राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी पद्म पुरस्कारांची घोषणा केली आहे. एकूण 21 जणांचा पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे. यामध्ये महाराष्ट्राच्या बीजमाता राहिबाई पोपेरे आणि अहमदनगरच्या आदर्श गाव हिवरेबाजारचे माजी सरपंच, सामाजिक कार्यकर्ते पोपटराव पवार यांना पद्मश्री जाहीर जाहीर झाला आहे. अरुण जेटली, सुषमा स्वराज आणि जॉर्ज फर्नांडिस यांना मरणोत्तर पद्मविभूषण पुरस्कार जाहीर झाला आहे. एकूण 118 जणांना पद्मश्री, 16 जणांना पद्मभूषण आणि 7 जणांना पद्मविभूषण पुरस्कार जाहीर झाला आहे. यातच पाकिस्तानी गायक अदनान सामीलाही पद्मश्री जाहीर करण्यात आला आहे.
अमेय खोपकर यांच ट्विट -
अदनान सामीला विरोध करणारं ट्विट महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी केलं आहे. "मूळ भारतीय नागरिक नसलेल्या अदनान सामीला भारत सरकारने कोणताही पुरस्कार देऊ नये, हे मनसेच ठाम मत आहे. त्यामुळे त्याला बहाल केलेल्या पद्मश्री पुरस्काराचा मनसेकडून तीव्र शब्दात निषेध. अदनान सामीला जाहीर झालेला पद्म पुरस्कार त्वरित रद्द करण्यात यावा ही मनसेची मागणी आहे."
सुरेश वाडकर यांना पद्मश्री मिळाल्याचा आनंद साजरा -
ज्येष्ठ गायक सुरेश वाडकर यांनाही आज पद्मश्री पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. त्यावर आनंद व्यक्त करत खोपकर म्हणाले, "सुरेश वाडकर यांना पद्मश्री मिळाल्याचा आनंद साजरा करतोय, तोच आनंदावर थोडं विरजण पडलं. अदनान सामीला दिलेल्या पद्मश्रीमुळे. 2015 मध्ये म्हणजे मोदींच्याच काळात त्याला भारतीय नागरिकत्व मिळालं आणि लगेच चार वर्षात त्याला पद्मश्रीही बहाल केला. त्याला एवढं लिफ्ट करण्याचं कारण काय?, असा प्रश्नही यावेळी उपस्थित केला आहे."
Rahibai Popere | बीजमाता राहीबाई पोपेरे यांना पद्मश्री | ABP MAJHA