South Bold Actress in Web Series : दाक्षिणात्य मनोरंजनसृष्टीतील अनेक अभिनेत्रींनी (South Actress) आपल्या अभिनयाचा ठसा हिंदी मनोरंजनसृष्टीतही उमटवला आहे. ओटीटी प्लॅटफॉर्म अनेक सेलिब्रिटींचं फेव्हरेट आहे. सर्वसामान्य नागरिकांपासून ते बड्या कलाकारांपर्यंत अनेकांनी ओटीटी प्लॅटफॉर्मवर स्वत:ला सिद्ध केलं आहे. बॉलिवूडप्रमाणे साऊथच्या अनेक अभिनेत्रींनीदेखील ओटीटी विश्वात आपलं नाव कोरलं आहे. लोकप्रिय अभिनेत्री समंथा रुथ प्रभूपासून (Samantha Ruth Prabhu) ते कियारा आडवाणीपर्यंत (Kiara Advani) अनेक दाक्षिणात्य अभिनेत्रींनी आपल्या बोल्ड अदांनी सर्व मर्यादा ओलांडल्या आहेत. समंथा, कियारासह तमन्ना भाटिया (Tamanna Bhatia), राखी खन्ना (Rashi Khanna), शोभिता धुलीपाला (Sobhita Dhulipala), ईशा गुप्ता (Isha Gupta) आणि राजश्री देशपांडे (Rajshri Deshpande) या अभिनेत्रींचा यात समावेश आहे.
कियारा आडवाणी (Kiara Advani) :
साऊथसह बॉलिवूड गाजवणारी कियारा आडवाणी सर्व मर्यादा ओलांडणाऱ्या दाक्षिणात्य अभिनेत्रींमध्ये पहिल्या क्रमांकावर आहे. 'लस्ट' (Lust) या वेबसीरिजमध्ये कियाराने खूपच बोल्ड सीन दिले आहेत. या सीरिजमधील अभिनेत्रीच्या ऑर्गेज्म सीनने धुमाकूळ घातला होता.
समंथा रुथ प्रभू (Samantha Ruth Prabhu) :
दाक्षिणात्य अभिनेत्री समंथा रुथ प्रभू 'द फॅमिली मैन 2' (The Family Man 2) या सीरिजमधील खतरनाक आणि किलर लूकमुळे चांगलीच चर्चेत आली होती. या सीरिजमध्ये अभिनेत्रीने एक बोल्ड सीन दिला होता. या सीनची चांगलीच चर्चा रंगली होती.
तमन्ना भाटिया (Tamanna Bhatia) :
'करदा' (Jee Karda) या वेबसीरिजमध्ये तमन्ना भाटियाने जबरदस्त बोल्ड सीन दिले आहेत. अभिनेत्रीचे या सीरिजमधील बोल्ड सीन वाऱ्याच्या वेगाने व्हायरल होत आहेत.
राशी खन्ना (Rashi Khanna) :
'फर्जी' (Farzi) या वेबसीरिजमध्ये राशी खन्ना शाहिद कपूरसोबत दिसून आली होती. या सीरिजमध्ये राशीचा एक इंटीमेट किसिंग सीन दाखवण्यात आला होता. या सीनची चांगलीच चर्चा रंगली होती.
शोभिता धुलीपाला (Sobhita Dhulipala) :
शोभिता धुलीपाला आपल्या बोल्ड अदांनी नेहमीच चर्चेत असते. अभिनेत्रीने 'द नाइट मॅनेजर' (The Night Manager) या सीरिजमध्ये आदित्य रॉय कपूरसोबत एक इंटीमेट सीन दिला होता.
ईशा गुप्ता (Isha Gupta) :
साऊथ अभिनेत्री ईशा गुप्ता 'आश्रम 3' (Aashram 3) या वेबसीरिजमध्ये बॉबी देओलसोबत सेंसेशनल बोल्ड सीन देताना दिसून आली होती. या सीनची चांगलीच चर्चा रंगली होती.
राजश्री देशपांडे (Rajshri Deshpande) :
'सेक्रेड गेम्स' (Sacred Games) या सीरिजमध्ये अभिनेत्री राजश्री देशपांडेने बोल्ड सीन्स दिलेले आहेत. या सीनची साऊथसह हिंदी आणि मराठी मनोरंजनसृष्टीतही चर्चा रंगली होती.
संबंधित बातम्या