी (Anant Ambani) आणि राधिका मर्चेंट यांचा रॉयल प्री-वेडिंग कार्यक्रम नुकताच पार पडला. प्री-वेडिंगसाठी गुजरातमधील जामनगरमध्ये बॉलिवूड सेलिब्रिटींनी गर्दी केली होती. तीन दिवस चालणाऱ्या प्री-वेडिंगला भारतासह परदेशातील दिग्गज सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती. हॉलिवूडची प्रसिद्ध पॉप स्टार रिहानापासून (Rihana) दिलजीत दोसांझ (Diljit Dosanjh), अरिजीत सिंह (Arjit Singh), श्रेया घोषाल (Shreya Ghoshal) अशा मोठ्या कलाकारांनी गाणी गायली. पण या सगळ्यात चर्चेत आल्या त्या दिवंगत गानकोकिळा लता मंगेशकर (Lata Mangeshkar) आणि कंगना रनौतची (Kangana Ranaut).
कंगनाने केली स्वत:ची तुलना लता दीदींसोबत
कंगनाने नेहमीप्रमाणे प्री-वेडिंगदरम्यानही सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली होती. कंगनाने लिहिलं होतं,"मी कधीही कोणत्या पुरस्कार सोहळ्याला गेलेली नाही. पैसा आणि प्रसिद्धी याला नाही म्हणण्यासाठी तुमच्याकडे अभिमानाची गरज असते. युवापिढीला एक गोष्ट समजण्याची गरज आहे की सर्वात मोठी संपत्ती प्रामाणिकपणा आहे. कंगनाने तिच्या पोस्टमध्ये कोणाचंही नाव घेतलेलं नाही. याच पोस्टमध्ये तिने पुढे स्वत:ची तुलना लता मंगेशकर यांच्यासोबत केली आहे. तिने लता मंगेशकर आणि आशा भोसले (Asha Bhosle) यांची एक बातमी शेअर केली आहे. यात लता मंगेशकरांनी एका लग्नात गाणं गाण्यासाठी त्यांना आलेली कोट्यवधी रुपयांची ऑफर नाकारली असल्याचं म्हटलं आहे.
लता मंगेशकरांनी नाकारलेली कोट्यवधींची ऑफर
आशा भोसले (Asha Bhosle) यांनी याआधी एका कार्यक्रमात लता दीदींचा किस्सा शेअर केला होता. आशा भोसले म्हणाल्या होत्या,"कोणीतरी आम्हाला लग्नाचं आमंत्रण दिलं होतं. त्यांच्याकडे मिलियन डॉलरची तिकीटे होती. त्यांनी म्हटलं, मी आणि लता दीदी अशा आम्ही दोघींनी परफॉर्म करावं, अशी त्यांची इच्छा होती. दीदीने मला विचारलं, तू लग्नात गाणार का? मी म्हटलं मी गाणार नाही. मग पुढे संबंधित मॅनेजरला कळवलं की, जर तुम्ही आम्हाला 10 कोटी डॉलर ऑफर केले तरी आम्ही लग्नात गाणार नाही. कारण आम्ही लग्नात गात नाही. तो व्यक्ती त्यामुळे फारच निराश झाला होता". अशाप्रकारे आशा भोसले आणि लता मंगेशकर यांनी लग्नात गाण्यासाठी आलेली कोट्यवधी रुपयांची ऑफर धुडकावून लावली होती.
मुकेश अंबानी यांची लेक ईशा अंबानी (Isha Ambani) 2018 मध्ये लग्नबंधनात अडकली. या लग्नात लता मंगेशकर उपस्थित राहू शकल्या नव्हत्या. मात्र त्यांनी एका स्पेशल संदेशासह गायत्रीमंत्र आणि गणेशस्त्रोत रेकॉर्ड करुन पाठवलं होतं. याची रेकॉर्डिंग गुजराती आणि हिंदी पूजेदरम्यान वाजवण्यात आली होती.
संबंधित बातम्या