Shiv Thakare Injured Khatron Ke Khiladi 13 Shooting : 'खतरों के खिलाडी 13' (Khatron Ke Khiladi 13) या बहुचर्चित कार्यक्रमाचं सध्या दक्षिण आफ्रिकेत शूटिंग सुरू आहे. या कार्यक्रमात मनोरंजनसृष्टीतील अनेक सेलिब्रिटी सहभागी झाले आहेत. पण प्रसारण होण्यापूर्वीच कार्यक्रमातील अनेक स्पर्धक स्टंट करताना जखमी झाले आहेत. 


'खतरों के खिलाडी 13'च्या शूटिंगदरम्यान शिव ठाकरे जखमी


शिव ठाकरेचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या व्हिडीओमध्ये शिवच्या उजव्या हाताच्या बोटाला दुखापत झालेली दिसत आहे. तसेच त्याच्या हाताच्या बोटाला टाकेदेखील पडले आहेत. शिव नेहमीच लढवय्या म्हणून ओळखला जातो. त्यामुळे चाहते त्याच्या व्हिडीओवर कमेंट्स करत त्याला 'योद्धा' म्हणत आहेत. 






'खतरों के खिलाडी 13'च्या शूटिंगदरम्यान 'हे' स्पर्धक जखमी


'खतरों के खिलाडी 13'च्या शूटिंगदरम्यान स्टंट करताना अनेत स्पर्धक जखमी झाले आहेत. नायरा बॅनर्जी, रोहित रॉय, अरिजित तनेजा, ऐश्वर्या शर्मा या कलाकारांचा यात समावेश आहे. रोहित शेट्टी हा कार्यक्रम होस्ट करणार आहे.


'खतरों के खिलाडी 13'चं प्रसारण कधी होणार? 


'खतरों के खिलाडी 13' या कार्यक्रमातील स्पर्धक स्टंटबाजी करताना दिसून येतात. दरम्यान त्यांना अनेक आव्हानांचा सामना करावा लागतो. आता 15 जुलैपासून हा कार्यक्रम प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. कलर्स मराठीवर रात्री 9 वाजता प्रेक्षक हा कार्यक्रम पाहू शकतात. 


शिवने श्रीजिता डेला दिल्या शुभेच्छा


शिव ठाकरे आणि श्रीजिता डे 'बिग बॉस 16'मध्ये सहभागी झाले होते. त्यांची चांगली मैत्री होती. श्रीजिता नुकतीच लग्नबंधनात अडकली आहे. पण कामामुळे शिव तिच्या लग्नसोहळ्याला उपस्थित राहू शकला नाही. त्यामुळे सोशल मीडियाच्या माध्यमातून त्याने श्रीजिताला शुभेच्छा दिल्या आहेत. 


'खतरों के खिलाडी 13'मध्ये 'या' स्पर्धकांचा सहभाग (Khatron Ke Khiladi 13 Contestant)


'खतरों के खिलाडी 13'मध्ये डेजी शाह, अर्जित तनेजा, शीझान खान, रुही चतुर्वेदी, रोहित बोस रॉय, रश्मीत कौर, अंजुम फकीह, अंजली आनंद आणि शिव ठाकरे हे स्पर्धक सहभागी होणार आहेत. या कार्यक्रमाची आता प्रेक्षकांना उत्सुकता आहे.


संबंधित बातम्या


KKK 13 : 'खतरों के खिलाडी 13'च्या शूटिंगदरम्यान नायरा बॅनर्जीला गंभीर दुखापत