Shah Rukh Khan Health Update:  शाहरुख खानला (Shah Rukh Khan Health Update) 22 मे रोजी डिहायड्रेशनमुळे अहमदाबादच्या केडी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. त्यानंतर त्याच्या चाहत्यांमध्येही चिंतेचं वातावरण निर्माण झालं होतं. त्याची पत्नी गौरी खान हिला ही माहिती मिळताच तिनेही तात्काळ  हॉस्पिटल गाठले. अभिनेत्री जुही चावलानेही तिचा मित्र आणि KKR टीम पार्टनर शाहरुखच्या तब्येतीची विचारपूस केली होती. पण आता शाहरुखला डिस्चार्ज देण्यात आला असून त्याची प्रकृती आता स्थिर आहे. 


शाहरुखला उष्माघाताचा त्रास होता, त्यामुळे त्याला तात्काळ अहमदाबाद येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. रिपोर्ट्सनुसार, आता त्याची प्रकृती स्थिर असून त्याला रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. या बातमीमुळे शाहरुखच्या चाहत्यांमध्येही आनंदाचं वातावरण असल्याचं पाहायला मिळतंय. त्याला रुग्णायलात दाखल केल्यानंतर सोशल मीडियावरुन त्याचे चाहते त्याच्यासाठी प्रार्थना करत होते. पण आता शाहरुख त्याच्या संघाची फायनल पाहण्यासाठी मैदानात येणार का याची उत्सुकता सर्वांना लागून राहिली आहे. 


शाहरुख रुग्णालयात दाखल


सध्या आयपीएल हंगामात व्यस्त असलेला बॉलिवूडचा बादशहा शाहरुख खानला (Shahrukh Khan) रुग्णालयात दाखल करण्या आलं. कडाक्याच्या उन्हामुळे त्याला त्रास होत असल्याने प्रकृती अस्वास्थतेमुळे शाहरुखला अहमदाबादमधील केडी हॉस्पीटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध हैदराबाद सनरायजर्सं यांच्यात मंगळवारी आयपीएलच्या (IPL) हंगामातील क्वालिफायर सामना झाला. या सामन्यात शाहरुख खानची मालकी असलेल्या केकेआरने बाजी मारली. त्यानंतर, शाहरुखने स्वत: मैदानात फिरुन चाहत्याचे अभिवादन केले होते. तसेच, केकेआरच्या विजयाचा जल्लोषही साजरा केला होता. मात्र, उष्माघातामुळे शाहरुखला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. 


शाहरुख फायनल पाहण्यासाठी मैदानात दिसणार? 


दरम्यान शाहरुखचा संघ केकेआर हा यंदाच्या आयपीएलची फायनल खेळणार आहे. त्यामुळे त्यांना चिअरअप करण्यासाठी शाहरुख पोहचणार का याची उत्सुकता आता लागून राहिली आहे. पण जुही चावलाने दिलेल्या माहितीनुसार, शाहरुख त्याच्या संघासाठी मैदानात येणार असल्याचं म्हटलं जात आहे. 


विजयानंतर शाहरुखच्या टीमचा जल्लोष


आयपीएल 2024 मधील क्वालिफायर 1 सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सनं सनरायझर्स हैदराबादचा आठ विकेट्सनी धुव्वा उडवून फायनलमध्ये धडक मारली. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवरच्या या सामन्यात कोलकात्याच्या गोलंदाजांनी खरोखरच कमाल केली. त्यांनी हैदराबादचा अख्खा डाव 159 धावांत गुंडाळला. त्यामुळं कोलकात्यासमोर विजयासाठी केवळ 160 धावांचं आव्हान होतं. कोलकात्यानं तब्बल 38 चेंडू आणि आठ विकेट्स राखून विजयी लक्ष्य गाठलं.


ही बातमी वाचा : 


Shah Rukh Khan Hospitalized: कोलकाताच्या विजयाचा जल्लोष; शाहरुख खान दुसऱ्याच दिवशी रुग्णालयात दाखल