Shiv Thakare Clean Juhu Beach : 'बिग बॉस' (Bigg Boss) फेम 'आपला माणूस' शिव ठाकरे (Shiv Thakare) सध्या चर्चेत आहे. शिवच्या एका कृतीने चाहते भारावले आहेत. शिवने मुंबईतील जुहू बीचवर साफसफाई (Shiv Thakare Clean Juhu Beach) केली आहे. बीचवर साफसफाई करतानाचे शिवचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.


शिव ठाकरे स्वच्छता मोहिमेत सहभागी झाल्याने त्याचे चाहते भारावले आहेत. शिवचा बीचवर साफसफाई करतानाचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये तो कचरा वेचताना दिसत आहे. शिवनेदेखील त्याच्या इन्स्टास्टोरीच्या माध्यमातून साफसफाईची झलक चाहत्यांसोबत शेअर केली आहे. "आपण एकत्र मिळून बदलू शकतो", असं कॅप्शनदेखील त्याने लिहिलं आहे.






शिव ठाकरेचा साफसफाई करतानाचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओवर चाहते शिवचं कौतुक करत आहेत. तर नेटकरी मात्र त्याला ट्रोल करत आहेत. शिव नेहमी चांगलं काम करतो, साफसफाई करण्याचं एक चांगलं काम शिवने केलं आहे, खूप छान, तुझा खूप अभिमान वाटतो, अशा कमेंट्स चाहत्यांनी केल्या आहेत. तर दुसरीकडे कॅमेऱ्यासाठी शिव काहीही करेल, साफसफाई करण्याचं शिव नाटक करतो आहे, अशा कमेंट्स करत नेटकऱ्यांनी शिवला ट्रोल केलं आहे. 


पाकिस्तानी चाहत्याने शिवचं केलं कौतुक


शिव ठाकरेच नाही तर त्यांच्या संपूर्ण टीमने जुहू बीचवर साफसफाई केली आहे. देशात शिवचा मोठा चाहतावर्ग आहे. पण पाकिस्तानातही शिवचे चाहते आहेत. शिवच्या व्हिडीओवर त्याच्या एका पाकिस्तानी चाहत्याने कमेंट केली आहे की,"पाकिस्तानात तू सुपरहिरो आहेस... तुझ्या चाहत्यांना कायम तुझा अभिमान वाटतो". त्यावर दुसऱ्या एका चाहत्याने लिहिलं आहे की,"हा आमचा शिव ठाकरे आहे". 


'बिग बॉस मराठी'च्या दुसऱ्या पर्वाचा शिव ठाकरे (Bigg Boss Marathi 2 Winner Shiv Thackeray) विजेता होता. त्यानंतर सलमानच्या 'बिग बॉस 16'मध्ये तो सहभागी झाली. या पर्वाचा तो पहिला रनर अप होता. बिग बॉसमधील त्याची खेळी चाहत्यांच्या पसंतीस उतरली. आता 'खतरों के खिलाडी 13'च्या (Khatron Ke Khiladi 13) माध्यमातून तो प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. 'खतरों के खिलाडी 13'चा तो विजेता व्हावा अशी इच्छा चाहत्यांकडून व्यक्त केली जात आहे. 


संबंधित बातम्या


Shiv Thakare : 'खतरों के खिलाडी 13'मध्ये स्टंट करताना शिव ठाकरे जखमी; हाताच्या बोटाला पडले टाके