Malaika Arora on Shah Rukh Khan Heatstroke : बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खान (Shah Rukh Khan) सध्या चांगलाच चर्चेत आहे. अहमदाबादमध्ये उष्माघाताचा त्रास झाल्याने आयपीएल मॅचनंतर (IPL 2024) शाहरुख खानला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. लाडक्या किंग खानला (King Khan) रुग्णालयात दाखल करण्यात आल्यानंतर त्याचे चाहते नाराज झाले होते. पण शाहरुखच्या प्रकृतीत आता सुधारणा झाली असून तो मुंबईत आला आहे. अशातच मलायका अरोरा एका कार्यक्रमात पोहोचली. त्यावेळी तिने पर्यावरणाबद्दल भाष्य केलं. दरम्यान मलायकाने उष्माघातापासून कसा बचाव करायचा याच्या टिप्स दिल्या आहेत.


अहमदाबादमध्ये झालेल्या आयपीएल सामन्यानंतर केकेआर फायनलला पोहोचला आहे. त्यानंतर शाहरुख खानने चांगलाच जल्लोष केला. पण हा जल्लोष शेवटपर्यंत काही टिकला नाही. या इव्हेंटनंतर शाहरुखची प्रकृती खालावली. आता मात्र तो ठिक आहे. अशातच आता मलायका अरोराला एका इव्हेंट दरम्यान शाहरुख खानच्या तब्येतीबद्दल एक प्रश्न विचारण्यात आला. त्यावेळी तिने उष्मघातापासून बचाव करण्याच्या टिप्स सांगितल्या. अभिनेत्रीने चाहत्यांना अनेक टिप्स दिल्या आहेत. 


मलायकाने चाहत्यांना काय टिप्स दिल्या? (Malaika Arora Tips for Beat The Heat)


मलायका अरोरा इंस्टेंट बॉलिवूडला दिलेल्या मुलाखतीत म्हणाली,"पर्यावरणाबद्दल आपण जागरुक असायला हवं हे याच कारणाने मी तुम्हाला सांगते आहे. तरचं पर्यावरण तुमच्यावर प्रेम करेल. सध्या उष्माघाताचा सर्वांना त्रास होत आहे. त्यामुळे आपण जास्त काही करू शकत नाही. यासाठी हायड्रेटेड राहा, भरपूर पाणी प्या, ठंड प्येय प्या, आरामदायी कपडे परिधान करा, सनस्क्रीनचा वापर करा, छत्रीचा वापर करा, या काही टिप्स मी चाहत्यांना देऊ इच्छित आहे. 




फिटनेस फ्रीक मलायका


मलायका अरोरा सध्या चित्रपट करत नाही आहे. पण फिटनेसवर मात्र तिने पूर्ण लक्ष दिलं आहे. अभिनेत्री फिटनेस फ्रीक असून व्यायाम आणि योगा करतानाचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत असते. अनेकदा तिला जीमबाहेर स्पॉट करण्यात आले आहे. 


शाहरुख फायनल पाहण्यासाठी मैदानात दिसणार? 


दरम्यान शाहरुखचा संघ केकेआर हा यंदाच्या आयपीएलची फायनल खेळणार आहे. त्यामुळे त्यांना चिअरअप करण्यासाठी शाहरुख पोहचणार का याची उत्सुकता आता लागून राहिली आहे. पण जुही चावलाने दिलेल्या माहितीनुसार, शाहरुख त्याच्या संघासाठी मैदानात येणार असल्याचं म्हटलं जात आहे. 


संबंधित बातम्या


Shah Rukh Khan Discharged: शाहरुखला रुग्णालयातून डिस्चार्ज, प्रकृतीही स्थिर; फायनल पाहण्यासाठी शाहरुख मैदानात दिसणार?