Dev Anand Juhu Bungalow Sold: दिवंगत अभिनेते देव आनंद (Dev Anand) यांचा जुहू येथील बंगला विकला गेला आहे. देव आनंद यांच्या बंगल्याच्या जागी आता 22 मजली उंच टॉवर होणार आहे. देव आनंद हे  त्यांच्या या जुहू (Juhu) येथील बंगल्यामध्ये  पत्नी कल्पना कार्तिक आणि त्यांची मुले सुनील आनंद आणि देविना आनंद यांच्यासोबत अनेक वर्षे राहिले होते.


एका रिपोर्टनुसार, देव आनंद यांचा जुहू येथील बंगला रिअल इस्टेट कंपनीला विकण्यात आला आहे. त्यांची डील झाली असून आता कागदपत्रांचे काम सुरू आहे. देव आनंद यांचा हा बंगला जवळपास 350-400 कोटी रुपयांना विकला गेला आहे, असं म्हटलं जात आहे.  हा बंगला पाडल्यानंतर त्याच्या जागी 22 मजली उंच टॉवर बांधण्यात येणार आहे. 


देव आनंद यांच्या या बंगल्या जवळ अनेक बड्या उद्योगपतींची घरे आहे. की माधुरी दीक्षित नेने आणि डिंपल कपाडिया सारखे स्टार देखील देव आनंदच्या बंगल्याजवळच्या अपार्टमेंटमध्ये राहतात, असं म्हटलं जात आहे.  


देव आनंद यांना त्यांचा हा जुहू येथील बंगला खूप आवडत होता. देव आनंद हे  या बंगल्यामध्ये जवळपास 40 वर्षे राहिले होते, असे म्हटले जात आहे. त्यांनी स्वतः एका जुन्या मुलाखतींमध्ये या बंगल्याबाबत सांगितलं होतं. एका मीडिया आउटलेटला दिलेल्या मुलाखतीत देव आनंद यांनी सांगितले होते की,  हे घर 1950 मध्ये बांधले होते. तेव्हा जुहू हे छोटेसे गाव होते आणि तिथे संपूर्ण जंगल होते.  इथले जंगल आवडते म्हणून त्याने ही जागा निवडल्याचे देव आनंद  यांनी सांगितले होते.  'मी एकटी असल्यामुळे मला ते आवडले. जुहू आता खूप गजबजले आहे, विशेषत: रविवारी येथे लोकांची गर्दी असते.' असंही मुलाखतीमध्ये देव आनंद यांनी सांगितलं होतं.


देव आनंद यांचे चित्रपट


'जिद्दी' या  चित्रपटामधून देव आनंद यांनी  मनोरंजनसृष्टीत पदार्पण केलं होतं. तेरे घर के सामने,तेरे मेरे सपने,हरे राम हरे कृष्ण,देस परदेस या देव आनंद यांच्या चित्रपटांना प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली.आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या देव आनंद यांनी 3 डिसेंबर 2011 रोजी जगाचा निरोप घेतला.  आजही अनेक प्रेक्षक त्यांचे चित्रपट आवडीनं बघतात. 


संबंधित बातम्या:


Dev Anand Death Anniversary : ना राहायला घर, जेवणाचे हाल...खिशात 30 रुपये घेऊन गाठली मुंबई; जाणून घ्या एव्हरग्रीन सुपरस्टार देव आनंद यांचा प्रवास