एक्स्प्लोर

Shivpratap Garudjhep : ‘शिवप्रताप गरुडझेप’चा टीझर रिलीज; अमोल कोल्हेंनी शेअर केली पोस्ट

‘शिवप्रताप गरुडझेप’ हा चित्रपट 5 ऑक्टोबर 2022 रोजी रिलीज होणार आहे.

Shivpratap Garudjhep : रक्ताचा एकही थेंब न सांडता आपल्या बुद्धिचातुर्याच्या बळावर औरंगजेबाच्या बलाढ्य मुघल सत्तेचा पोलादी पहारा भेदून केलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या आग्र्याहून सुटकेचा प्रसंग आता ‘शिवप्रताप गरुडझेप’या चित्रपटामधून प्रेक्षकांना अनुभवता येणार आहे. या चित्रपटाचा टीझर नुकताच रिलीज झाला आहे. या टीझरनं सध्या नेटकऱ्यांचे लक्ष वेधले आहे. 

नुकतीच अभिनेते अमोल कोल्हे यांनी एक पोस्ट शेअर करुन ‘शिवप्रताप गरुडझेप’ या चित्रपटाचा टीझर रिलीज झाल्याची माहिती दिली. या पोस्टला अमोल कोल्हे यांनी कॅप्शन दिली, 'आमच्या हिंदू धर्मावर घाला घालणाऱ्याचे हात मुळासकट उखडून टाकण्याची धमक आम्ही बाळगतो..!" सह्याद्रीच्या नरसिंहाची शिवगर्जना, 'शिवप्रताप गरुडझेप' 5 ऑक्टोबर 2022 पासून चित्रपटगृहांत.! आता फक्त 23 दिवस बाकी!' या पोस्टमध्ये अमोल कोल्हे यांनी ‘शिवप्रताप गरुडझेप’या चित्रपटाचं पोस्टर देखील शेअर केलं आहे. या पोस्टरमध्ये अमोल कोल्हे हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत दिसत आहेत. तर अभिनेते यतीन कार्येकर हे औरंगजेबाच्या भूमिकेत दिसत आहेत. ‘शिवप्रताप गरुडझेप’ चित्रपटाचा टीझर हा अमोल कोल्हे यांच्या अमोल ते अनमोल या युट्युब चॅनलवरुन शेअर करण्यात आला आहे. अनेक नेटकऱ्यांनी या टीझरला लाइक केलं आहे. आता प्रेक्षक या चित्रपटाच्या ट्रेलरची उत्सुकतेने वाट बघत आहेत. 

पाहा टीझर : 

'शिवछत्रपती' आणि 'स्वराज्य रक्षक संभाजी' या मालिकांनी जगभरात अफाट लोकप्रियता मिळवली. या मालिकेतील भूमिकांमुळे छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज म्हटलं की, डॉ. अमोल कोल्हे यांचंच नाव प्रेक्षकांच्या मनात येतं. त्यामुळेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या ऐतिहासिक कर्तृत्वाची महती सांगणारा 'शिवप्रताप' मालिकेतील 'गरुडझेप' हा चित्रपट 5 ऑक्टोबर 2022 रोजी  प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत. काही दिवसांपूर्वी ‘शिवप्रताप गरुडझेप’ चित्रपटातील 'बम बम भोले' हे  गाणं देखील प्रेक्षकांच्या भेटीस आलं. या गाण्याला प्रेक्षकांची पसंती मिळाली. अमोल कोल्हे यांनी त्यांच्या युट्यूब चॅनलवर हे संपूर्ण गाणं शेअर केले आहे. अनेक नेटकऱ्यांनी या गाण्याला लाइक आणि कमेंट्स करुन अमोल कोल्हे यांना या आगामी चित्रपटासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. 

वाचा इतर महत्त्वाच्या बातम्या : 

Shivpratap Garudjhep : औरंगजेबाच्या भूमिकेत अभिनेते यतीन कार्येकर; 'शिवप्रताप गरुडझेप' पाच ऑक्टोबरला होणार रिलीज

महत्त्वाच्या बातम्या

Sonalee Kulkarni brother Marriage: अभिनेत्री सोनाली कुलकर्णीच्या घरात सनई चौघड्याचे सूर घुमले; अतुल कुलकर्णी विवाहबंधनात अडकला
अभिनेत्री सोनाली कुलकर्णीच्या घरात सनई चौघड्याचे सूर घुमले; अतुल कुलकर्णी विवाहबंधनात अडकला
Salman Khan Weight Loss: सलमान खाननं 16 किलो वजन का घटवलं? भाईजान साठीत करतोय, पंचविशीतील तरुण दिसण्याची तयारी; पण कशासाठी?
सलमान खाननं 16 किलो वजन का घटवलं? भाईजान साठीत करतोय, पंचविशीतील तरुण दिसण्याची तयारी; पण कशासाठी?
Jayanti 2 Marathi Movie: 'जयंती' नंतर आता येतोय 'जयंती 2'; सीक्वेलमध्ये नवा चेहरा, 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम अभिनेत्रीची एन्ट्री
'जयंती' नंतर आता येतोय 'जयंती 2'; सीक्वेलमध्ये नवा चेहरा, 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम अभिनेत्रीची एन्ट्री
Nauheed Cyrusi on Miscarriages: 'मौला मेरे मौला' फेम अभिनेत्री का आई होऊ शकली नाही? म्हणाली, 2 वेळा गर्भपात; तिसऱ्या महिन्यांतच बाळाच्या हृदयाचे ठोके....
'मौला मेरे मौला' फेम अभिनेत्री का आई होऊ शकली नाही? म्हणाली, 2 वेळा गर्भपात; तिसऱ्या महिन्यांतच बाळाच्या हृदयाचे ठोके....

व्हिडीओ

Abhijeet Dipke On Narendra Modi : मोदींची डिग्री खरी असावी.. अभिजीत दिपके थेटच बोलले..
Sanjay Raut PC : संघामध्ये मोदी-शाहांनी आपले चमचे पेरले आहेत,संजय राऊतांचा हल्लाबोल
Balasaheb Fadnavis On Devendra Fadnavis: माझा पुतण्या आज ना उद्या पंतप्रधान होईल; देवेंद्र फडणवीसांच्या काकांना विश्वास, नेमकं काय म्हणाले?
Special Report on Palghar : खड्ड्यांत महामार्ग, धोक्यात प्रवास, मनोर-भिवंडी मार्ग मृत्यूचा प्रवास | ABP Majha
Maharashtra Freedom Conversion Act : धर्मांतरावर बंधन, कायद्याचं संरक्षण, विरोधकांचं आक्षेप का?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
'फक्त आमदारकीची नाही, तर भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाला संदेश देणारी निवडणूक..' थेट भाजप अध्यक्षांच्या बालेकिल्ल्याला भगदाड पाडताच बांकीपूरचे बाॅस प्रशांत किशोर काय काय म्हणाले?
'फक्त आमदारकीची नाही, तर भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाला संदेश देणारी निवडणूक..' थेट भाजप अध्यक्षांच्या बालेकिल्ल्याला भगदाड पाडताच बांकीपूरचे बाॅस प्रशांत किशोर काय काय म्हणाले?
मुंबईच्या SRA कार्यालयातील भेटीनंतर रोहित पवार ब्रीच कँडी रुग्णालयात; त्रास जाणवू लागल्याने उपचारासाठी दाखल
मुंबईच्या SRA कार्यालयातील भेटीनंतर रोहित पवार ब्रीच कँडी रुग्णालयात; त्रास जाणवू लागल्याने उपचारासाठी दाखल
Bankipur byelection Result : भाजपच्या प्रतिष्ठेला 'दे धक्का'; बिहार पोटनिवडणुकीत प्रशांत किशोरांचा मोठा विजय, 30 वर्षांपासूनच्या बालेकिल्ल्याला सुरुंग
भाजपच्या प्रतिष्ठेला 'दे धक्का'; बिहार पोटनिवडणुकीत प्रशांत किशोरांचा मोठा विजय, 30 वर्षांपासूनच्या बालेकिल्ल्याला सुरुंग
विद्यार्थ्यांवर गुन्हा दाखल होणार नाही, 2700 गुन्हेगारांविरुद्धचा एफआयआर कायम राहील; केंद्र सरकारची भूमिका, कठोर कारवाई करणाऱ्या जवानांना संरक्षण देऊ नका, सर्वोच्च न्यायालयानं सुनावलं
विद्यार्थ्यांवर गुन्हा दाखल होणार नाही, 2700 गुन्हेगारांविरुद्धचा एफआयआर कायम राहील; केंद्र सरकारची भूमिका, कठोर कारवाई करणाऱ्या जवानांना संरक्षण देऊ नका, सर्वोच्च न्यायालयानं सुनावलं
मोठी बातमी : श्रीकांत शिंदेंविरुद्ध लढलेल्या ठाकरेंच्या वैशाली दरेकरांनी पद सोडलं, राजीनामा पत्रात म्हणाल्या...
मोठी बातमी : श्रीकांत शिंदेंविरुद्ध लढलेल्या ठाकरेंच्या वैशाली दरेकरांनी पद सोडलं, राजीनामा पत्रात म्हणाल्या...
Bankipur By-election Prashant Kishor: 'बांकीपूरमध्ये आम्ही कुत्र्या मांजराला उभं केलं तरी निवडून येईल..' भाजपला ते वाक्य महागात पडलं, प्रशांत किशोर भक्कम विजयाच्या दिशेनं
'बांकीपूरमध्ये आम्ही कुत्र्या मांजराला उभं केलं तरी निवडून येईल..' भाजपला ते वाक्य महागात पडलं, प्रशांत किशोर भक्कम विजयाच्या दिशेनं
EPFO Big Update : 25000 रुपये मूळ वेतन असणाऱ्या कर्मचाऱ्यांना पेन्शन मिळणार, केंद्र सरकार 10 वर्षांपूर्वीचा नियम बदलणार
25000 रुपये मूळ वेतन असणाऱ्या कर्मचाऱ्यांना पेन्शन मिळणार, केंद्र सरकार EPFO चा 10 वर्षांपूर्वीचा नियम बदलणार
देव तारी त्याला कोण मारी... मिसिंग लिंकजवळ खोल दरीत कोसळली कार; झाडाला अडकल्याने बचावला ड्रायव्हर
देव तारी त्याला कोण मारी... मिसिंग लिंकजवळ खोल दरीत कोसळली कार; झाडाला अडकल्याने बचावला ड्रायव्हर
Embed widget