Deepika Padukone : मॉम-टू-बी दीपिका पदुकोण (Deepika Padukone) आणि रणवीर सिंह (Ranveer Singh) हे बॉलिवूडमधलं जोडपं लवकरच आई-बाबा होणार आहे. येत्या सप्टेंबर महिन्यात त्यांच्या घरी बाळाचे आगमन होणार आहे. दीपिकाच्या प्रेग्नेंसीची बातमी समोर आल्यानंतर 'दीपवीर'च्या चाहत्यांनी आनंद व्यक्त केला होता. मात्र, मागील दिवसांपासून दीपिकाला ट्रोलिंगला सामोरे जावे लागत आहे. मुंबईत मतदानाच्या दिवशी दीपिका आणि रणवीर सिंह एकत्र दिसले. त्यावेळी दीपिकाचा बेबी बम्प दिसून आला. दीपिकाचे फोटो, व्हिडीओ पाहून काहींनी ट्रोल करणाऱ्या कमेंट्स केल्या. एका बाजूला ट्रोलिंग होत असताना दुसरीकडे दीपिकाने इन्स्टाग्रामवर आपली पहिली पोस्ट शेअर केली आहे.
दीपिकाची पहिली पोस्ट...
दीपिका पदुकोण ही लोक काय म्हणतात, याकडे दुर्लक्ष करणाऱ्या अभिनेत्रीपैकी एक आहे. ट्रोलिंगवरही तिने कधीच प्रतिक्रिया दिली नाही. मात्र, आता कदाचित ती लोकांच्या ट्रोलिंगला उत्तर देऊ शकते. दीपिकाने गुरुवारी सांयकाळी आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर आपण शुक्रवारी लाईव्ह येणार असल्याचे सांगितले.
दीपिकाने आपल्या लाईव्ह सेशनबाबतच माहिती दिली. त्याशिवाय, इतर कोणतीही माहिती दिली नाही. त्यामुळे दीपिका आता आपल्या लाईव्ह सेशनमध्ये काय बोलणार? ट्रोलर्सला उत्तर देणार की... आणखी काही वेगळी माहिती देणार, याची चाहत्यांमध्ये उत्सुकता लागली आहे.
सोशल मीडियावर काही ट्रोलर्सने दीपिकाच्या गरोदरपणावर प्रश्न उपस्थित केले होते. एका युजरने दीपिका प्रेग्नेंट नसल्याचे म्हटले. तर, एकाने दीपिकाचे बेबी बम्प अजून दिसत नाही, तरी ती अशी का चालतेय असा प्रश्न केला.
दीपिकाचे आगामी चित्रपट
दीपिका पदुकोण ही रोहित शेट्टीच्या 'सिंघम अगेन'मध्ये झळकणार आहे. या चित्रपटाच्या सेटवरील तिचा लेडी कॉप लूकमधील फोटो व्हायरल झाला होता. त्याशिवाय, सेटवर दीपिकाची बॉडी डबल अभिनेत्रीदेखील दिसली होती. कल्कि 2898 एडी या चित्रपटातही दीपिका झळकणार आहे. जानेवारी महिन्यात तिची भूमिका असलेला 'फायटर' चित्रपट रिलीज झाला होता. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली.