Ketaki Chitale : अभिनेत्री केतकी चितळे (Ketaki Chitale) नेहमीच आपल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे चर्चेत असते. सध्या ती कोणत्याही कलाकृतीच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येत नसली तरी सामाजिक, राजकीय अशा विविध विषयांवर ती व्यक्त होत असते. अनेकदा तिच्यावर टीकादेखील होते. अशातच आता बीड येथील परळी ब्राह्मण ऐक्य परिषदेत केतकी चितळेने अॅट्रोसिटी कायद्याबद्दल भाष्य केलं आहे. अॅट्रोसिटी कायदा रद्द करावा असं अभिनेत्री म्हणाली आहे
अॅट्रोसिटी कायदा रद्द करावा : केतकी चितळे
केतकी चितळे म्हणाली,"गेल्या पाच वर्षात किती अॅट्रोसिटी केस आहेत. त्यातल्या ब्राह्मणांच्या विरोधात किती आहेत आणि प्रत्येक जातीविरोधात किती आहेत हे शोधा. हे अख्ख रॅकेट आहे. ज्याबद्दल तुम्हाला कल्पनाही नाही. एक वकीलांनी गेल्या 15-20 वर्षात 62 अॅट्रॉसिटी केसेस टाकल्या आहेत. यातील 13-15 ठिकाणी त्याच्यांसोबत विटनेस एकच आहे. असे अनेक वकील आहेत. हे अख्ख रॅकेट असून त्यांचं जोरात काम सुरू आहे. त्यामुळे अॅट्रोसिटी कायदा रद्द करावा".
अॅट्रोसिटी कायद्याअंतर्गत केतकी चितळेला झालेली अटक
अॅट्रोसिटी कायद्याअंतर्गत 2022 मध्ये केतकी चितळेला अटक झाली होती. ठाणे सत्र न्यायालयाने पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती. 2020 मध्ये अॅट्रोसिटी कायद्याअंतर्गत केतकी चितळे विरोधात गुन्हा दाखल झाला होता. तिने अनुसूचित जातींतीत मंडळींविरोधात आक्षेपार्ह पोस्ट शेअर केली होती.
केतकी चितळेची पोस्ट व्हायरल (Ketaki Chitale Post)
केतकी चितळेने आज सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत मनोज जरांगे यांच्यावर टीका केली आहे. तिने लिहिलं आहे,"कालचा दिवस फार इंटरेस्टिंग होता. एके ठिकाणी (बरीच वर्षे शिव्या घातल्यावर) ब्राह्मण तुष्टीकरण करताना स्वतःच्या कानांनी ऐकले व डोळ्यांनी बघितले आणि दुसरीकडे, काही किलोमीटर अंतरावर एका मोर्चा धारक "महापुरुषांनी" एका राजकारणी नेत्यांना ब्राह्मण म्हणून अपशब्द वापरले अशी बातमी ऐकली! जय महाराष्ट्र असे म्हणून गप्प बसावे का या सर्कशीत असलेल्या कलाकारांवर हातातील पॉपकॉर्न फेकावे कळत नाहीये. असो".
केतकी चितळे कोण आहे?
'तुझं माझं ब्रेकअप' या मालिकेच्या माध्यमातून केतकी घराघरांत पोहोचली होती. त्यानंतर वादग्रस्त वक्तव्यांमुळे ती नेहमीच चर्चेत राहिली आहे. गेल्या काही वर्षापासून केतकीला अपस्मार हा आजार आहे. या आजारावर केतकी वेगवेगळ्या मेडिकल ट्रीटमेंट घेत आहे. त्यासंदर्भातील फोटो आणि व्हिडीओ ती सोशल मीडियावर शेअर करत असते.
संबंधित बातम्या