Aditya Roy Kapur Ananya Pande and Shraddha Kapoor : आदित्य रॉय कपूर (Aditya Roy Kapur) आणि अनन्या पांडे (Ananya Pande) यांच्या रिलेशनशिपच्या चर्चा सध्या सगळीकडे होतायत. त्यातच हे दोघेही अनंत अंबानी आणि राधिका मर्चंटच्या प्री-वेडिंग कार्यक्रमासाठी पोहचले आहेत. पण या सोहळ्यासाठी जाताना मुंबई विमानतळावर कॅमेऱ्यामध्ये एक फोटो आला आणि नेटकऱ्यांनी त्यावर बरीच चर्चा केली. सोशल मीडियावर समोर आलेल्या एका व्हिडिओमध्ये आदित्य आणि अनन्या विमानतळावर एन्ट्री करताना दिसत आहेत, पण यावेळी लक्ष वेधून घेतलं ते वेगळ्याचं गोष्टीनं. यावेळी श्रद्धा कपूरही दिसत असून हे तिघेही समोरासमोर आले होते.
या व्हिडिओमध्ये आदित्य रॉय कपूर जामनगरला जाण्यापूर्वी श्रद्धा कपूरला मिठी मारताना दिसला. या दोघांनाही शेजारी असलेल्या अनन्यानेही पाहिले. 'आशिकी 2' चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान आदित्य आणि श्रद्धा रिलेशनशिपमध्ये असल्याच्या बऱ्याच चर्चा होत्या. मात्र, दोघांनीही रिलेशनशिपमध्ये असल्याचे कधीच मान्य केले नाही.
नेटकऱ्यांनी काय म्हटलं?
या व्हिडिओवर नेटकऱ्यांनी अनेक कमेंट्स केल्या आहेत. तसेच श्रद्धाला मिठी मरताना अनन्या अस्वस्थ दिसत होती, असंही अनेकांनी म्हटलंय. एका युजरने तर म्हटलं की, 'श्रद्धा आणि आदित्यने मिठी मारली पण अनन्या.' एकाने लिहिले, 'ओह माय गॉड ती श्रद्धा कपूर होती.' एका यूजरने लिहिले की, 'Ex and present at the same place.' एका यूजरने लिहिले की, 'भाई, हे फक्त अंबानीच करू शकतात.'
प्री वेडिंगसाठी बॉलीवूडकरांची मंदियाळी
शाहरुख खान, सलमान खान, जान्हवी कपूर, मानुषी छिल्लर, राणी मुखर्जी आणि मनीष मल्होत्रा यांच्यासह अनेक सेलिब्रिटी प्री-वेडिंग कार्यक्रमासाठी जामनगरला दाखल झाले आहेत. गुरुवारी रात्री रणवीर सिंग आणि दीपिका पदुकोणही पोहचले. आलिया भट, रणबीर कपूर, नीतू कपूरही या कार्यक्रमासाठी पोहचले आहेत. राधिका आणि अनंत यांच्या प्री वेडिंगचे कार्यक्रम हे 1 मार्च ते 3 मार्च दरम्यान जामगरमध्ये पार पडणार आहेत. यासाठी बॉलीवूडकरांनी हजेरी लावली आहे. सध्या जामनगर, गुजरातमध्ये बिल गेट्स, पॉप सिंगर रिहाना, मार्क झुकरबर्ग यांच्यासह अनेक दिग्गज मंडळीही उपस्थित आहे.