Pathaan Box Office Collection : जगभरातील बॉक्स ऑफिसवरचा शाहरुखचं बादशाह; 'पठाण'ने पार केला 1000 कोटींचा टप्पा
Pathaan : शाहरुखच्या 'पठाण'ने जगभरात 1000 कोटींपेक्षा अधिक कमाई केली आहे.
Shah Rukh Khan Pathaan Box Office Collection : बॉलिवूडचा सुपरस्टार शाहरुख खानच्या (Shah Rukh Khan) 'पठाण' (Pathaan) सिनेमाने आणखी एक रेकॉर्ड आपल्या नावे केला आहे. शाहरुखच्या 'पठाण'ने आता जगभरात 1000 कोटींचा टप्पा पार केला आहे. त्यामुळे शाहरुख खऱ्या अर्थाने जगभरातील बॉक्स ऑफिसवरचा बादशाह ठरला आहे. तर देशात या सिनेमाने 623 कोटींचा गल्ला जमवला आहे.
बॉक्स ऑफिस वर्ल्डवाइडच्या ट्वीटनुसार, शाहरुख खानच्या 'पठाण'ने रिलीजच्या 27 व्या दिवशी जगभरात 1000 कोटींची कमाई केली आहे. या सिनेमाच्या हिंदी वर्जनने 499 कोटी आणि साऊथमध्ये 17.97 कोटींची कमाई केली आहे. देशांतर्गत या सिनेमाने 623 कोटी आणि परेशात 377 कोटींची कमाई केली आहे. एकंदरीतच जगभरात या सिनेमाने 1000 कोटींचा गल्ला जमवला आहे.
#Pathaan #ShahRukhKhan @yrf @rohan_m01 #Pathaan1000crWorldWide @iamsrk #PathaanCollection after day 27 #KINGKHAN ON TOP & 500 cr Nett tomorrow 7 pm
— Box Office Worldwide (@BOWorldwide) February 20, 2023
Domestic 499.05 cr Nett Hindi
519.02 cr (17.97 cr Nett south languages)
Domestic Gross 623 cr
Overseas 377 cr
WW Gross 1000 cr https://t.co/R7x73E42KT pic.twitter.com/uIW6rXV0xk
बॉलिवूडच्या सिनेमांना चीनमधील सिनेप्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत असतो. पण 'पठाण' हा सिनेमा चीनमध्ये प्रदर्शित झालेला नसला तरीही बॉक्स ऑफिसवर रेकॉर्डब्रेक कमाई करण्यात उजवा ठरला आहे. चीनमध्ये प्रदर्शित न होता या सिनेमाने 1000 कोटींचा टप्पा पार केला आहे.
'पठाण' 1000 कोटींचा टप्पा पार करणारा पाचवा सिनेमा ठरला
1000 कोटींचा टप्पा पार करणारा 'पठाण' हा भारतातील पाचवा सिनेमा ठरला आहे. या यादीत आमिर खानचा 'दंगल' पहिल्या क्रमांकावर आहे. या सिनेमाने 1968.03 कोटींची कमाई केली होती. तर दाक्षिणात्य सुपरस्टार प्रभासचा 'बाहुबली 2 : द कनक्ल्यूजन' हा सिनेमा दुसऱ्या स्थानावर आहे. राजामौलीच्या या सिनेमाने 1747 कोटींची कमाई केली होती. तिसऱ्या क्रमांकावर यशराजचा 'केजीएफ 2' हा सिनेमा आहे. या सिनेमाने 1188 कोटींची कमाई केली होती. त्यानंतर 'आरआरआर' या सिनेमाने 1174 कोटींची कमाई केली होती.
'पठाण' सिनेमाच्या यशाने किंग खान आनंदी आहे. या सिनेमाच्या माध्यमातून शाहरुखने चार वर्षांनी रुपेरी पडद्यावर कमबॅक केलं होतं. नुकत्याच पार पडलेल्या एसआरके सत्रात शाहरुखने चाहत्यांची प्रश्नांची उत्तरे दिली आहेत. त्यावेळी एका प्रश्नाचं उत्तर देत शाहरुख म्हणाला होता,"सध्या 1000 च्या वरचा कोणताही नंबर माझ्यासाठी लकी नंबर आहे".
महत्त्वाच्या इतर बातम्या :