(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Sherlyn Chopra Video: राहुल गांधींसोबत लग्न करणार? शर्लिन चोप्रा म्हणाली, "हो, पण लग्नानंतर..."
शर्लिनचा (Sherlyn Chopra) एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये ती राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्याबद्दल बोलताना दिसत आहे.
Sherlyn Chopra Video: बॉलिवूड अभिनेत्री शर्लिन चोप्रा (Sherlyn Chopra) ही तिच्या वक्तव्यांमुळे चर्चेत असते. शर्लिन ही विविध विषयांवरील तिची मतं सोशल मीडियावर मांडते. शर्लिन सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. सध्या शर्लिनचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये ती काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्याबद्दल बोलताना दिसत आहे.
व्हायरल व्हिडीओमध्ये दिसत आहे की, शर्लिन चोप्रा ही चाहत्यांसोबत सेल्फी काढत आहे. तितक्यात एक फोटोग्राफर शर्लिनला विचारतो, 'तू राहुल गांधींशी लग्न करु इच्छिते का?' या प्रश्नाचं उत्तर देत शर्लिन म्हणते, 'हो, पण मला वाटतं की, लग्नानंतर माझे आडनाव चोप्रा हेच रहावं.' शर्लिनच्या या उत्तरानं अनेकांचे लक्ष वेधले आहे. शर्लिनच्या या व्हायरल व्हिडीओवर आता राहुल गांधी हे प्रतिक्रिया देणार की नाही? याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे.
पाहा व्हिडीओ:
View this post on Instagram
कोण आहे शर्लिन चोप्रा?
शर्लिन चोप्रा ही अभिनेत्री असण्यासोबत मॉडेलदेखील आहे. तिने 2005 साली 'टाइमपास' या चित्रपटामधून मनोरंजनसृष्टीत पदार्पण केलं. त्यानंतर अनेक हिंदी चित्रपटांमध्ये तिनं छोट्या-मोठ्या भूमिका साकारल्या. रुपेरी पडद्यासह छोट्या पडद्यावरदेखील तिने काम केलं आहे. छोट्या पडद्यावरील 'बिग बॉस' (Bigg Boss) या लोकप्रिय कार्यक्रमातील तिसऱ्या पर्वात ती सहभागी झाली होती. तसेच एमटीव्हीच्या 'स्पिल्ट्सविला' कार्यक्रमातदेखील ती दिसली होती. दोस्ती: फ्रेंड्स फॉरएवर, रेड स्वास्तिक, वजह तुम हो या चित्रपटांमध्ये शर्लिन चोप्रानं काम केलं आहे.
पौरुषपूर सीझन 2 मध्ये शर्लिननं काम केलं आहे. ही वेब सीरिज 28 जुलै रोजी प्रसारित झाली आहे. या सीरिजमध्ये शर्लिन ही स्नेहलता या भूमिकेत दिसली आहे. शर्लिन ही सोशल मीडियावर विविध लूकमधील फोटो शेअर करत असते. तिचे हे फोटो नेटकऱ्यांचे लक्ष वेधतात. तिला इन्स्टाग्रामवर आठ मिलियन फॉलोवर्स आहेत.
View this post on Instagram
वाचा इतर महत्वाच्या बातम्या: