Shilpa Shirodkar: बॉलिवूडला कोरोनाचा विळखा; नोरा,अर्जुननंतर आता अभिनेत्री शिल्पा शिरोडकरला कोरोनाची लागण
Shilpa Shirodkar :अभिनेत्री शिल्पा शिरोडकरने सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमधून तिनं कोरोनाची लागण झाल्याची माहिती दिली आहे.
![Shilpa Shirodkar: बॉलिवूडला कोरोनाचा विळखा; नोरा,अर्जुननंतर आता अभिनेत्री शिल्पा शिरोडकरला कोरोनाची लागण Shilpa Shirodkar Gets Infected By COVID 19 Shilpa Shirodkar: बॉलिवूडला कोरोनाचा विळखा; नोरा,अर्जुननंतर आता अभिनेत्री शिल्पा शिरोडकरला कोरोनाची लागण](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/12/30/acc37af8d9d46f063d565683dcfa2fa5_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Shilpa Shirodkar : 'भ्रष्टाचार', 'हम', 'खुदा गवाह', 'आंखें', 'किशन कन्हैया', 'सनम बेवफा', 'गज गामिनी' यांसारख्या सुपर हिट चित्रपटांमधून प्रेक्षकांच्या भेटीस येणारी अभिनेत्री शिल्पा शिरोडकरला (Shilpa Shirodkar) कोरोनाची लागण झाली आहे. शिल्पाने सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली. शिल्पा शिरोडकरला आज क्वारंटाईन होऊन चार दिवस झाले आहेत. तिने सोशल मीडिया पोस्टमध्ये लिहिले, 'सर्वजण सुरक्षित राहा. लस घ्या आणि सर्व नियमांचे पालन करा.'
शिल्पा ही दुबईमध्ये राहते. 2000 मध्ये तिनं अप्रेश रंजीतसोबत लग्नगाठ बांधली. दुबईमध्ये शिल्पाने लसीचे दोन डोस देखील घेतले होते. 8 जानेवारीला शिल्पाने एबीपी न्यूजला माहिती दिली होती. तिनं सांगितलं होते की, 'मी दुबईमध्ये सिनोफार्म (Sinopharm)नावाची लस घेतली आहे. माझी प्रकृती व्यवस्थित आहे. 27 जानेवारीला मी दुसरा डोस घेणार आहे. '
View this post on Instagram
2013 मधील 'एक मुट्ठी आसमान' या मालिकेमधील शिल्पाच्या अभिनयाला प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली होती.
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)