Shah Rukh Khan: "मैं तुम्हारा बाप हूं!" शाहरुखनं शेअर केलेल्या व्हिडीओची सोशल मीडियावर होतीये चर्चा
Shah Rukh Khan: शाहरुखनं जवान चित्रपटाचा एक खास व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडीओमधील त्याच्या डायलॉगनं अनेकांचे लक्ष वेधले आहे.
Shah Rukh Khan: अभिनेता शाहरुख खानच्या (Shah Rukh Khan) जवान (Jawan) या चित्रपटाची चर्चा सध्या देशभरात होत आहे. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत असून या चित्रपटामधील डायलॉग्स तसेच गाण्यांना प्रेक्षकांची विशेष पसंती मिळत आहे. नुकताच शाहरुखनं जवान चित्रपटाचा एक खास व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडीओमधील त्याच्या डायलॉगनं अनेकांचे लक्ष वेधले आहे.
शाहरुखनं जवान चित्रपटामधील काही सीन्सचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये शाहरुखचा अॅक्शन अंदाज पहायला मिळत आहे. तसेच या व्हिडीओमध्ये विजय सेतूपती देखील दिसत आहे. “वो अंत है तो मै काल हूं, वो तीर है तो मैं ढाल हूं…हूं पुण्य पाप से परे, चिताकी वो आग हूं, जो ना टले वो श्राप हूं… मैं तुम्हारा बाप हूं!” हा शाहरुखचा डायलॉग व्हिडीओमध्ये ऐकू येतो.
शाहरुखनं सोशल मीडियावर शेअर केलेल्या व्हिडीओला कॅप्शन दिलं, 'बेटा तो बेटा.... बाप रे बाप!! अब ना रुकना, चलने दे. तुमची तिकिटे लगेच बुक करा! जवान चित्रपट पाहा हिंदी, तमिळ आणि तेलगूमध्ये'
पाहा व्हिडीओ:
View this post on Instagram
शाहरुखचा जवान चित्रपट 7 सप्टेंबर 2023 रोजी रिलीज झाला होता. सहा दिवसांतच 'जवान' या चित्रपटानं जगभरातील बॉक्स ऑफिसवर 500 कोटींचा टप्पा पार केला आहे. या चित्रपटात शाहरुख, विजय सेतूपती, नयनतारा,सान्या मल्होत्रा, प्रियामणी, रिद्धी डोगरा, गिरिजा ओक यांनी प्रमुख भूमिका साकारली आहे. या चित्रपटामध्ये दीपिका पादुकोण आणि संजय दत्त यांचा कॅमिओ देखील आहे.
जवान या चित्रपटाचं दिग्दर्शन अॅटलीनं केलं आहे. जवान चित्रपटामधील 'जिंदा बंदा', 'चलेया' आणि 'नॉट रमैया वस्तावैया' ही गाणी प्रेक्षकांच्या भेटीस आली. या गाण्यांना नेटकऱ्यांची पसंती मिळाली.
जवान चित्रपटात शाहरुखचा डबल रोल आहे. आता जवान या चित्रपटानंतर शाहरुखचा डंकी हा चित्रपट रिलीज होणार आहे. शाहरुखच्या आगामी चित्रपटांची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत.
इतर महत्वाच्या बातम्या: