Baipan Bhari Deva : महिला दिनी केदार शिंदेंनी (Kedar Shinde) त्यांच्या आगामी सिनेमाची घोषणा केली आहे. 'बाईपण भारी देवा' (Baipan Bhari Deva) असे या सिनेमाचे नाव आहे. या सिनेमात सहा प्रमुख लोकप्रिय महिला कलाकार असणार आहेत. पण त्यांची नावं अद्याप गुलदस्त्यातच ठेवण्यात आली आहेत. 


केदार शिंदेंनी सोशल मीडियाद्वारे 'बाईपण भारी देवा' सिनेमाची घोषणा केली आहे. सोशल मीडियावर सिनेमाचे पोस्टर शेअर करत त्यांनी लिहिले आहे, "आई, आजी, बहिण, पत्नी, मुलगी, काकू, आत्या, मावशी... अशी अनेक जिव्हाळ्याची नाती. मी सुज्ञ झालो तो यांच्याच संस्काराने. 'अगं बाई अरेच्चा' सिनेमा करताना स्त्रीयांच्या मनातल्या गोष्टी ऐकण्याचा प्रयत्न केला. आणि 'बाईपण भारी देवा' या सिनेमात त्यांच्या अंतर्मनात डोकावण्याचा प्रयत्न केला आहे".






'बाईपण भारी देवा' या सिनेमाचे दिग्दर्शन केदार शिंदे यांनी केले आहे. या सिनेमाची रिलीज डेट अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही. जिओ स्टुडिओजने या सिनेमाची निर्मिती केली आहे. केदार शिंदे या सिनेमाविषयी म्हणाले,"या सिनेमाचे पोस्टर प्रेक्षकांसोबत शेअर करण्यासाठी आजच्या दिवसापेक्षा चांगला दिवस कोणता असूच शकत नाही. मला कायम असे वाटते की, महिला दिन साजरा करण्यासाठी केवळ एकच दिवस पुरेसा नसून दररोजच महिलांचं काम, सहभाग, योगदान आणि आवाका याची जाणीव ठेवायला हवी. हाच विचार घेऊन हा चित्रपट मी निर्माण केला आहे. आणि जर आपण बघितलं तर आज प्रत्येक क्षेत्रात महिलांचं कर्तुत्व भारी ठरतं आहे. त्यांच्या याच धडाडीला माझा हा कलात्मक सलाम आहे."


संबंधित बातम्या


Ananya: आता महिला जे ठरवतील ते करुन दाखवतील, कारण 'अनन्या' येतेय; 'या' दिवशी सिनेमा होणार प्रदर्शित


Ott Web Series :  सस्पेन्स अन् सायकोलॉजिकल थ्रिलर; शेवटपर्यंत उत्सुकता ताणून धरणाऱ्या 'या' सीरिज नक्की पाहा


Heart of Stone : प्रियांका अन् दीपिकानंतर आता आलियाची हॉलिवूड वारी; 'हार्ट ऑफ स्टोन'मध्ये साकारणार प्रमुख भूमिका


LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha