Karan Johar And Kangana Ranaut:  चित्रपट निर्माता 

  करण जोहर  (Karan Johar)  आणि अभिनेत्री कंगना रनौत (Kangana Ranaut) या दोघांची चर्चा गेल्या काही दिवसांपासून होत आहे. काही दिवसांपूर्वी एका मुलाखतीमध्ये करण जोहरनं कंगनाच्या इमर्जन्सी या चित्रपटाचा उल्लेख केला. तो म्हणाला,'इमर्जन्सी चित्रपट रिलीज होत आहे आणि तो पाहण्यासाठी मी खूप उत्सुक आहे.' आता यावर कंगनानं प्रतिक्रिया दिली आहे.


कंगनाचं ट्वीट


कंगनानं ट्वीट शेअर केलं आहे. या ट्वीटमध्ये तिनं लिहिलं, 'हा... हा... गेल्या वेळी देखील तो म्हणाला होता की, तो मणिकर्णिका पाहण्यास उत्सुक आहे, माझ्या आयुष्यातील सर्वात वाईट campaign चित्रपट रिलीजच्या आठवड्याच्या शेवटी माझ्यावर चालवले गेले.  चित्रपटात काम करणाऱ्या जवळपास सर्व मुख्य कलाकारांना माझ्यावर चिखलफेक करण्यासाठी आणि चित्रपटाची तोडफोड करण्यासाठी पैसे देण्यात आले होते. अचानक माझ्या आयुष्यातील सर्वात यशस्वी ठरणारा वीकेंड माझ्यासाठी एक  दुःखद स्वप्न ठरला. हा.. हा... मला आता खूप भीती वाटतेय… कारण तो पुन्हा एक्सायटेड आहे.'






कंगनाने  'कॉफी विथ करण' शोमध्ये करणला मूव्ही माफिया म्हटले होते.  कंगना ही अनेकवेळा सोशल मीडियाच्या माध्यमातून करणवर टीका करते. काही दिवसांपूर्वी कंगनानं सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करुन  करणला 'रिटायर हो!' असा सल्ला दिला. 


2019 मध्ये कंगनाचा मणिकर्णिका  हा चित्रपट रिलीज झाला होता. आता कंगनाचा इमर्जन्सी हा चित्रपट रिलीज होणार आहे. हा चित्रपट 24 नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.इमर्जन्सी या चित्रपटात  कंगनासोबतच अनुपम खैर, मिलिंद सोमण, महिमा चौधरी आणि श्रेयस तळपदे हे कलाकार देखील प्रमुख भूमिका साकारणार आहेत. 


कंगनाचे चंद्रमुखी 2 आणि तेजस हे आगामी चित्रपट देखील लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहेत. कंगनाच्या आगामी चित्रपटांची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत असतात.


संबंधित बातम्या


Karan Johar And Kangana Ranaut: करण जोहर कंगनाच्या 'इमर्जन्सी' चित्रपटाबाबत काय म्हणाला? जाणून घ्या