एक्स्प्लोर

Shah Rukh Khan : बॉडी बनवायला किती वेळ लागला? चाहत्याच्या प्रश्नावर शाहरुखने दिलं मजेशीर उत्तर

Shah Rukh Khan : शाहरुख खानने 'Ask Me Anything' या सत्राच्या माध्यमातून चाहत्यांसोबत संवाद साधला आहे.

Shah Rukh Khan Ask Me Anything On Twitter : बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान (Shah Rukh Khan) सध्या त्याच्या आगामी 'पठाण' (Pathaan) या सिनेमामुळे चर्चेत आहे. आता शाहरुखने या सिनेमाच्या प्रमोशनला सुरुवात केली आहे.  रविवारी त्याने नाताळच्या निमित्ताने 'Ask Me Anything' या सेशनच्या माध्यमातून चाहत्यांसोबत संवाद साधला. या सत्रात चाहत्यांनी शाहरुखला अनेक प्रश्न विचारले. या प्रश्नांची शाहरुखने मजेशीर उत्तरे दिली आहेत. 

बॉडी बनवायला किती वेळ लागला?

'Ask Me Anything' या सत्रादरम्यान शाहरुखच्या एका चाहत्याने त्याचा 'पठाण' सिनेमातील एक फोटो शेअर केला. फोटो शेअर करत त्याने विचारले,"अशी बॉडी बनवायला किती वेळ लागला?". यावर उत्तर देत किंग खान म्हणाला," भावा, 57 वर्षे". शाहरुखने बॉडी बनवायला खूप मेहनत घेतली आहे. वयाच्या 57 व्या वर्षी 'पठाण' सिनेमासाठी त्याने शरीरावर प्रचंड मेहनत घेतली आहे. या सिनेमाचा टीझर आणि गाण्यांमधून याची झलक चाहत्यांना पाहायला मिळाली आहे. 

दुसऱ्या एका चाहत्याने शाहरुखला विचारलं आहे, "तू हेलिकॉप्टर उडवायला कधी शिकलास?" यावर उत्तर देत बादशाह म्हणाला,"सायकल चावण्यासोबतच". आणखी एका चाहत्याने विचारले,"तू 'पठाण'चा ट्रेलर का रिलीज करत नाहीस? यावर उत्तर देत शाहरुख म्हणाला,"हा..हा... माझी इच्छा". 

25 जानेवारीला 'पठाण' प्रेक्षकांच्या भेटीला (Pathaan Release Date) : 

शाहरुख खानचा आगामी 'पठाण' हा सिनेमा येत्या 25 जानेवारीला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमात शाहरुखसह बॉलिवूड अभिनेता जॉन अब्राहम (John Abraham) आणि अभिनेत्री दीपिका पदुकोण (Deepika Padukone) झळकणार आहे. या सिनेमाची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. पण काही कारणाने सध्या हा सिनेमा वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. 

शाहरुखचे आगामी सिनेमे (Shah Rukh Khan Upcoming Movies) : 

शाहरुख खानचा 'पठाण' हा सिनेमा 25 जानेवारी 2023 रोजी सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. या सिनेमासह त्याचे अनेक सिनेमे पाईपलाईनमध्ये आहेत. त्याच्या आगामी सिनेमाच्या यादीत 'डंकी' (Dunki) सिनेमाचा समावेश आहे. या सिनेमात त्याच्यासोबत तापसी पन्नू (Taapsee Pannu) स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे. राजकुमार हिरानी या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळणार आहेत. तसेच शाहरुखचा 'जवान' हा सिनेमादेखील लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 

संबंधित बातम्या

Jhoome Jo Pathaan: शाहरुख-दीपिकाच्या 'झूमे जो पठाण' गाण्यावर अभिनेत्याची प्रतिक्रिया; म्हणाला, 'हा भारत आहे पाकिस्तान नाही...'

