Akshay Kumar Tiger Shroff : बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार (Akshay Kumar) आणि टायगर श्रॉफ (Tiger Shroff) सध्या 'बडे मिया छोटो मियां' (Bade Miyan Chote Miyan) या सिनेमामुळे चर्चेत आहेत. सध्या ते या सिनेमाचं प्रमोशन करत आहे. नुकतच लखनौत (Lucknow) अक्षय आणि टायगरची एक झलक पाहण्यासाठी चाहत्यांनी तुफान गर्दी केली होती. ही गर्दी आटोक्यात आणण्यासाठी पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला. दरम्यान अक्षय कुमार आणि टायगर श्रॉफवर काही चाहत्यांनी चप्पल फेकून मारल्या. 


नेमकं प्रकरण काय? 


लखनौत अक्षय कुमार आणि टायगर श्रॉफ आपल्या 'बडे मिया छोटे मिया' या सिनेमाचं प्रमोशन करत होते. दरम्यान लाडक्या सुपरस्टारची एक झलक पाहण्यासाठी चाहत्यांनी गर्दी केली. गर्दी आटोक्यात आणण्यासाठी पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला. दरम्यान चाहत्यांनी एकमेकांवर चप्पल फेकून मारल्या. त्यातील काही चप्पल स्टेजपर्यंतही गेल्या. मंचावर अक्षय कुमार आणि टायगर श्रॉफ उपस्थित होते. काही चाहत्यांनी तर हेल्मेटदेखील फेकून मारलं. 






लखनौतील पाचही सिनेमे सुपरहिट


लखनौत चाहत्यांसोबत संवाद साधताना अक्षय कुमार म्हणाला,"धीर सोडू नका. लखनौमध्ये मी पाचपेक्षा अधिक सिनेमाचं शूटिंग केलं आहे. हे पाचही सिनेमे सुपरहिट झाले आहेत. आता माझा आगामी सिनेमा लखनौतील प्रेक्षक सुपरहिट करतील, अशी आशा आहे.  


'बडे मिया छोटे मियां' सिनेमाबद्दल जाणून घ्या (Bade Miyan Chote Miyan Movie Details)


'बडे मिया छोटे मियां' हा अॅक्शनपट आहे. या सिनेमाचा टीझर काही दिवसांपूर्वीच प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. या सिनेमात प्रेक्षकांना अॅक्शन आणि स्टंटबाजी पाहायला मिळणार आहे. या सिनेमात अक्षय आणि टायगर लष्करी अधिकाऱ्याच्या भूमिकेत झळकणार आहे. या सिनेमात दाक्षिणात्य सुपरस्टार पृथ्वीराज सुकुमारन खलनायकाच्या भूमिकेत दिसणार आहे. अक्षय आणि टायगरसह मानुषी छिल्लर, सोनाक्षी सिन्हा हेदेखील या सिनेमात महत्त्वाच्या भूमिकेत झळकतील. 10 एप्रिल 2024 रोजी ईदच्या मुहूर्तावर हा सिनेमा रिलीज होणार आहे. या बहुचर्चित सिनेमाची प्रेक्षकांना उत्सुकता आहे. 'बडे मिया छोटे मियां' हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर पैशांचा पाऊस पाडणार आहे.


संबंधित बातम्या


Sea-Bridge Marathon : अटल सेतूवरून सी-ब्रीज मॅरेथॉनला सुरुवात, अभिनेता अक्षय कुमारसर टायगर श्रॉफची हजेरी