Rishabh Pant Urvashi Rautela : अभिनेत्री उर्वशी रौतेला (Urvashi Rautela) आपल्या सिनेमांपेक्षा वैयक्तिक आयुष्यामुळे जास्त चर्चेत असते. अनेकदा तिचं नाव क्रिकेटर ऋषभ पंतसोबत (Rishabh Pant) जोडलं जातं. दोघांचेही चाहते त्यांच्या लग्नाची आतुरतेने वाट पाहत आहेत. चाहते बऱ्याचदा त्यांची मजा घेतानादेखील दिसून येतात. ऋषभचा अपघात झाला तेव्हा उर्वशी त्याला भेटायला रुग्णालयात गेली होती. उर्वशी आणि ऋषभ लग्न करणार असल्याच्या अफवा पसरवल्या गेल्या आहेत. आता 'फिल्मी ज्ञान'ला दिलेल्या मुलाखतीत उर्वशीने ऋषभसोबत लग्न करणार की नाही यावर भाष्य केलं आहे. अभिनेत्रीच्या उत्तराने चाहते हैराण झाले आहेत. 


ऋषभसोबत लग्न करणार उर्वशी रौतेला? (Urvashi Rautela Reaction on Marry Rishabh Pant)


उर्वशी रौतेला 'फिल्मी ज्ञान'ला दिलेल्या मुलाखतीत म्हणाली की,"आयुष्यात मी प्रेमदेखील केलं आणि माझा ब्रेकअपदेखील झाला आहे". दरम्यान एका चाहत्याने उर्वशीला प्रश्न विचारला की,"ऋषभ पंतला कधी विसरू नको. ऋषभ तुझा खूप आदर करतो आणि कायम तो तुला आनंदी ठेवेल. तू ऋषभसोबत लग्न केलंस तर आम्हाला आवडेल". चाहत्याचा हा प्रश्न व्यस्थित ऐकून घेतल्यानंतर प्रतिक्रिया देत उर्वशी म्हणते,"या प्रश्नात मला काहीही इंटरेस्ट वाटत नाही. यावर काहीही बोलण्याची माझी इच्छा नाही". 


उर्वशीला जोडीदार म्हणून हवाय 'असा' मुलगा


मुलाखतीदरम्यान उर्वशीला अनेक सेलिब्रिटींना वेगवेगळे हॅशटॅग देण्यास सांगण्यात आले. दरम्यान ऋषभचं नाव समोर आल्यानंतर उर्वशीने '#Health' असं म्हटलं. पुढे उर्वशीला आयुष्यात जोडीदार म्हणून कसा मुलगा हवाय असा प्रश्न विचारण्यात आला. याचं उत्तर देत म्हणाली म्हणाली,"मला आयुष्यात जोडीदार म्हणून संस्कारी, साधा सरळ आणि सालस मुलगा हवा आहे". 


'अशा' सुरू झाल्या उर्वशी आणि पंतच्या डेटिंगच्या चर्चा


उर्वशी रौतेला आणि ऋषभ पंत यांचं नाव 2022 पासून जोडलं जात आहे. 2022 मध्ये एका मुलाखतीत उर्वशीने ऋषभचं नाव न घेता त्याच्यावर निशाणा साधला होता. मुलाखतीत तिने 'मिस्टर RP' असा उल्लेख करत त्याच्यासोबतचं नातं तुटलं असल्याचं म्हटलं होतं. त्यानंतर नेटकऱ्यांनी RP म्हणजे Rishabh Pant असा अंदाज बांधला. 


भारतीय क्रिकेटर ऋषभ पंत सध्या 'आयपीएल 2024'मुळे (IPL 2024) चर्चेत आहे. दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals) या टीमचा तो कॅप्टन आहे. अपघातानंतर ऋषभने 454 दिवसांनंतर मैदानावर कमबॅक केलं आहे. अशातच आता उर्वशीच्या प्रतिक्रियेने चाहते हैराण झाले आहेत. आयपीएलमध्ये 98 मॅच खेळल्या आहेत. ऋषभच्या कमबॅकची चाहते आतुरतेने वाट पाहत होते. आता दिल्लीचं नेतृत्व करत अभिनेत्याने जोरदार कमबॅक केलं आहे.


संबंधित बातम्या


Urvashi Rautela on Sushmita Sen : 'तिने माझ्याकडून मिस युनिवर्सचा क्राऊन काढून घेतला अन् सिनेसृष्टीत येण्यासाठीही...', उर्वशी रौतेलाचे सुष्मिता सेनवर सनसनाटी आरोप