Shah Rukh Khan : बॉलिवूडचा सुपरस्टार अभिनेता शाहरुख खान कधी चित्रपटांमुळे तर कधी वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत असतो. बॉलिवूडचा बादशाह म्हटल्या जाणाऱ्या शाहरुख खानला एका गोष्टीची खूप भीती वाटते. या भीतीबद्दल स्वत: शाहरुखने नॅशनल टीव्हीवरील एका कार्यक्रमादरम्यान माहिती दिली होती. शाहरुख खानची ही भीती ऐकल्यानंतर अभिनेत्री अनुष्का शर्माने त्याला डॉक्टरकडे जाण्याचा सल्ला दिला.


 शाहरुख खान आणि अनुष्का शर्मा यांचा एक जुना व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये शाहरूख त्यांच्या सर्वात मोठ्या भीतीबद्दल सांगत आहेत. शाहरुख खान आणि अनुष्का शर्मा साजिद खान व रितेश देशमुख यांच्या रिअॅलिटी शोमध्ये पाहुणे म्हणून गेले होते.  यावेळी साजिद शाहरुख खानच्या सर्वात मोठ्या भीतीबद्दल विचारतो आणि त्याचे उत्तरे एका वहीत लिहायला सांगतो. शाहरुखच्या भीतीच्या प्रश्नाने अनुष्का शर्मा चांगलीच गोंधळून जाते.




शाहरुख खान शोमध्ये सांगतो की, त्याला भीती वाटते की, कोणी त्याचा हात कापेल. शाहरुखचे हे उत्तर ऐकून अनुष्का शर्माला धक्का बसला. यावेळी शाहरुख शपथ घेऊन हो खरच कोणी तरी हात कापेल याचीच मला सर्वात मोठी भीती वाटत असल्याचे सांगतो. 


शाहरुख खान म्हणतो की,  मी जेव्हाही आपले हात पसरतो तेव्हा मला भीती वाटते की, खालून कोणी आपले हात कापून टाकेल. त्याच्या या उत्तरावर अनुष्का म्हणते की हे खूप विचित्र आहे. याबद्दल तू डॉक्टरांना दाखव.


महत्वाच्या बातम्या