एक्स्प्लोर

Jawan Movie : 'जवान' चित्रपटात शाहरुखची दुहेरी भूमिका; 'किंग' खान शूटिंगसाठी चेन्नईला रवाना

Jawan Movie : जवान चित्रपटाचं चित्रिकरण अखेरच्या टप्यात पोहचले आहे.

Jawan Movie : बॉलिवूडचा बादशाह अशी ओळख असलेल्या शाहरुख खानचा (Shah Rukh khan) पठाण (Pathaan) हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगलीच कमाई करतोय. पठाणने आतापर्यंत 508.35 कोटींची कमाई केली आहे. आता शाहरुख खानने त्याच्या आगामी 'जवान' (Jawan) चित्रपटाची तयारी सुरू केली आहे. दिग्दर्शक ॲटलीच्या जवान चित्रपटाच्या पुढील शेड्यूलसाठी शाहरुख खान चेन्नईला रवाना झाल्याचं सांगण्यात येत आहे. या चित्रपटात किंग खानबरोबर नयनतारा आणि विजय सेतुपती देखील महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. 

'जवान'च्या शेवटच्या शेड्युलचे शूटिंग सुरू 

मिळालेल्या माहितीनुसार, जवान चित्रपटाच्या शेवटच्या शेड्युलची तयारी सुरू झाली आहे. ज्यासाठी शाहरुख खान आता चेस सीन शूट करणार आहे. मीडिया रिपोर्टनुसार, या चित्रपटात शाहरूख खान दुहेरी भूमिका साकारणार आहे आणि त्याच्याच पात्राचा पाठलाग करणार आहे. जवान चित्रपटाचं हे शेवटचं शूटिंग असणार आहे.

दिग्दर्शक ॲटली यांनी असा दावा केला 

'जवान चित्रपट हा मसाला एंटरटेनर असणार आहे' असा दावा दिग्दर्शक ॲटली यांनी केला आहे. या चित्रपटात अॅक्शन सीनची जबाबदारी सुनील रॉड्रिग्स आणि एएनएल अरासू यांच्या खांद्यावर आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, जवानमध्ये लार्जर दॅन लाईफ आणि आकर्षक गोष्टी दाखविण्यात आल्या आहेत.

'जवान'ची स्टारकास्ट 

या चित्रपटात शाहरुख खान मुख्य भूमिकेत आहे. तर नयनतारा त्याच्याविरुद्ध भूमिका साकारणार आहे. त्याचबरोबर विजय सेतुपती खलनायकाच्या भूमिकेत आहेत. याशिवाय प्रियामणी, सान्या मल्होत्रा, सुनील ग्रोव्हर आणि योगी बाबू यांच्याही चित्रपटात महत्त्वाच्या भूमिका आहेत.

चित्रपटाच्या संदर्भात शाहरूख खान म्हणाला... 

शाहरुखने याआधीच चित्रपटाविषयी महत्त्वाची माहिती दिली आहे. शाहरूख म्हणाला की, 'मी तुम्हाला जवानबद्दल सध्या तरी जास्त काही सांगू शकत नाही, पण मी एक अभिनेता म्हणून चांगला वेळ घालवत आहे. दिग्दर्शक म्हणून अॅटलीसाठी हा पूर्णपणे वेगळ्या प्रकारचा चित्रपट आहे. त्याचं काम सर्वांनी पाहिले आहे. तो नेहमीच लोकांना जोडणारे चित्रपट बनवतो. असा जॉनर मी याआधी कधीच केला नाही.' जवान हा चित्रपट यावर्षीच चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. 

शाहरूख खानच्या पठाण या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगलीच कमाई केली आहे. त्यामुळे किंग खानच्या आगामी चित्रपटासाठी त्याचे चाहते फार उत्सुक आहेत.

महत्त्वाच्या बातम्या : 

Project K : महाशिवरात्रीनिमित्त दीपिका पादुकोण अन् प्रभासने चाहत्यांना दिली खास भेट; 'प्रोजेक्ट के'ची रिलीज डेट जाहीर!

