Shah Rukh Khan Suhana Khan Movie Update : बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खानने (Shah Rukh Khan) 2023 हे वर्ष चांगलच गाजवलं आहे. 2023 मध्ये किंग खानचे अनेक ब्लॉकबस्टर सिनेमे रिलीज झाले. अशातच आता बॉलिवूड सुपरस्टार शाहरुख खानची लाडकी लेक सुहाना खानचा (Suhana Khan) नवा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सुहाना येत्या काही दिवसांत या सिनेमाच्या शूटिंगला सुरुवात करणार आहे.


सुहाना खानचा नवा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. गेल्या काही दिवसांपासून या सिनेमासंदर्भात चर्चा सुरू होती. सुहाना खानच्या या सिनेमाची चाहत्यांना उत्सुकता आहे. 


एंटरटेनमेंट न्यूजच्या रिपोर्टनुसार, सुहाना खानच्या आगामी सिनेमाचं नाव 'किंग' (King) असं आहे. लवकरच निर्माते या सिनेमाचं काम सुरू करणार आहेत. पिंकव्हिलाच्या रिपोर्टनुसार, शाहरुख खान आणि सुहाना खानच्या अॅक्शन थ्रिलर सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा सुजॉय घोष सांभाळणार आहेत. 




'पठाण'चे दिग्दर्शक सिद्धार्थ आनंद (Siddharth Anand) या सिनेमाची निर्मिती करणार असल्याचं म्हटलं जात आहे. येत्या काही दिवसांत या सिनेमाच्या शूटिंगला सुरुवात होणार आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सिद्धार्थ आनंद आणि सुजॉय घोष यांचं शाहरुख खान आणि सुहाना खानसोबत बोलणं सुरू आहे. ऑक्टोबर 2023 ते फेब्रुवारी 2024 पर्यंत त्यांच्यात बोलणं सुरू होतं. सुजॉय सध्या या सिनेमाच्या कथानकावर काम करत आहे. या सिनेमात प्रेक्षकांना अॅक्शनचा तडका पाहायला मिळणार आहे. रेड चिलीजच्या बॅनरअंतर्गत या सिनेमाची निर्मिती होणार आहे. 


सुहाना 'या' दिवशी करणार शूटिंगला सुरुवात


सुहानाच्या आगामी 'किंग' या सिनेमाच्या शूटिंगला लवकरच सुरुवात होणार आहे. सुपरस्टार शाहरुख खान मे 2024 मध्ये या सिनेमाच्या शूटिंगला सुरुवात करणार आहे. या सिनेमाचं शूटिंग पूर्ण केल्यानंतर शाहरुख खान 'पठाण 2' (Pathaan 2) या सिनेमाच्या शूटिंगला सुरुवात करेल. 2025 मध्ये या सिनेमाच्या शूटिंगला सुरुवात होणार आहे. 'पठाण 2'मध्ये सुपरस्टार सलमान खान आमि शाहरुख खान आमने-सामने दिसतील. 2026 मध्ये हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येऊ शकतो. 


संबंधित बातम्या


Shah Rukh Khan : आरारारा खतरनाक! शाहरुख खानचा शर्टलेस फोटो पाहिलात का? किंग खानचा फिटनेस पाहून नेटकरी म्हणाले,"एक ही दिल है कितनी बार जीतोगे"