Shah Rukh Khan Welcomes Ganapati Bappa at Mannat : देशभरात गणेशोत्सव (Ganeshotsav 2023) धुमधडाक्यात साजरा केला जात आहे. बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानच्या (Shah Rukh Khan) घरी दरवर्षीप्रमाणे यंदाही बाप्पा विराजमान झाले आहेत. किंग खानने बाप्पाचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. अभिनेत्याने बसवलेली बाप्पाची मूर्ती खूपच सुंदर आहे. किंग खानने गणपतीचा फोटो शेअर करत चाहत्यांना गणेशोत्सवाच्या (Ganesh Chaturthi 2023) शुभेच्छा दिल्या आहेत. 


शाहरुखचा बाप्पा पाहिलात का? (Shah Rukh Khan Post On Ganeshotsav 2023)


'जवान' (Jawan) फेम शाहरुख खानना बाप्पाचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. फोटो शेअर करत त्याने लिहिलं आहे,"गणपती बाप्पाचं घरी स्वागत करत आहोत. तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबियांना गणेशोत्सवाच्या शुभेच्छा. सर्वांना सुख, बुद्धी, उत्तम आरोग्य आणि भरपूर मोदक खाण्यासाठी गणपती बाप्पा आशीर्वाद देवो". शाहरुखची ही पोस्ट सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होत आहे. अनेक सेलिब्रिटींसह चाहत्यांना त्यांच्या लाडक्या सुपरस्टारला गणेशोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.






ईद, दिवळी, गणेशोत्सव असे सर्वच सण शाहरुख खान जल्लोषात साजरे करतो. धर्मनिरपेक्ष अभिनेता म्हणून शाहरुखला ओळखलं जातं. त्याच्या गणपती बाप्पाच्या पोस्टवर एकतेचे उदाहरण म्हणजे शाहरुख खान, धर्मनिरपेक्ष अभिनेता, देशात बंधुभावाची शांती नांदू दे अशा कमेंट्स नेटकऱ्यांनी केल्या आहेत. 


बॉक्स ऑफिसवर शाहरुखच्या 'जवान'चा बोलबाला (Shah Rukh Khan Jawan Box Office Collection)


बॉलिवूडचा बादशाह असणाऱ्या शाहरुख खानचा 'जवान' (Jawan) हा सिनेमा 7 सप्टेंबर 2023 रोजी प्रेक्षकांच्या भेटीला आला. सॅकनिल्क एंटरटेनमेंटच्या रिपोर्टनुसार,'जवान' या सिनेमाने रिलीजच्या पहिल्या आठवड्यात 389.88 कोटींची कमाई केली. दुसऱ्या आठवड्यात या सिनेमाच्या कमाईत घसरण पाहायला मिळत आहे. नवव्या दिवशी 19.1 कोटी, दहाव्या दिवशी 31.8 कोटी, अकराव्या दिवशी 36.85 कोटी, बाराव्या दिवशी 16.25 कोटी आणि तेराव्या 14 कोटींची कमाई केली आहे. एकंदरीत भारतीय बॉक्स ऑफिसवर या सिनेमाने 507.88 कोटींची कमाई केली असून जगभरात 883.8 कोटींचा गल्ला जमवला आहे. 'जवान' हा सिनेमा 'पठाण'चा रेकॉर्ड मोडणार का? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. 


संबंधित बातम्या


Ganeshotsav 2023 : उद्योगपती मुकेश अंबानींच्या गणरायाच्या दर्शनासाठी दिग्गजांची मांदियाळी, उपमुख्यमंत्री फडणवीसांसह, राज आणि उद्धव ठाकरे दर्शनाला, तर बॉलिवूड सेलिब्रिटींचीही हजेरी