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Pune Shaniwar wada: शनिवारवाड्यात सामूहिक नमाज पठण, पोलिसांकडून गुन्हा दाखल; मेधा कुलकर्णी- रुपाली ठोंबरेंमध्ये जुंपली
शनिवारवाड्यात सामूहिक नमाज पठण, पोलिसांकडून गुन्हा दाखल; मेधा कुलकर्णी- रुपाली ठोंबरेंमध्ये जुंपली
Harmanpreet Kaur Ind vs Eng : पुन्हा एकदा पराभव! आता कर्णधार हरमनप्रीतने कोणावर फोडले पराभवाचे खापर? म्हणाली, स्मृतीची विकेट...
पुन्हा एकदा पराभव! आता कर्णधार हरमनप्रीतने कोणावर फोडले पराभवाचे खापर? म्हणाली, स्मृतीची विकेट...
Bihar Election : बिहार विधानसभा निवडणुकीत काँग्रेस-राजद आमने सामने, महागठबंधनमध्ये 11 जागांवर तिढा, पेच वाढला 
बिहार विधानसभा निवडणुकीत काँग्रेस-राजद आमने सामने, महागठबंधनमध्ये 11 जागांवर तिढा, पेच वाढला 
धक्कादायक! साताऱ्यात जमिनीच्या वादातून एकावर जीवघेणा हल्ला, परिसरात भीतीचं वातावरण 
धक्कादायक! साताऱ्यात जमिनीच्या वादातून एकावर जीवघेणा हल्ला, परिसरात भीतीचं वातावरण 
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Thane Diwali : ठाण्यात दिवाळीचा उत्साह, युवांचा जल्लोष; विविध कार्यक्रमांचं आयोजन
Beed Conversion Caseबीड वडवणीत पैशांचे आमिष दाखवून धर्मांतराचा प्रयत्न,100जणांच्या धर्मांतरचा प्रकार
Maharashtra Superfast News : 20 OCT 2025 : 8 च्या अपडेट्स : ABP Majha
Beed Politics: 'भाजप-राष्ट्रवादी युती करून लढेल', धनंजय मुंडेंनी दिले एकत्र लढण्याचे संकेत
Maharashtra Superfast News : 20 OCT 2025 : 8 च्या अपडेट्स : ABP Majha

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune Shaniwar wada: शनिवारवाड्यात सामूहिक नमाज पठण, पोलिसांकडून गुन्हा दाखल; मेधा कुलकर्णी- रुपाली ठोंबरेंमध्ये जुंपली
शनिवारवाड्यात सामूहिक नमाज पठण, पोलिसांकडून गुन्हा दाखल; मेधा कुलकर्णी- रुपाली ठोंबरेंमध्ये जुंपली
Harmanpreet Kaur Ind vs Eng : पुन्हा एकदा पराभव! आता कर्णधार हरमनप्रीतने कोणावर फोडले पराभवाचे खापर? म्हणाली, स्मृतीची विकेट...
पुन्हा एकदा पराभव! आता कर्णधार हरमनप्रीतने कोणावर फोडले पराभवाचे खापर? म्हणाली, स्मृतीची विकेट...
Bihar Election : बिहार विधानसभा निवडणुकीत काँग्रेस-राजद आमने सामने, महागठबंधनमध्ये 11 जागांवर तिढा, पेच वाढला 
बिहार विधानसभा निवडणुकीत काँग्रेस-राजद आमने सामने, महागठबंधनमध्ये 11 जागांवर तिढा, पेच वाढला 
धक्कादायक! साताऱ्यात जमिनीच्या वादातून एकावर जीवघेणा हल्ला, परिसरात भीतीचं वातावरण 
धक्कादायक! साताऱ्यात जमिनीच्या वादातून एकावर जीवघेणा हल्ला, परिसरात भीतीचं वातावरण 
Bacchu Kadu : अरे स्वतःला संपवण्यापेक्षा एखाद्या आमदाराला कापूx टाका; शेतकरी हक्क राज्यव्यापी परिषदेत बच्चू कडूंचा प्रहार, म्हणाले..
अरे स्वतःला संपवण्यापेक्षा एखाद्या आमदाराला कापूx टाका; शेतकरी हक्क राज्यव्यापी परिषदेत बच्चू कडूंचा प्रहार, म्हणाले..
Dadar Power Cut : ऐन दिवाळीत दादर माहीमध्ये बत्ती गुल, नागरिकांनी मेणबत्त्या पेटवल्या, कंदिलाची  अंधारात विक्री
ऐन दिवाळीत दादर माहीमध्ये बत्ती गुल, नागरिकांनी मेणबत्त्या पेटवल्या, कंदिलाची अंधारात विक्री
Parbhani Accident : मुंबईतील निवासी उपजिल्हाधिकाऱ्याच्या वाहनाची दुचाकीला धडक, एकाचा मृत्यू, एक जण जखमी
मुंबईतील महसूल विभागाच्या शासकीय अधिकाऱ्याच्या वाहनाची दुचाकीला धडक, एकाचा मृत्यू, एक जण जखमी
मुंबईत जाऊन 30 वर्षे लाटा मोजल्या नाहीत; रामराजेंनी कार्यकर्त्यांना सांगितलं कोणत्या पक्षात जाणार?
मुंबईत जाऊन 30 वर्षे लाटा मोजल्या नाहीत; रामराजेंनी कार्यकर्त्यांना सांगितलं कोणत्या पक्षात जाणार?
Embed widget