Radhe Shyam New Song Out : दाक्षिणात्य सुपरस्टार प्रभास (Prabhas) आणि अभिनेत्री पूजा हेगडे (Pooja Hegde) सध्या त्यांच्या आगामी 'राधे श्याम' (Radhe Shyam) सिनेमामुळे चर्चेत आहे. हा सिनेमा 11 मार्च रोजी देशभरात प्रदर्शित होणार आहे. नुकतेच या सिनेमातील 'मैं इश्क में हूं' हे गाणे प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. 


'राधे श्याम' सिनेमा तामिळ, तेलुगू, कन्नड आणि मल्याळम आणि हिंदी भाषेत प्रदर्शित होणार आहे. सिनेमातील 'मैं इश्क में हूं' हे गाणे प्रभासच्या चाहत्यांच्या पसंतीस पडत आहे. या गाण्याला आतापर्यंत 15 लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. या गाण्यात पूजा प्रभाससोबत थिरकताना दिसत आहे.





प्रेक्षक गेल्या अनेक दिवसांपासून 'राधे श्याम' सिनेमाची प्रतीक्षा करत आहेत. या सिनेमाचे दिग्दर्शन राधा कृष्ण कुमार यांनी केले आहे. सध्या दिग्दर्शक राधा कृष्ण कुमार यांच्यासह प्रभास आणि पूजा हेगडे या सिनेमाचे प्रमोशन करत आहेत.


संबंधित बातम्या


Kiran Mane : किरण मानेंनी फेसबुक पोस्ट शेअर करत केले नागराज आणि 'झुंड'चे कौतुक


Shabaash Mithu : 'ती माझ्यासारख्या लाखो लोकांना प्रेरणा देते'; तापसी पन्नूने शेअर केले 'शाबास मिथू'चे नवे पोस्टर


Baipan Bhari Deva : तुमच्या आमच्या घरातल्या सुपरवूमनची गोष्ट, केदार शिंदेंनी केली 'बाईपण भारी देवा' सिनेमाची घोषणा


LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha