शनिवारी रात्री टीव्हीवर प्रसारित झालेल्या कार्यक्रमात शाहरुख गेस्ट म्हणून उपस्थित राहिला होता. यावेळी त्याने अनेक खुलासे केले. आम्ही कधी हिंदू मुस्मीम विषयावर चर्चा करत नाही. मी मुस्लीम आहे, माझी बायको हिंदू तर आमची मुले हिंदुस्थान असल्याचे शाहरुख म्हणाला. आपल्या शाळेत जाणाऱ्या मुलांविषयी सांगताना शाहरुख म्हणाला. शाळेत गेल्यानंतर आपल्याला धर्माचा कॉलम भरावा लागतो. माझी मुलगी लहान होती, त्यावेळी तीनं विचारलं होतं, की पप्पा आपण कोणत्या धर्माचे आहोत. त्यावेळी मी लिहलं की आपण भारतीय आहोत आणि भारतीय हाच आपला धर्म आहे. हे ऐकून उपस्थित प्रेक्षकांनी टाळ्या वाजवल्या.
यापूर्वीच शाहरुख खानने आपल्या धर्माबद्दल भूमिका स्पष्ट केली आहे. तो आपल्या घरी सर्व धर्मांचे सण साजरे करतो. आपल्या धर्माबद्दल बोलताना शाहरुख एकदा म्हणाला होता, की "मी पाच वेळा नमाज पढन्या इतका धार्मिक नाही. पण मी एक मुस्लीम आहे. मला इस्लामच्या तत्त्वांवर विश्वास आहे आणि माझा असा विश्वास आहे की इस्लाम चांगला धर्म आहे."
झिरोनंतर शाहरुखचा एकही चित्रपट नाही -
झिरो चित्रपटानंतर किंग खानची जादू ओसरल्याचं पाहायला मिळत आहे. या चित्रपटानंतर त्याने एकही नवा चित्रपट साईन केला नसून या मागचं कारण त्याने स्पष्ट केलं आहे. सध्या मी माझा जास्तीत जास्त वेळ माझ्या कुटुंबीयांसोबत व्यतीत करत आहे. मला असं वाटतंय की सध्या मी माझ्या वेळ पुस्तके वाचनात घालवावा. त्यासोबतच माझी मुले सध्या कॉलेज जीवन जगत आहेत. त्यामुळे त्यांना सुद्धा मी वेळ दिला पाहिजे. म्हणून सध्या मी चित्रपट करत नसल्याचे शाहरुख म्हणाला.
King Khan Birthday Special | शाहरुख खानचा बॉडी डबल प्रशांत वालदे 'एबीपी माझा'वर | ABP Majha