Shah Rukh Khan  :  बॉलीवूडचा (Bollywood) किंग खान अर्थातच शाहरुख खान (Shah Rukh Khan) याने नुकतच दुबईत आयोजित करण्यात आलेल्या 'वर्ल्ड गव्हर्नमेंट समिट'ला हजेरी लावली होती. यावेळी शाहरुखने त्याच्या फ्लॉप चित्रपटांनंतर 4 वर्षांचा घेतलेला ब्रेक यावर भाष्य केलं आहे. तसेच मी त्यावेळी करिअर संपवण्याचा निर्णय घेतला होता, असा खुलासा देखील शाहरुखने केला. त्या 4 वर्षांमध्ये शाहरुख पिझ्झा बनवला होता. त्यावेळी त्याची पत्नी गौरी खान (Gauri Khan) हीने त्याला सिनेमे सोडून पिझ्झा बनवण्याचा मजेशीर सल्ला दिला होता, असा किस्सा शाहरुखने शेअर केला. 


शाहरुख खान हा दुबईचा ब्रँड अम्बॅसेडर आहे. त्यामुळे भारतातून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि शाहरुख खान या दोघांनीच या कार्यक्रमाला हजेरी लावली होती. या समिटमध्ये शाहरुख खाने तेथे उपस्थित असणाऱ्यांशी शाहरुखने मुलाखतीदरम्यान संवाद देखील साधला. तसेच त्याने त्याच्या आयुष्यात आलेल्या चार वर्षांच्या काळावर देखील भाष्य केलं आहे. शाहरुखने पठाण सिनेमातून दमदार कमबॅक केलं होतं. त्यानंतर त्याने जवान, डंकी सारखे रेकॉर्डब्रेक सिनेमे दिले. 


गौरीने दिला होता 'हा' सल्ला


शाहरुख खानने त्याच्या करिअरमध्ये 4 वर्षांचा ब्रेक घेतला होता. सतत सुरु असलेल्या फ्लॉप सिनेमांमुळे शाहरुखने हा निर्णय घेतला होता. यावर शाहरुखने मुलाखतीदरम्यान म्हटलं की, मी त्या चार वर्षांमध्ये घरी पिझ्झा बनवायला शिकलो. मी माझ्या घरामध्ये एक छोटं किचन सुरु केलं होतं. माझ्या घरी मी रोज वेगवेगळ्या पद्धतीचे पिझ्झा बनवायचो. त्यावेळी माझ्या कुटुंबाने देखील मला तितकीच साथ दिली. किंबहुना मला माझी पत्नी गौरी हीने म्हटलं की, ऐक तुझा पिझ्झा हा तुझ्या चित्रपटांपेक्षा जास्त चांगला आहे. त्यामुळे तू आता सिनेमे बनव थांबव. पण त्यापुढे गौरीने मला म्हटलं की, असं काही नाहीये. जितकी तुझा पिझ्झा चांगला आहे, तुझे चित्रपट त्यापेक्षा कितीतरी पटीने जास्त चांगले आहेत, हा मजेशीर किस्सा शाहरुखने यावेळी सांगितला. 




मी त्यावेळी करिअर संपवण्याचा निर्णय घेतला


मी त्या काळामध्ये माझं करिअर संपवण्याचा निर्णय घेतला होता. जो आता बऱ्याच लांबणीवर गेलाय. मला अजून पुढची 35 वर्ष काम कारायचं आहे. ज्या चित्रपटांवर संपूर्ण जगभरातून प्रेम केलं जाईल, असे चित्रपट मला आता करायचे आहेत, असं देखील शाहरुखने यावेळी म्हटलं. 




ही बातमी वाचा : 


Shahrukh Khan : कतारमधून भारताच्या माजी नौदल जवानांच्या सुटकेसाठी शाहरुखची मध्यस्थी? सुब्रम्हण्यम स्वामींच्या दाव्यावर 'किंग खान'ने सोडले मौन