नवी दिल्ली : सीएए आणि एनआरसीविरोधात देशातील बर्‍याच भागात वारंवार निषेध होत आहे. आता बॉलिवूडकरांनीही या कायद्याचा विरोध करणाऱ्या विद्यार्थ्यांचे समर्थन केलं आहे. यात चित्रपट निर्माता मीरा नायर, नंदिता दास, अभिनेता नसीरुद्दीन शाह, रत्ना पाठक शाह, जावेद जाफरी, पार्थ चटर्जी, अनीता देसाई, किरण देसाई, टीएम कृष्णा, आशीष नंदी आणि गायत्री चक्रवर्तीसह 300 पेक्षा अधिक कलाकार सहभागी झाले आहेत. 300 पेक्षाही अधिक जणांची स्वाक्षरी असलेलं खुल पत्र देशातील जनतेला लिहलं आहे.


बॉलिवूड सेलिब्रिटींनी सीएए-एनआरसीला विरोध करणाऱ्या विद्यार्थ्यांसोबत असल्याचं खुले पत्र लिहलं आहे. सर्वांचे हस्ताक्षर असलेल्या या पत्रात, "राष्ट्राचा जीव धोक्यात आहे. आमच्या राज्यांचे हित आणि भारतीयांचे जीवनमान धोक्यात आहे." असल्याचं म्हटलं आहे. बरेच लोक अन्यायाविरोध बोलत नसल्याचंही विद्यार्थ्यांच्या पाठिंब्यात उतरलेल्या बॉलिवूडकरांनी म्हटलं आहे. अशा परिस्थितीत विद्यार्थी देत असलेला लढा योग्य असल्याचे त्यांनी सांगितले. या प्रकरणाचं गाभीर्य पाहता आपल्यालाही आपल्या संविधानाच्या तत्वांना वाचवण्यासाठी पुढे येण्याचं आवाहन बॉविवूडकरांनी केलं आहे.

दीपिका पादुकोण जेएनयूत -
या अगोदर बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पादुकोण जवाहरलाल नेहरू युनिवर्सिटीच्या बाहेर सुरू असलेल्या आंदोलनात सहभागी झाली होती. जेएनयूच्या हल्ल्यात जखमी झालेल्या विद्यार्थ्यांची तीने यावेळी विचारपूस केली. ज्याठिकाणी विद्यार्थ्यांचं आंदोलन सरु होतं, त्याठिकाणीही दीपिकाने आंदोलनकर्त्यांची भेट घेतली. दिल्लीतील प्रतिष्ठित जवाहरलाल नेहरू विद्यापीठात काही गुंडानी वसतीगृहात घुसून विद्यार्थ्यांवर जीवघेणा हल्ला केला होता. तोंड बांधलेल्या या गुंडांनी लाठ्या-काठ्या आणि लोखंडी सळईने मुलींवरही हल्ला केला. यात विद्यार्थी संघटनेची अध्यक्ष आईशा घोष गंभीर जखमी झाली होती.

मुंबईतही कलाकार रस्त्यावर -
दिल्लीतील जेएनयू हिंसाचाराच्या निषेधार्थ मुंबईत आंदोलन करण्यात आले होते.यात दिग्दर्शक अनुराग कश्यप, अभिनेत्री तापसी पन्नू, कॉमीडीयन कुमाल काम्रा, अभिनेत्री दिया मिर्झा, गोहर खान, जोया अख्तर आदी लोक उपस्थित होते. यावेळी अनेकांनी निषेधाचे फलक हातात घेऊन घोषणाबाजी केली.

Video | नसीरुद्दीन शाह, कोंकणा, पालेकरांसह 600 कलाकार मोदींविरोधात एकवटले | मुंबई | एबीपी माझा