Bollywood Superstars Suffering Serious Dieseases : बॉलिवूडचे सुपरस्टार्स (Bollywood) आपल्या अभिनयाच्या जोरावर लाखो चाहत्यांच्या मनावर राज्य करतात. अभिनय (Acting) आणि चित्रपटांसह (Movies) ते आपल्या फिटनेस (Fitness) आणि लाईफस्टाईलमुळेही (Lifestyle) चर्चेत असतात. व्यावसायिक आयुष्यात यशस्वी झालेल्या या सुपरस्टार्सचं वैयक्तिक आयुष्य फार कमी लोकांना माहिती आहे. गेल्या काही दिवसांत बॉलिवूडचे अनेक सुपरस्टार्स गंभीर आजाराचा सामना करत आहेत. यात सिद्धार्थ शुक्ला (Siddharth Shukla), इरफान खान (Irrfan Khan),  ऋषी कपूर (Rishi Kapoor), सलमान खान (Salman Khan) ते शाहरुख खानपर्यंत (Shah Rukh Khan) अनेक कलाकारांचा समावेश आहे. ग्लॅमरस जगात वावरत असणारे बॉलिवूडचे सुपरस्टार्स ऑन-स्क्रीन वेगळे आहेत. तर कॅमेऱ्यामागे त्यांचा एक वेगळा रंग आहे. बॉलिवूडचे अनेक कलाकार आज गंभीर आजाराशी झुंज (Uncommon Serious Health Complications) देताना दिसत आहेत. 


शाहरुख खान (Shah Rukh Khan) :


बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खानने (Shah Rukh Khan) खुलासा केला आहे की, पाचवेळा माझी खांद्याची शस्त्रक्रिया पार पडली आहे. काही दिवसांपासून त्याला हात आणि पाठीचा त्रास होत आहे. 'दिल से' या चित्रपटातील 'चल छैया छैया' गाण्याच्या शूटिंगपासून त्याला पाठिचा त्रास सुरू झाला आहे. 


सलमान खान (Salman Khan) :


बॉलिवूडचा भाईजान सलमान खानला (Salman Khan) ट्राइजेनिकल न्यूराल्जिया (Trigeminal Neuralgia) नामक आजार आहे. त्यामुळे त्याचे गाल प्रचंड दुखतात. सलमानवर सध्या उपचार सुरू आहेत. 


अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) :


बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन मायस्थेनिया ग्रेविस (Myasthenia Gravis) या गंभीर आजाराशी झुंज देत आहेत. मायस्थेनिया ग्रेविसला ऑटो-इम्यून न्यूरोमस्कुलर डिसऑर्डरदेखील म्हटलं जातं. या आजारामुळे माणूस कमकुवत होतो. 


हृतिक रोशन (Hrithik Roshan) :


हृतिक रोशन हा बॉलिवूडचा आघाडीचा अभिनेता आहे. हृतिक रोशन क्रॉनिक सबड्यूरल हेमेटोमा (Subdural Haematoma) या गंभीर आजाराचा सामना करत आहे. या आजारामुळे हृतिकचं डोकं आणि कान दुखतात. 


वरुण धवन (Varun Dhawan) :


अभिनेता वरुण धवनला स्टीबुल हायपोफंक्शन नामक एक आजार आहे. या आजारात व्यक्तीला आपल्या शरीरातील बॅलेंस करता येत नाही.


समंथा रुथ प्रभू (Samantha Ruth Prabhu) :


आपल्या सौंदर्याने प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारी अभिनेत्री समंथा रुथ प्रभू एका गंभीर आजाराचा सामना करत आहे. मायोसिटिस नामक आजाराने ती ग्रस्त आहे. या आजारामुळे अभिनेत्रीला थकवा आणि श्वास घ्यायला त्रास होतो.


संबंधित बातम्या


South Bold Actress : समंथा, तमन्ना ते कियारा आडवाणीपर्यंत! 'या' 5 वेबसीरिजमध्ये अभिनेत्रींनी सर्व मर्यादा ओलांडल्या!