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

बाबा रामदेव यांच्या कंपनीने मोडले सर्व विक्रम, नफ्यात झाली मोठी वाढ, तेलाच्या विक्रीतून सर्वाधिक कमाई 
बाबा रामदेव यांच्या कंपनीने मोडले सर्व विक्रम, नफ्यात झाली मोठी वाढ, तेलाच्या विक्रीतून सर्वाधिक कमाई 
मुंबईतील वयोवृद्ध महिलेची निर्घुण हत्या, शेजारील 27 वर्षीय युवकाला अटक; पोलिसांनी 2 तासांत लावला छडा
मुंबईतील वयोवृद्ध महिलेची निर्घुण हत्या, शेजारील 27 वर्षीय युवकाला अटक; पोलिसांनी 2 तासांत लावला छडा
पंतप्रधानांच्या मेरी माटी मेरा देश उपक्रमाला राज्याच्या पंचायत विभागाकडून खो; कोट्यवधींची रक्कम थकीत
पंतप्रधानांच्या मेरी माटी मेरा देश उपक्रमाला राज्याच्या पंचायत विभागाकडून खो; कोट्यवधींची रक्कम थकीत
Chhagan Bhujbal : अहो भुजबळ! तुमच्याच पक्षाने तुम्हाला हिमालयात पाठवायची व्यवस्था केलेय; भाजपचा बोचरा पलटवार
अहो भुजबळ! तुमच्याच पक्षाने तुम्हाला हिमालयात पाठवायची व्यवस्था केलेय; भाजपचा बोचरा पलटवार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Raigad DPDC Meeting Update : शिवसेना आमदारांशिवाय जिल्हा वार्षिक नियोजन बैठक, महायुतीत धुसफूसSuresh Dhas PC : जितेंद्र आव्हाड यांना फक्त रॉकेल टाकण्याच कळतं का? धस यांचा हल्लाबोलGiriraj Sawant On Rushiraj Sawant : भावाचा बाहेर जातोय असा मेसेज,ऋषिराज सावंतांचे मोठे बंधू 'माझा'वरCotton storage Bag Scam : 'कापूस साठवणूक बॅग घोटाळ्याची माहिती Dhananjay Munde यांना आधीच दिली होती'

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
बाबा रामदेव यांच्या कंपनीने मोडले सर्व विक्रम, नफ्यात झाली मोठी वाढ, तेलाच्या विक्रीतून सर्वाधिक कमाई 
बाबा रामदेव यांच्या कंपनीने मोडले सर्व विक्रम, नफ्यात झाली मोठी वाढ, तेलाच्या विक्रीतून सर्वाधिक कमाई 
मुंबईतील वयोवृद्ध महिलेची निर्घुण हत्या, शेजारील 27 वर्षीय युवकाला अटक; पोलिसांनी 2 तासांत लावला छडा
मुंबईतील वयोवृद्ध महिलेची निर्घुण हत्या, शेजारील 27 वर्षीय युवकाला अटक; पोलिसांनी 2 तासांत लावला छडा
पंतप्रधानांच्या मेरी माटी मेरा देश उपक्रमाला राज्याच्या पंचायत विभागाकडून खो; कोट्यवधींची रक्कम थकीत
पंतप्रधानांच्या मेरी माटी मेरा देश उपक्रमाला राज्याच्या पंचायत विभागाकडून खो; कोट्यवधींची रक्कम थकीत
Chhagan Bhujbal : अहो भुजबळ! तुमच्याच पक्षाने तुम्हाला हिमालयात पाठवायची व्यवस्था केलेय; भाजपचा बोचरा पलटवार
अहो भुजबळ! तुमच्याच पक्षाने तुम्हाला हिमालयात पाठवायची व्यवस्था केलेय; भाजपचा बोचरा पलटवार
राहुल सोलापूरकर पुरावे द्या, अन्यथा कारवाईला सामोरे जा; अनुसूचित जाती जमाती आयोगाच्या उपाध्यक्षाचा सज्जड इशारा 
राहुल सोलापूरकर पुरावे द्या, अन्यथा कारवाईला सामोरे जा; अनुसूचित जाती जमाती आयोगाच्या उपाध्यक्षाचा सज्जड इशारा 
Suhas Kande : शिंदेंच्या सभेसाठी जास्तीत जास्त शिवसैनिक आणा, सुहास अण्णा माजी नगरसेवकांवर भडकले; शिवसेनेतील गटबाजी चव्हाट्यावर
शिंदेंच्या सभेसाठी जास्तीत जास्त शिवसैनिक आणा, सुहास अण्णा माजी नगरसेवकांवर भडकले; शिवसेनेतील गटबाजी चव्हाट्यावर
जितेंद्र आव्हाडांना फक्त रॉकेल टाकून पेटवायचाच धंदा जमतो का? सुरेश धसांचा हल्लाबोल, म्हणाले, त्यांना पोटशूळ उठलाय
जितेंद्र आव्हाडांना फक्त रॉकेल टाकून पेटवायचाच धंदा जमतो का? सुरेश धसांचा हल्लाबोल, म्हणाले, त्यांना पोटशूळ उठलाय
स्क्वॉड आला रे... इंग्रजीचा पहिला पेपर, शिक्षणमंत्र्यांनीच दिली 12 वीच्या परीक्षा केंद्रावर धडक; कॉपीमुक्त अभियान जोमात
स्क्वॉड आला रे... इंग्रजीचा पहिला पेपर, शिक्षणमंत्र्यांनीच दिली 12 वीच्या परीक्षा केंद्रावर धडक; कॉपीमुक्त अभियान जोमात
Embed widget