मुंबई : गेल्या काही दिवसांपासून सुशांतसिंह राजपूतच्या मृत्यूनंतर अनेक वादांचा जन्म झाला आहे. यात अमली पदार्थांपासून नेपोटिझमपर्यंत अनेक मुद्दे आले आहेत. जस्टिस फॉर सुशांतच्या मोहिमेनेही जोर पकडला होता. पण एका वाहिनीला रियाने मुलाखत दिल्यानंतर मात्र रियाच्या बाजूनेही सहानुभूती तयार झाली. आणि जस्टिस फॉर सुशांतसोबत जस्टिस फॉर रिया हा हॅशटॅगही ट्रेंड होऊ लागला.
अंकिताने थेट रियावर आरोप करायला सुरुवात केली. आपले सुशांतशी गेल्या चार वर्षांपासून संबंध नव्हते असं सांगतानाच सुशांत आपल्याला मेसेज करायचा असंही तिने सांगितलं. शिवाय अनेकदा रियाला तिने उघड दोषी ठरवलं. आता रियाच्या समर्थनार्थही अनेक कलाकार एकत्र येऊ लागले आहेत. यात अनुराग कश्यप, विद्या बालन, शिबानी दांडेकर, स्वरा भास्कर यांचा समावेश होतो. शिबानीने तर आता अंकिताला उघड उघड खडे बोल सुनावले आहेत.
अंकिताचा उल्लेख 'पुरुषी मानसिकतेची राणी' असा करत शिबानीने अंकितावरही टीका केली आहे. सुशांतसोबतचं नातं तिला कधी सांभाळताच आलं नाही. खरंतर या सगळ्या घटनांना ज्या काही गोष्टी जबाबदार आहेत त्यातला मुख्य घटक अंकिता आहे असं शिबानी म्हणते. ट्विटरवरही तिने एक मेसेज दिला आहे. त्यानुसार अंकिताला आपले नातेसंबंध कधीच जपता आले नाहीत. आपल्याकडे लोकांचं लक्ष वेधावं म्हणून तिने रियाला दोषी ठरवायला सुरुवात केली आहे. अंकिताला तिने चेटकिण असंही संबोधलं आहे. एखाद्याच्या मनात विनाकारण असा राग असू नये असं शिबानी स्पष्ट करते.
आजवर रियाच्या विरोधात अनेकांनी भूमिका घेतल्या होत्या. यात सुशांतसिंह राजपूतच्या कुटुंबियांसह कंगना, अंकिता यांचा समावेश होतो. त्यांनी रियावर चौफेर टीका करायला सुरुवात केली होती. रियाला अटक झाल्यानंतरही यातल्या अनेकांनी आनंद, समाधन व्यक्त केलं होतं. पण रियाच्या समर्थनार्थही आता अनेक कलाकार पुढे येऊ लागले आहेत.
महत्त्वाच्या बातम्या :